या व्हीडिओतील मागे असलेली इमारत पहा. या इमारतीच्या सर्वात वरच्या फ्लोअरलाही पाणी पोहोचवलं जातं. त्या पाण्याच्या या सगळ्या फोर्स इतका वेगवान असतो की धिप्पाड माणूसही त्या पू’रात वाहून जाईल. आता मुंबईकरांना पाईपलाईन फुटणं आणि फवारे उडणं हे काही नवीन गोष्ट नाही. अशीच एक पाईपलाईन दुपारच्या कडाला फुटली. पार इमारतीच्या लागोलाग उंच असा फवारा निघू लागला. पाण्याच्या या फवाऱ्यामुळं मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जातं. ज्यांच्या घशाला कोरड पडलेली असतात. जी पाण्यानं तहानेनं व्याकूळ होऊन दोन घोट पाण्यासाठी वणवण करत असतात अशांना या पाण्याच्या फवारा पाहून कधीही आनंद होणार नाही. पण या सगळ्यात जी माणसं भल्यामोठ्या टॉवरमध्ये राहत असतील त्यांना पाहून मात्र, कारंज्यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. भारत आणि इंडियामधील हाच नेमका फरक आहे. बरं ते असो. त्यात किती वादात पडायचं हा ज्याचा त्याचा विषय परंतू, या बीएमसी कर्मचाऱ्यांच्या चिकाटीबद्दल पहा.
त्यानी इमारती एवढ्या फवाऱ्याला एका खुट्टीत गप्प करुन सोडलं. त्यांच्या या सगळ्या कामगिरीचा व्हीडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झालयं की बीएमसीतील या कर्मचाऱ्यांचं कौतूक होऊ लागलंयं. फवारा हा १४ फूट उंचीचा होता. पण या गड्यानं त्याला दोन बुक्कीत गप्प गार केला. फवारा इतका फोर्सफूल्ली होता की चार माणसांना धरुन ऐकेनात. ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटली तिची दुरुस्ती करायला जेमतेम चार दिवस लागतील. सरकारी काम आणि सहा महिने थांब हे उगाच नाही ना म्हणत त्याच्या मागे अशीच कारणं असतातय नव्हं. त्यामुळे तोवर काय करायचं या पाईपलाईनचं सगळं काम सुरळीत होण्यासाठी दुरुस्तीसाठी संमत्ती घ्यावी लागल, सायबाची सही करावी लागल. साहेब सही करुन देईस्तोवर पाण्याला असं वाहत सोडायचं का? त्याचा बंदोबस्त करायला नको का म्हणून गोल भोकात चौकोनी खुट्टी टाकून गड्यांनी पार कार्यक्रमच करुन टाकला. पार पाण्याचा फव्वारा उंचं जात होता. या फवाऱ्याच्या तोंडावर जाऊन त्याला खुट्टी लागली. ठोकायचं कसं हे पालिकेच्या लोकांना शिकवायची गरज भासत नाही. त्यामुळ त्यांनी ठोकायचं काम अगदी चोख केलं. या ठोका ठोकीत एक थेंबही पाणी वाया गेलं नाही. त्यानी पार खुट्टी जिथून पाणी वाहत जात होते तिथेच बसवून टाकली.
पुढे आता कार्यवाही होईल पाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती होईल. वेल्डिंग होईल. पाणी सुरळीत सुरू होईल पण तोवर जो काही जुगाड या पालिकेच्या कर्मचाऱ्याुंनी केला आहे. तो फक्त भारतातच रहाला हवा. कुठे बाहेर जाता कामा नये. हे सगळे जुगाडू भारतातच मिळतील. अशा समस्यांकडं अमेरिकेत पण उत्तर नसतील आता हीच परिस्थिती अमेरिकेतली असती तर कुणी भिजून अशी खुट्टी भोकात बसवली नसती. पण या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना ते सुचलं. त्यांच्या या सगळ्या प्रकारानंतर शेकडो लीटर पाणी वाचलं. असं काम कुणा येड्या गबाळ्याचं नाही बाबा, त्यांच्या या सगळ्या कामाबद्दल त्यांना आजचा अनुभव नसतो तो वर्षानुवर्षे पासून मिळत आलेला असतो. कुणाच्याही नादी लागा पण जुगाडू लोकांच्या नको ते का हे या व्हीडिओतून नक्की जाणवेल. कुणाला कसं खुट्टीत बसवायचं हे जुगाडू लोकांना चांगलंच माहिती असतंयं. त्यामुळं या सगळ्या गोष्टींकडं जितकं तुम्ही आम्ही कॅज्युअली बघतो तितकं सोप्पं काम नाहीये हे, या व्हीडिओतून दिसून येतं. अनायसे व्हीडिओ रेकॉर्ड झाला म्हणून अन्यथा अशा हिरोजची स्टोरी काही बाहेर पडता पडत नाही.
बघा व्हिडीओ :