Breaking News
Home / मनोरंजन / परदेशी लग्नात भारतीय तरुणींनी केला अप्रतिम डान्स, वधूवरांसोबत फॉरेनर्सनासुद्धा नाचण्याचा मोह आवरता आला नाही

परदेशी लग्नात भारतीय तरुणींनी केला अप्रतिम डान्स, वधूवरांसोबत फॉरेनर्सनासुद्धा नाचण्याचा मोह आवरता आला नाही

लग्न म्हंटली की मजा मस्ती ही आलीच. मग हे लग्न जगात कुठेही असो. पण एक मात्र खरं की आपल्याकडे लग्नात जी धमाल चालते ती क्वचितच जगात कुठे असावी. त्यातही या धमाल मस्तीत काही जण इतकी उत्तम नाचतात की त्या लग्नाला चार चांद लागून जातात असंच वाटतं. त्यांच्या नृत्याची भुरळ पडल्याशिवाय राहवत नाही. बरं हे आपल्याच बाबतीत होतं असं नाही तर परदेशातही असं होतं. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडियो आपल्या टीमने आज बघितला. आपल्या वाचकांना याविषयी वाचायला नक्की आवडेल असं वाटून आजचा हा लेख लिहीत आहोत. चला तर मग या व्हिडियो विषयी अधिक जाणून घेऊयात. हा व्हिडियो आहे एका पोलिश (पोलंडचे रहिवासी) जोडप्याच्या लग्नताला. या दोघांच्या लग्नाला अनेक पोलिश नागरिक जमा झालेले दिसतात. त्यात आपल्याला भारतीय वंशाच्या काही मुली आणि महिला दिसतात. यातील दोन मुलींचा या पोलिश लग्नातील डान्स परफॉर्मन्स म्हणजे हा व्हिडियो.

सुरुवातीला या मुली डान्स फ्लोरच्या इथे येतात. कुठे उभं राहायचं हे ठरवत काही सेकंद निघून जातात पण मग मात्र या मुलींच्या डान्सची जादू अशी काही पसरते की संपूर्ण व्हिडियो भर या मुलीच दिसून येतात. सुरुवात होते तेव्हा ‘बोले चुडीयां’ हे सुप्रसिद्ध असं गाणं सूरु होतं. या मुली एकेक करत सरस डान्स स्टेप्स करत परफॉर्मन्स देत असतात. सुरुवातीस या दोघींचं केवळ अवलोकन करणारी उपस्थित मंडळी पुढच्या काही क्षणातच यांच्या परफॉर्मन्स चा भाग होऊन गेलेली असतात. खरं तर आपल्या बाबतीतही तसंच होतं. आपणही एकरूप होऊन त्यांचा डान्स बघत राहतो. पहिल्या गाण्यानंतर मग सुरू होतं एकदम जोशात गायलेलं ‘गल्लां गुडीयां’ हे गाणं. त्यावरही केलेला डान्स उपस्थितांची वाहवा मिळवून जातो. मग अजून एक मस्त परफॉर्मन्स. हा असतो घागरा या गाण्यावर. या गाण्याचे ‘बगदाद से लेके दिल्ली वाया आग्रा’ हे शब्द तर आपल्या ओठांवर नकळत येतात इतकं हे गाणं प्रसिद्ध आहे. या परफॉर्मन्स ची एक खुबी म्हणजे एव्हाना या मुलींच्या डान्सला आपण पाठमोरे पाहत असतो.

पण या गाण्याच्या वेळी कॅमेरामन जागा बदलतात. त्यामुळे आतापर्यंत समोर दिसणारे नवरा नवरी काही क्षणांसाठी आपल्याला दिसत नाहीत. फोकस मध्ये असतात त्या या मुली. पण शेवटी ज्यांचं लग्न आहे त्यांना यात सामील करून घेतल्याशिवाय डान्स पूर्ण होईल का? अर्थातच नाही. यामुळे पुढच्याच गाण्याच्या वेळी या दोन्ही मुली नवरा नवरीला डान्स फ्लोअर वर घेऊन येतात. मग काय पोलिश नवरा बायको आधीच या मुलींवर खुश झालेले असतात. तो सगळा आनंद डान्स फ्लोअर वर निघत असतो. जोडीला या पोरी त्यांना डान्स शिकवायला असतात. सुरुवातीला त्यांना डान्स शिकवताना त्या गंगारतात थोड्या. पण एक दोन क्षणच. क्षणात सावरत त्यांना जमतील अशा स्टेप्स दाखवत या दोघांना त्या नाचवतात. आता नवरा आणि नवरी नंतर वेळ असते ती उपस्थितांनी यात सहभागी होण्याची. या दोन्ही मुली ते ही करतात. त्यामुळे आतापर्यंत केवळ बाजूला उभे राहून डान्सची मजा घेणारी सगळी जण डान्स फ्लोअर वर येतात. त्यात आपल्या एक भारतीय वंशाच्या ताई सुद्धा असतात. या दोन्ही मुलींचं त्यांना कौतुक असतंच.

सोबतच त्यांच्यातही एक प्रकारचा ह्रिदम असल्याचं जाणवतं. त्याही मस्त नाचतात.आतापर्यंत या दोघींनी गाजवलेल्या डान्स फ्लोअरवर सगळी जण आलेली असतात. माहोल अगदी छान बनलेला असतो. मग एक छान धून लागते आणि काही वेळाने हा डान्स संपतो. डान्स संपला तरी आपल्या आणि उपस्थितांच्या मनात या मुलींविषयीच कौतुक भरून आलेलं असतं. अतिशय आत्मविश्वासाने त्यांनी आपली कला सादर केलेली असते. आपल्या टीमला हा व्हिडियो तर आवडला. आपणही हा व्हिडियो बघितला असल्यास आपल्यालाही हा व्हिडियो आवडला असणार. तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्या पसंतीस उतरला असेल अशी अपेक्षा आहे. तेव्हा आपल्या कमेंट्स मधून आपल्या प्रतिक्रिया आमच्या पर्यंत पोहोचू द्यात. तसेच यानिमित्ताने आपण वाचक म्हणून मोठ्या प्रमाणावर आपले लेख शेअर करत असता त्याचा उल्लेख व्हायला हवा. कारण आपल्या या शेअरिंग मुळे आपल्या टीमला जे प्रोत्साहन मिळतं ते शब्दांत वर्णन करता येत नाही. तेव्हा आपलं हे प्रेम आणि लोभ आमच्या टीमवर कायम असू द्या. आपल्या पाठींब्यासाठी मनापासून धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *