Breaking News
Home / मनोरंजन / पबजी बॅ’न केल्यावर ह्या मुलाची जी प्रतिक्रिया होती ते पाहून हसू आवरणार नाही, बघा हा वायरल व्हिडीओ

पबजी बॅ’न केल्यावर ह्या मुलाची जी प्रतिक्रिया होती ते पाहून हसू आवरणार नाही, बघा हा वायरल व्हिडीओ

सध्याच्या लॉक डाऊनमुळे मागच्या वर्षी झालेल्या प्रदीर्घ लॉक डाऊनच्या आठवणी ताज्या झाल्या असतील. या काळात अनेक घटना घडल्या, अनेक निर्णय घेतले गेले. यातील काही लोकप्रिय ठरले तर काहींबाबत नाराजी होती. पण काही अशा बाबी होत्या ज्यांबद्दल मतमतांतरे होती. असाच एक निर्णय म्हणजे पबजी हा तेव्हाचा लोकप्रिय खेळ बंद करण्याचा निर्णय. यामुळे घराघरातील पालक मंडळी एकदम आनंदित झाली. तर हा ऑनलाईन खेळ खेळणारा तरुण वर्ग मात्र यामुळे निराश झाला. अनेकांना हा खेळ अतिशय आवडत असल्याने आणि त्याची सवय झाल्याने हा खेळ बंद होणं याबाबत त्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आल्या होत्या. पण एक प्रतिक्रिया मात्र आपल्या खास लक्षात राहिली होती. कारण एकतर ही प्रतिक्रिया म्हणजे एक व्हिडियो होता आणि ऐन वेळी प्रदर्शित झाल्याने वायरल ही झाला होता. आता तुम्हाला तर माहितीच आहे, वायरल व्हिडियोज वरील लेख म्हणजे मराठी गप्पा हे आपलं हक्काचं ठिकाण.

तर आपल्याला या व्हिडियोत काय दिसतं, तर शाळेत जाणारा एक मुलगा अगदी हताश होऊन बसला आहे. देहबोली तर अशी आहे की आता आभाळ कोसळलं आहे. कारण काय हे आपल्याला माहिती आहेच. या कारणामुळे हा मुलगा अतिशय वैतागलेला दिसतो. आपण रागावलो की राग व्यक्त होण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे आई. त्यामुळे आईजवळ आपलं हे ‘दुःख्ख’ व्यक्त करत असतो बिचारा. पण आईला मात्र बरच वाटत असतं पबजी बंद झाल्याने. तर त्यावर याची प्रतिक्रिया अगदी पोटतिडकीने येते. तसेच जवळ असलेल्या एका व्यक्तीवर (बहुधा बहीण असावी) तो डाफरतो. हिचं इन्स्टा बंद करा ना, काय गरज आहे असं म्हणत राग व्यक्त करत असतो. तसेच या ऑनलाईन खेळात त्याने ५ वी लेव्हल गाठल्याचं तो नमूद करतो. यावरून त्याने अगदी झोकून देऊन या खेळात स्वतःला गुंतवून घेतलं होतं हे लगेच लक्षात येतं.

मग त्या खेळात त्याने ऑनलाईन क’मावलेल्या खेळातील गाड्या, त्यांचे पार्ट्स आणि बरंच काही यांची यादीच तो मांडतो. किती नु’कसान झालं याची समज बाकीच्यांना यावी ही त्याची अपेक्षा. पण तसं काही झालं असेल असं मात्र वाटत नाही. शेवटी शेवटी तर इतका घायकुतील येतो की आयुष्यातलं सगळं काही आपण ग’मावलं आहे, अशी त्याची देहबोली असते. त्याच्या लहान वयामुळे आपण सगळं गंमतीचा भाग म्हणून पाहतो आणि हा व्हिडियो संपतो. गेल्या वर्षी या व्हिडियोची खूप चर्चा रंगली होती.

आमच्या टीमने ही हा व्हिडियो पाहिला होता पण तेव्हा वायरल व्हिडियोज विषयी लेख लिहीत नव्हती आपली टीम. त्यामुळे आजच्या या लेखातून या व्हिडियो विषयी थोडक्यात लेख लिहिण्याचं ठरलं. आपल्याला मराठी गप्पावरचे लेख आवडतात आणि ते लेख आपण शेअर ही करत असता. त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला हा लेखही आवडला असल्यास, नक्की शेअर करा. तसेच आपल्या टीमने लिहिलेले अन्य नवनवीन लेखही आठवणीने वाचा आणि शेअर करा. धन्यवाद !!!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *