काही लोकं आयुष्यभर फक्त तक्रारी करण्यात घालवतात. त्यांच्या याच स्वभावामुळे इतरांनाही त्यांचा वैताग येतो. इतरांनाही निगेटीव्ह एनर्जी द्यायला लागतात आणि कामं बरबाद करुन टाकतात. त्यांच्या या स्वभावामुळं सगळे त्यांच्यापासून दूर व्हायला लागतात. काही स्वतः करायचं नाही आणि इतरांनाही करु द्यायचं नाही हा स्वभाव त्यांच्या या सगळ्या गोष्टींना कारणीभूत ठरतोयं. मात्र, या सगळ्या गोष्टींमध्ये काही लोक असे असतात जे परिस्थितीवर मात करतात आणि संपूर्णपणे नव्याने आयुष्याकडे पाहू लागतात. त्यांचा जगण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलू लागतोयं. त्यांना कुठल्याही तक्रीरीसाठी वाव ठेवायचा नसतोयं. आता या काकांचं पहा ना देवानं त्यांना अपं’गत्व दिलंयं. त्यांच्या एका पायामुळे शरीर अर्ध्वयू पडू लागलंयं जिथं अशा लोकांना चालण्यासाठी प्रचंड कष्ट असतात त्या परिस्थितीत काकांनी संपूर्णपणे सायकल भरधाव वेगात नेली. त्यांच्या या विश्वासामुळे एखाद्याला आयुष्याकडंं नव्यानं पाहण्याची उर्जा मिळू लागते. आयुष्याला कलाटणी मिळण्याचा क्षण असतोयं. फक्त काकांनी काय जुगाड लावलाय तो पहा.
एका पायानं सायकल चालवायची कशी हा प्रश्न काकांना पडला नाही. त्यांनी घेतली काठी आणि लावली थेट पँडलला. दिला जोर आणि सायकल भर भर सुरू केली. काठीनं जोर लावत जो सायकलला तिसरा गिअर दिलायं ना अर्थात सायकल गिअरची नाहीये. पण आम्ही आपलं तुम्हाला स्पीड समजावा म्हणून सांगायलो. काकांच्या या जुगाडू स्टाईलंनं भल्या भल्यांना चकित कलेंय. काका काय करतात की आता थांबायचं म्हटलं ना की हळूहळू सायकलचा स्पीड कमी करत जातात आणि गाडी म्हणजे सायकल बाजूला लावतात. काकांच्या या सगळ्या गोष्टीत एक लक्षात आलं की आपल्याकडं काय नाहींयं, कुणी आपल्याला काय दिलं नाही. कुणी आपल्याला मानपान दिला नाही. कुणी आपल्याला गरजेवेळी मदत केली नाही. या सगळ्या गोष्टीत अ़डकून बसण्यापेक्षा आपल्याकडं आहे ते पाहून पुढं जायला शिकावं. माणसानं अर्धा ग्लास रिकामी की अर्धा भरलेला या वादात पडूच नये. त्यांच्या या सगळ्या वादात आयुष्य खर्च होऊन जातंयं. आहे ते आपलं. देवानं दिलं ते माझं. देवाच्या कृपेनं आनंद. देवाच्याच कृपेने सारंकाही. हे सगळं देवाचचं. या उक्तीप्रमाणे जगत रहायचं.
दि’व्यांग असल्यानंतरही काकांनी या स्पीडमध्ये त्यांची सायकल नेऊन दाखवली तर आपल्याला देवानं दोन हात, दोन पाय, दोन डोळे, दोन कान, आणि बरचं काही दिलंयं. त्यामुळं आपल्याकडं काय नाही. माझ्याकडं काय नाही, माझ्याकडं काय आहे यात रडत बसू नये. आयुष्यात पुढे जात रहावं. मागे वळून पाहू नये. मागे काय सुटलं, काय राहिलं यापेक्षा काकांनी ज्या भरधाव वेगानं आपली सायकल नेली ना त्याच वेगाने आपले विचार न्यावेत. त्यांच्या या सगळ्या गोष्टीत कुठेही आपण कमी पडता कामा नये. दृष्टीकोन शिकून घ्यावा. प्रत्येक संकट, प्रत्येक आव्हान सकारात्मकतेनं घ्यावं. जिद्दीनं पुढं जावं, आपल्याला काय हवं नकोयं ते स्पष्ट करावं आपल्या बळानं त्यावर मात करावी. मग कितीही काहीही झालं तरीही आपल्याला आपल्या यशाच्या शिखरावर जाण्यासाठी कुणीही रोखणारं नसतं. आपल्या प्रयत्नांना यश येत जातं. एक फेमस डायलॉग आहे माहीतीयं ना. “कितनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने की कोशिश की है, की हर जर्रे ने तुम्हे मिलाने की कोशिश की है.” असंचं असतंयं जगाची रितही अशीच असतेयं.
बघा व्हिडीओ :