Breaking News
Home / माहिती / पहिल्या आणि दुसऱ्या मुलाच्या जन्मामध्ये किती अंतर असायला हवे

पहिल्या आणि दुसऱ्या मुलाच्या जन्मामध्ये किती अंतर असायला हवे

कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात आई वडील बनण्याचा क्षण खूप खास असतो. काही जोडपे आपली आर्थिक परिस्थिती आणि शारीरिक प्रकृती पाहून फक्त एकाच मुलाला जन्म देतात. तर काही लोकं कुटुंबाचा दबाव किंवा काही अन्य कारणांमुळे दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी प्लॅनिंग करू लागतात. अनेकदा घाईगडबडीत लोकं हि गोष्ट लक्षात ठेवायची विसरून जातात, कि त्यांच्या मुलांच्या जन्मामध्ये किती अंतर असायला हवे. जरी मुलांना जन्म देणे किंवा त्यांच्यासाठी काही प्लॅनिंग करणे, हा प्रत्येक कुटुंबाचे वैयक्तिक प्रश्न असतो. परंतु आई आणि मुलाच्या शरीराची प्रकृती पाहता काही गोष्टी ध्यानात ठेवणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही दुसऱ्या बाळाची प्लॅनिंग करत असाल तर त्यासाठी फक्त मानसिकदृष्ट्या तयार असणे गरजेचे नाही, तर शारीरिकदृष्ट्या सुद्धा सक्षम असणे तितकेच गरजेचे आहे. जर तुम्ही दोन्ही बाळांसाठी मानसिकदृष्ट्या तयार असाल, तर तुम्ही दुसरी बाजू सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे. महिलांनी हि गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे कि, त्या पहिल्या प्रेग्नन्सीनंतर पूर्णपणे रिकव्हर झालेल्या असतील आणि दुसऱ्या बाळाला जन्म देण्यासाठी त्यांचे शरीर सक्षम असेल. आजच्या लेखात आम्ही तुम्हांला सांगणार आहोत कि, दोन मुलांच्या जन्मामध्ये किती अंतर असायला हवे आणि काय आहे ह्यामागचे कारण.

तुम्हांला दुसरे बाळ केव्हा पाहिजे, हे तर तुमच्यावर निर्भर असते. परंतु दुसऱ्या बाळाबद्दल विचार करण्याअगोदर आईची शारीरिक प्रकृती विचारात घेणे आवश्यक आहे. जेव्हा महिला पहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर संपूर्णपणे स्वस्थ असतील, तेव्हाच दुसऱ्या मुलाबद्दल विचार केला पाहिजे. खरंतर, दुसऱ्या मुलामध्ये खूप कमी किंवा जास्त अंतर होण्यामुळे त्याचे काही फायदे आणि नुकसान सुद्दा आहेत. अशामध्ये योग्य अंतर किती असायला हवे. चला तर जाणून घेऊया. पहिल्या आणि दुसऱ्या मुलामध्ये १२ ते १८ महिन्यांचा अंतर असल्यामुळे त्यांच्यामध्ये खोल नातं निर्माण होतं. परंतु दोन मुलांमध्ये १२ ते १८ महिन्यांचा हा कमी कालावधी असल्यामुळे आईच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ शकतो. खरंतर, दोन्ही मुलांचे स्तनपान करणे, रात्रभर त्यांच्यासोबत जागं राहणं, दोन्ही मुलांची जबाबदारी एकाचवेळी घेण्यामुळे आईच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ शकतो. एका अभ्यासानुसार, पहिल्या आणि दुसऱ्या मुलाच्या जन्मामध्ये कमीत कमी १८ महिन्यांचे अंतर असणे गरजेचे आहे. कारण जर का कमी अंतर असल्यामुळे दुसऱ्या मुलाची प्री-मॅचुर डिलिव्हरी होण्यासोबत मुलाचे वजनसुद्धा कमी होण्याची भीती असते. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, पहिल्या आणि दुसऱ्या मुलांच्या जन्मामध्ये जवळजवळ २ वर्षांचे अंतर असायला हवे. ह्या बाबतीत त्यांचे मत असे कि, दोन्ही मुलांच्यामध्ये दोन वर्षांचे अंतर असण्याने आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम राहते.

जर दोन मुलांच्या जन्मांमध्ये ३ वर्षांचे अंतर असेल तर पहिला मुलगा थोडा समजूतदार होऊ लागतो. सोबतच मुलाला जन्म दिल्यानंतर आणि स्तनपान केल्यानंतर आईच्या शरीरात आलेली कमजोरी त्यावेळी पूर्णपणे ठीक झालेली असते. ह्याशिवाय मुलांच्या वयात अंतर असल्यामुळे आई वडील दोन्ही मुलांचे योग्यप्रकारे पालन करू शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, पहिल्या आणि दुसऱ्या मुलाच्या जन्मामध्ये जवळजवळ २४ महिन्यांचे अंतर असणे खूप गरजेचे आहे, कारण २४ महिन्यांमध्ये महिलेची शारीरिक प्रकृती पूर्णपणे ठीक झालेली असते. जर तुम्ही २४ महिन्यांपेक्षा अगोदरच दुसऱ्या बाळाला जन्म द्यायचा विचार करत असाल तर कमीत कमी दोन मुलांमध्ये १८ महिन्यांचे अंतर जरूर ठेवा. परंतु एका आरोग्य तज्ज्ञांचे हे सुद्धा मत आहे कि, दोन मुलांच्या जन्मामध्ये तीन किंवा त्यापेक्षा जास्त अंतर असण्याने प्रेग्नन्सी आणि दुसऱ्या मुलाच्या जन्मामध्ये थोडी समस्या येऊ शकते.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.