Breaking News
Home / मनोरंजन / परिस्थिती कशी का असेना आपल्याला जीवनाचा आनंद घेता आलं पाहिजे, एकदा बघा हा व्हिडीओ

परिस्थिती कशी का असेना आपल्याला जीवनाचा आनंद घेता आलं पाहिजे, एकदा बघा हा व्हिडीओ

शेतकरी निसर्गाचा खरा मित्र आहे. कारण त्याचे जमिनीशी असलेलं नातं हे मुल आणि आईप्रमाणे असतं. आजही आपल्या देशात शेतकरी जमिनीला आईचा दर्जा देतो आणि मेहनत करून तिच्यातून धान्य पिकवतो. त्यामुळे जगाचा खरा पोशिंदा शेतकरीच आहे. मात्र असं असूनही आपल्या देशात शेतकऱ्यांची अवस्था दयनिय आहे. जगाला आपल्या कष्टाने पोसणाऱ्या शेतकऱ्यावरच आत्मह’त्या करण्याची वेळ येते तेव्हा मन गलबलून जाते. खरंतर स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली तरी शेतकऱ्यांची अवस्था काही विशेष बदललेली नाही. मात्र एवढं करूनही शेतकरी खऱ्या अर्थाने सुख-समाधानकारक आयुष्य जगतो आहे. लाखोंची घरे, लाखोंच्या गाड्या, आयुष्यात आर्थिक स्थिरता, विना कष्टाचा जॉब असूनही शहरातील कित्येक लोकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्याच्या तुलनेने शेतकरी बघा… त्याच्याकडे यापैकी काहीही नसलं तरी तो जे आयुष्य जगत आहे ते एकदम समाधानाने आणि आनंदाने… जीवनात खूप कष्ट असूनही त्याला आनंदाने सामोरे जात आयुष्य मनसोक्तपणे जगणाऱ्या आणि जगण्याचा उत्सव करणाऱ्या काही शेतकऱ्यांचा एक मूड फ्रेश करणारा व्हिडीओ आमच्याकडे आला आहे.

या व्हायरल व्हिडीओत फार काही वेगळं नाही. पण एक सकारात्मक दृष्टिकोन आहे, ज्यातून आपल्याला काम एन्जॉय करायची आयडिया आणि ऊर्जा मिळू शकते. आपल्याला साधे गॅस सिलिंडर उचलायचे म्हटले तरी आपण कमरेत वाकून चार ठिकाणी अंगाला ताण देतो, मात्र शेतकरी आणि त्यांची कवळी कवळी पोरं-पोरी अशे कणाकणा उसाच्या मोळ्या उचलतात, त्या उंचीवर फेकतात, मोठी आडदांड जनावरे कंट्रोलमध्ये ठेवतात, झाडावर चढून मव्हाळ(मधमाश्यांचे पोळे) झाडतात. रात्रीची लाईट असल्यावर साप, विंचू अशा गोष्टींना न घाबरता पिकाला पाणी द्यायला जातात. आयुष्यात एवढे टास्क, स्ट्रगल असूनही ते बिनधास्त असतात. जे काही करतात ते खुल के आणि दिल से करतात. आजच्या या व्हायरल व्हिडीओत पण त्यांनी काम करता करता ट्रॅक्टरवर लागलेल्या जुन्या गाण्यांवर डान्स केला आहे. विशेष बाब म्हणजे डान्स करताना ते काम पण करत होते. लाखो रुपये घालून जो आनंद मिळणार नाही, तो आनंद त्यांना काम करता करता मिळत होता, यापेक्षा माणसाला आयुष्यात अजून कोणतं सुख पाहिजे असतं.

सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे शेतकरी ज्या गाण्यावर नाचत आहेत, ते गाणं दादा कोंडके यांच्या मला घेऊन चला या चित्रपटातल आहे. पोरी जराशी लावशील का हे त्याकाळी भलतंच गाजलेलं गाणं होतं. त्या गाण्यावर हे शेतकरी जमेल तसा डान्स करत होते. इथे ते कसं नाचतात ते महत्वाचे नसून त्यांनी जो आनंद घेतला आहे, तो महत्वाचा आहे. कितीही स्ट्रगल असेल तरीही आनंद कसा घ्यायचा, या व्हिडीओतुन शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वावर हाय तर पावर हा भावांनो…

आता हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.