Breaking News
Home / जरा हटके / पाकिस्तानच्या दोन मुली रस्ता चुकून भारताच्या हद्दीत आल्या होत्या, परंतु भारतीय आर्मीने जे केले ते पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल

पाकिस्तानच्या दोन मुली रस्ता चुकून भारताच्या हद्दीत आल्या होत्या, परंतु भारतीय आर्मीने जे केले ते पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल

विविध देश एकमेकांशी भौगोलिक सीमांनी जोडले गेलेले आहेत. या सीमांच रक्षण करण्यासाठी त्या त्या देशांचे लष्कर सदैव तैनात असतात. हेतू अर्थातच हा की आपल्या देशात कोणीही चोरी छुपे येऊ नये, घुसखोरी करू नये आणि देशविघातक कृत्ये घडू नयेत. त्यातही काही देशांच्या सीमांवर असलेला बंदोबस्त तर अतिशय कठोर असतो. त्यामुळे एखादी व्यक्ती चुकून जरी शेजारील देशात गेली तरी त्यांना पुन्हा त्यांच्या मायदेशात जाण्यास अटकाव केला जाऊ शकतो. भारत आणि पाक सीमा हे याचं उत्तम उदाहरण. सीमेपलिकडून भारतात जर कोणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर अर्थातच त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे अधिकार आपल्या सैन्यदलांना आहेतच. पण काही काळापूर्वी अशी एक अपवादात्मक घटना घडली होती की या नियमांना काहीशी बगल दिली गेली होती. अर्थात हे सगळं घडत असताना देशहित प्रथम राखले जाईल याची पूरेपूर काळजी घेतली होती.

झालं असं होतं की सना आणि लाईबा या दोन पाकिस्तानी मुली एल. ओ. सी.जवळ असलेल्या भागात राहातात. त्यांच्या घरी झाले वादविवाद आणि त्यांच्या भावाने त्यांना मारलं. या घटनेमुळे या दोन्ही मुली त्यांच्या घरातून निघून दुसऱ्या ठिकाणी जात होत्या. त्या पायीच निघाल्या. पण पायी जाऊन जाऊन किती दूर जाणार. त्यामुळे जशी संध्याकाळ सरत आली आणि रात्र होऊ लागली तशा त्या जंगलात थांबल्या. पण त्यांच्या या प्रवासात त्या भारतीय सीमाभागात आल्याचं त्यांना कळलं नसावं. सकाळी गस्तीवर असलेल्या आपल्या भारतीय जवानांनी त्यांना हटकलं. त्यांची तपासणी केली. त्यांच्या जवळ एखादं शस्त्र अथवा इतर काही हानीकारक गोष्टी नाही ना, याची खात्री करून घेतली. पण त्यांच्यापासून धोका नाही हे पटल्यावर मग आपल्या जवानांनी त्यांना धीर दिला. तुम्ही आमच्या मुलींप्रमाणे आहात, असं म्हणत त्यांना जवळच असलेल्या मुक्कामावर घेऊन गेले. जवानांनी तोशीस न लागू देता दिलेल्या वागणूकीमुळे मुलीही सावरल्या. त्यांना कल्पना आली की हे जवान आपल्याला त्रास देणारे नाहीत, उलट मदतच करणारे आहेत.

मग जवानांनी त्यांच्या कडून त्यांच्या नातेवाईकांची माहिती घेतली. त्यांच्याशी संपर्क केला आणि मुली सुरक्षित असल्याचं सांगितलं. काही वेळ त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांना खाऊ घातलं आणि मग यथावकाश त्यांची रवानगी त्यांच्या कुटुंबाकडे करण्याची व्यवस्था करण्यात आली. ती झाल्यावर मग भारत पाकिस्तान सीमेवरील पाकिस्तानी जावनांकडे या दोन्ही मुलींना सुपूर्द करण्यात आलं. तसेच त्या अनाहूतपणे आल्या होत्या, त्यामुळे त्यांना ताटकळत ठेवण्यात आले नाही. अगदी काही तासांत त्यांना पाकिस्तानी जवानांकडे सुपूर्द केले. सोबत त्यांना भारतीय जवानांच्या वतीने काही भेटवस्तू ही देण्यात आल्या. या सगळ्या घडल्या प्रकारात, कौतुकाची बाब ही की या मुलींपासून आपल्या देशास काही धोका नाही हे कळल्यावर, त्यांना स्त्रीदाक्षिण्य दाखवत आणि लाल फितीत अडकवून न ठेवता त्यांची त्वरित सुटका केली गेली.

देशाचं रक्षण करत असताना आणि आपलं कर्तव्य निभावतानाही आपल्या जवानांनी माणुसकीचे दर्शन घडवत स्त्रीदाक्षिण्य दाखवलं याचं आपल्या टीमला तर कौतुक आहेच. आपल्याला ही हा लेख वाचल्यावर त्यांचा अभिमान वाटला असणार हे नक्की. या लेखाच्या निमित्ताने आपल्या जवानांना त्रिवार वंदन.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. आपल्या प्रतिक्रिया, सकारात्मक सूचना यातून आमची टीम सातत्याने विविध गोष्टी शिकत असते. त्यानुसार विषयांमध्ये बदल करत असते आणि लिखाणातही, हेतू हा की आपल्याला उत्तमोत्तम लेख वाचता यावेत. तेव्हा आपल्या कमेंट्स मधून आपला स्नेह वाढत राहू द्या. आमच्या टीमवर असलेला आपला लोभ वृद्धिंगत होत राहू दे हीच सदिच्छा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *