सोशिअल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडीओ वायरल होत आहे. ह्या व्हिडीओमध्ये एक फॅन सलमान खानच्या पुढे दिसत आहे. ती व्यक्ती एअरपोर्टवर सलमानसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होती. ८ सेकंडचा हा छोटासा व्हिडीओ लोकं खूप शेअर करत आहे. आणि सलमानच्या ह्या वागणुकीवर अनेक जण त्याच्यावर टीका सुद्धा करत आहेत. तो व्हिडीओ आपण खाली पाहू शकता. इंस्टाग्रामवर ‘सलमान मे लाव’ नावाच्या एका हॅन्डलवर हा व्हिडीओ शेअर केलेला आहे. एअरपोर्टच्या बाहेर मीडिया आणि फोटोग्राफर्स सलमान खानची बाहेर येण्याची वाट पाहत होते. सलमान एअरपोर्टवरून बाहेर येत होता. तितक्यात एक व्यक्ती, जी एअरपोर्ट वरील कदाचित स्टाफमधील दिसत आहे. ती व्यक्ती सलमानच्या पुढे चालू लागते. आणि गेटच्या बाहेर निघण्याअगोदरच तो सलमानसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. सलमान हे बघताच त्या मुलाच्या हातातून फोन खेचून गेट वरून बाहेर जातो. बॉडीगार्ड सुद्धा त्या मुलाला धक्का देऊन सलमान पासून दूर करतात.
व्हिडीओ मध्ये सलमान खान खूप रागात दिसत आहे. आणि तो फॅन कडून फोन खेचून घेतल्यानंतर एकही क्षण थांबला नाही आणि सरळ चालत राहिला. सोशिअल मीडियावर हा व्हिडीओ शेअर होताच लोकांना सलमानची हि वागणूक आवडली नाही. आणि लोकं सलमानवर खूप टीका करत आहेत. सलमानने इतकं गर्व करणे ठीक नाही आहे, असे काही लोकांचे म्हणणे आहे. तर काहींचे म्हणणे आहे कि, अश्या स्वभावामुळे लोकांनी सलमानचे चित्रपट पाहणे बंद केले पाहिजेत. काही लोकं ह्या व्यवहारासाठी त्याला ‘सनकी’ बोलत आहेत. तर सलमानच्या चाहत्यांचे म्हणणे आहे कि त्या व्यक्तीने सेल्फी काढण्यासाठी सलमानची परवानगी घ्यायला हवी होती. आणि हे पहिल्यांदा घडलेलं नाही आहे, जेव्हा सलमानने फोटो घेणाऱ्या फॅन्सच्या हातातून फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला असेल. काही महिन्याअगोदरसुद्धा सलमानने असंच केले होते आणि तेव्हा ती घटना पोलिसांपर्यंत पोहोचली होती.
ह्या अगोदरची घटना २४ एप्रिल २०१९ ची आहे. सलमान मुंबईच्या लिंकिंग रोडवर सायकल वर फिरत होता. त्याच्यासोबत त्याचे बॉडीगार्ड सुद्धा होते. इतक्यात एका प्रवासीने आपल्या फोन मध्ये व्हिडीओ काढायला सुरुवात केली. सलमानने पुढे मागे न पाहता त्याचा फोन हिसकावून घेतला. असे तक्रारीत म्हटले गेले. त्या व्यक्तीने डी. एन. नगर येथील चौकीत सलमान खानवर फोन हिसकावल्याचा आणि गैरवर्तणुकीचा आरोप ठेवत तक्रार दाखल केली होती. चूक स्वीकारण्या ऐवजी सलमानच्या बॉडीगार्डने त्या व्यक्तीच्या विरुद्ध सुद्धा तक्रार दाखल केली होती. त्यांनी तक्रारीत आरोप केला होता कि सलमानच्या परवानगी विरुद्ध ती व्यक्ती त्याचा व्हिडीओ काढत होती. तर व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे होते कि, त्याने सलमानच्या बॉडीगार्ड असेलेल्यांची परवानगी घेतली होती. हि घटना नंतर कशी मिटली, माहिती नाही. चला तर आपण आताच एअरपोर्टवर घडलेला व्हिडीओ पाहूया. व्हिडीओ पाहून एक गोष्ट नक्की आहे कि समोरच्या व्यक्तीने अगोदर सलमानची परवानगी घ्यायला पाहिजे होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सलमानने सुद्धा इतके रिऍक्ट नाही केले पाहिजे होते. तुम्ही व्हिडीओ पाहून तुमचे मत नक्की सांगा.