वायरल डान्स व्हिडियोज चा विषय निघाला की काही ठराविक उदाहरणं आपल्या समोर नेहमीच येतात. आपल्या नियमित वाचकांना याची सवय झाली असेल एव्हाना. नवीन वाचकांना सुद्धा सवय होईलच. पण अनेक वेळेस असेही व्हिडियोज आपल्या समोर येत असतात जे वायरल होतात पण त्यांच्या सारख्या व्हिडियोज जी संख्या त्यामानाने कमी असते. जसं की परदेशातील शाळांमध्ये जेव्हा जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रमात भारतीय संगीत, नृत्य यांचा समावेश केला जातो तेव्हा तेव्हा ते व्हिडियोज वायरल झालेले आपण पाहतो. पण त्यांची संख्या त्यामानाने कमी असते. पण आपली टीम असताना असे कधी तरी चर्चिले जाणारे विषयही चर्चिले जातात. आजचा हा लेखही त्याचविषयी आहे. आजच्या या लेखातुन आपण अशा व्हिडियो विषयी जाणून घेणार आहोत जो व्हिडियो परदेशातील एका शाळेतला आहे.
या शाळेतल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त एका सुप्रसिद्ध बॉलिवूडच्या गाण्यावर तेथील भारतीय आणि परदेशी मुलींनी अतिशय सुंदर असा डान्स सादर केला होता. त्याचाच हा व्हिडियो आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा गाण्याचं संगीत कानावर पडत असतं. याचबरोबर चार मुली नाचत नाचत परफॉर्मन्स करण्याच्या मध्यभागी येतात. तिथे त्यांची एक स्पेशल स्टेप ही करतात. गाणं जसं पुढे सरकतं तसं या चार मुलींमध्ये अजून तीन जणी येऊन दाखल झालेल्या असतात. भारतीय गाण्यावर डान्स करत असताना त्यांनी जो अस्सल भारतीय पेहराव केलेला असतो तो अगदी खुलून दिसत असतो. तसंच या समूह नृत्याचं वैशिष्ठय म्हणजे यातील प्रत्येक मुलीने या डान्सची उत्तम तयारी केलेली असते. सहसा परदेशी माणसं भारतीय गाण्यांवर डान्स करताना अपल्यासारखे हावभाव व्यवस्थित करूच शकतात असं नाही. पण या मुली मात्र त्यास अपवाद ठरतात. तसेच अजून एक बाब आवडून जाते ती म्हणजे वैविध्यपूर्ण स्टेप्स चा अंतर्भाव करत हा डान्स बसवलेला असतो.
मग त्यात कधी फेर धरणं असेल तर कधी दोन ते तीन जणींच्या ग्रुप मध्ये येत डान्स करणं असो. त्यांच्या या स्टेप्स सगळ्यांनाच आवडून जातात. त्यात उपस्थित सगळे जणं आणि आपणही असतोच. ही उपस्थित असलेली मंडळी व्हिडियो च्या शेवटच्या काही क्षणांत दिसतात पण त्याचं अस्तित्व मात्र सतत जाणवत असतं. कारण डान्स सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत या सगळ्या मंडळींकडून उत्तम प्रतिसाद मिळत असतो. त्यामुळे वातावरणात एकप्रकारचा उत्साह हा बनून राहतो. कुठची ही कलाकृती घ्या, ती कलाकृती सादर होत असताना अथवा सादर झाल्यावर, रसिकांकडून त्याविषयी उत्तम आणि सकारात्मक प्रतिसाद मिळणं आवश्यक असतं. हा डान्स व्हिडियो त्याचं उत्तम उदाहरण आहे. तीच बाब आपल्यालाही लागू होतेच. आता गेला काही काळ आपली टीम वायरल व्हिडियोज बद्दल लिहीत आली आहे. त्या लेखांना आपण जो प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे आपल्या टीमलाही या विषयावर लिहिण्यास प्रोत्साहन मिळतं.
आपण मोठ्या प्रमाणावर हे लेख शेअर करत असता तेव्हा आम्हाला आमच्या या लेखनकष्टांच चीज झाल्यासारखं वाटतं. आपण मोठ्या प्रमाणावर देत असलेल्या या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद ! यापुढेही आपल्या टीमने लिहिलेल्या लेखांना आपण प्रोत्साहन देत राहाल हे नक्की. आजच्या या लेखात आपण ज्या व्हिडियो विषयी वाचलंत तो व्हिडियो तुम्हाला आवडला असेल अशी खात्री आहे. आपल्याही टीमला हा व्हिडियो आवडला आहेच. जवळपास चार वर्षांपूर्वीचा व्हिडियो असला तरीही त्यातील परफॉर्मन्स मात्र आजही प्रसन्न करणारा आहे. या व्हिडियोतील विद्यार्थिनी आज कुठे असतील माहीत नाही. पण त्यांच्या या परफॉर्मन्सचं मात्र आपल्या टीमला कौतुक नक्कीच आहे. आपल्याला ही या व्हिडियोतील जी बाब आवडली असेल ती आपल्या कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका. तसेच नेहमीप्रमाणे लेख शेअर ही करालच त्याबद्दल मनापासून आभार.
बघा व्हिडीओ :