Breaking News
Home / जरा हटके / पहिल्या मजल्यावरून पडली होती मुलगी, परंतु आईवडिलांनी त्यानंतर केले ते खरंच कौतुकास्पद होते

पहिल्या मजल्यावरून पडली होती मुलगी, परंतु आईवडिलांनी त्यानंतर केले ते खरंच कौतुकास्पद होते

मुलं परमेश्वराचे रूप असतात, ते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणतात. दिल्लीची धनिष्ठा ८ जानेवारी रोजी खेळता खेळता पहिल्या मजल्यावरून खाली पडली होती. काही दिवसांच्या उपचारानंतर डॉक्तरांनी तिला ब्रेन डे’ड घोषित केले. अशामध्ये तिच्या आईवडिलांनी काळजावर दगड ठेवत मुलीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीतील रोहणी परिसरात राहणारे आशिष कुमार सांगतात कि, घराच्या पहिल्या मजल्यावरून पडल्यानंतर धनिष्ठा बे’शुद्धावस्थेत गेली होती. तिला कुठे ज’खम झाली नव्हती किंवा र’क्त सुद्धा येत नव्हते. आम्ही तातडीने तिला आनन फानन येथील सर गंगाराम रु’ग्णालयात घेऊन आलो. इथे डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले परंतु ते निष्फळ ठरले. त्यांनी ११ जानेवारी रोजी मुलीला ब्रेन डे ड असे घोषित केले.

दिल्ली येथील राहणारी २० महिन्यांची धनिष्ठा मृ त्यूनंतरही ५ लोकांना नवे जीवन देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य देऊन गेली. आता ती जगातील सर्वात कमी वयात अवयव दान करणारी मुलगी बनली आहे. आशिष म्हणतात कि रुग्णालयात असतांना त्यांनी आणि त्यांच्या पत्नी बबिता ह्यांनी अनेक रुग्णांना तरसताना पाहिलं आहे ज्यांना अवयवाची खूप गरज होती. अश्या मध्ये जेव्हा मुलीचा मृ त्यू झाला तेव्हा आम्ही विचार केला कि तिच्या अंतिम संस्कारासोबत तिचे अवयव सुद्धा सोबत जातील. त्यानंतर त्याच्यामुळे कोणते काम होऊ शकत नाही. त्यापेक्षा अवयव दान केले गेले तर अनेक लहान जीवांचे आयुष्य वाचू शकते. ह्याच विचारामुळे आम्ही अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यासाठी आमची काऊन्सलिंग सुद्धा झाली होती, परंतु आम्ही सुद्धा रुग्णालयात राहून रुग्णांना पाहून अगोदरच असं मनात ठरवलं होतं.

२० महिन्यांची स्व’र्गीय धनिष्ठा जगातील सर्वात छोटी अवयव दाता आहे. तिच्या शरीरातून हृ’दय, लि’व्हर, दोन्ही कि’डनी आणि कॉ’र्निया काढून गरजवंत रुग्णांना प्रत्यारोपित केले गेले. अश्याप्रकारे हि छोटी परी जाता जाता पाच लोकांच्या जीवनात प्रकाश देऊन गेली. दुखी वडील आशिष सांगतात कि, “आपल्या छोट्या मुलीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेणं खूप कठीण गोष्ट होती. परंतु ज्याप्रकारे आम्ही आमच्या मुलीला गमावलं, अगदी तसंच दुसऱ्या आई वडिलांनी अवयव न मिळाल्यामुळे आपल्या मुलांना गमवावे, असंही आम्हांला नको होते.” तुमच्या माहितीसाठी भारतात अवयवदान करण्याचे प्रमाण जगाच्या तुलनते खूप कमी आहे. इथे अवयव दान करण्याच्या कमतरतेमुळे प्रत्येक वर्षी सरासरी ५ लाख भारतीयांचा मृ त्यू होतो. ह्यामुळे देशातील जनतेने अवयव दानाचे महत्व समजून पुढे यायला हवं.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.