बॉलिवूड मधे काही जोड्या आहेत ज्यांना खरे प्रेम मिळाले. परंतु अश्या सुद्धा जोड्या आहेत कि, ज्यांना खरे प्रेम मिळून सुद्धा एकट्याने आयुष्य जगावे लागते. लग्न करून एकत्र राहू शकले नाहीत आणि नंतर वेगळे झाले. यामधील काहींनी पुन्हा लग्न केले तर काही एकट्यानेच आपले आयुष्य जगत आहेत. आज आम्ही तुम्हांला अश्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्याआपल्या पती पासून वेगळे झाल्यानंतर पुन्हा लग्न केले नाही.
१ मनीषा कोईराला
मनीषा कोईरालाने बिझनेस मॅन सम्राट दहल सोबत लग्न केले. या दोघांची ओळख फेसबुक वर झाली होती. मनीषाने 2010 मध्ये लग्न केले. परंतु हे नातं जास्त काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या केवळ २ वर्षानंतरच म्हणजे 2012 मध्ये ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. परंतु त्यानंतर मनीषाने दुसरे लग्न केले नाही.
२ संगीता बिजलानी
संगीता बिजलानीने सलमान खान बरोबर १० वर्ष डेट केले, त्यांचे लग्न होणार होते पण काही कारणामुळे लग्न होऊ शकले नाही. त्यानंतर १९९६ मध्ये क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन सोबर लग्न केले. परंतु २०१० मध्ये हे दोघेही वेगळे झाले. नंतर संगीता बिजलानीने दुसरे लग्न केले नाही.
३ चित्रांगदा सिंह
अभिनेत्री चित्रांगदा सिंहने गोल्फर ज्योती रंधावा सोबत लग्न केले. परंतू दोघे २०१३ मध्ये त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि २०१४ ला ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. चित्रांगदा आणि ज्योती रंधावाचा एक मुलगा आहे. तो आपल्या आई सोबत ( चित्रांगदा ) सोबत राहतो. आजही ती एकटीच राहते. चित्रांगदाला एक मुलगा असून त्याचे नाव झोरावर आहे.
४ अमृता सिंह
अमृता सिंहने १९९१ साली सैफ अली खान सोबत लग्न केले. त्यानंतर तिने चित्रपटात काम करणे बंद केले. कारण त्यांची मुले सारा खान आणि इब्राहिम यांची व्यवस्थित देखभाल व्हावी. परंतु लग्नाच्या १३ वर्षा नंतर २००४ मध्ये दोघेही वेगळे झाले. नंतर सैफ करीना कपूर सोबत विवाहबध्द झाला पण अमृता सिंह ने दुसरे लग्न केले नाही. त्यानंतर ती एकटीच राहिली. सैफ अली खान पासून अमृता सिंगला दोन मुले झालीत. मुलगी सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम अली खान. मुलगी सारा अली खान हि बॉलिवूडमध्ये काम करत असून ती देखील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळख मिळवत आहे.
५ महिमा चौधरी
महिमा चौधरी टेनिस खेळाडू लिएन्डर पेस बरोबर रिलेशनशिप मधे होती, पण त्यांचे नाते काही कारणामुळे पुढे जाऊ शकले नाही. त्यानंतर महिमा चौधरीे २००६ मध्ये उद्योगपती बॉबी मुखर्जी सोबत विवाहबध्द झाली. दोघांची एक मुलगी असून मुलीचे नाव आरियाना आहे. परंतु हे दोघेही २०१३ ला एकमेकांपासून वेगळे झाले. तेव्हा पासून महिमा आपल्या मुलीसोबत पतीपासून वेगळी राहते.
६ कोंकणा सेन शर्मा
हिंदी व्यतिरिक्त बंगाली चित्रपटात स्वतःची वेगळी ओळख बनवलेली अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने २००७ पासून अभिनेता रणवीर शौरीला डेट करणे सुरु केले. २०१० मध्ये दोघे विवाहबध्द झाले. २०१५ मध्ये दोघे वेगळे झाले. दोघांनाही एक मुलगा असून मुलाचे नाव हरून आहे. त्याची देखभाल दोघेही करतात.
७ पूजा भट
निर्माता महेश भटची मुलगी अभिनेत्री पूजा भटने मनीष मखिजा सोबत ऑगस्ट २००३ मध्ये प्रेम विवाह केला. परंतु लग्नाच्या 11 वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ह्याबाबत पूजाने स्वतः ट्विटर वर खुलासे केले होते.