Breaking News
Home / जरा हटके / पाकिस्तानी मंत्र्याचा येड्याचा बाजार, उदघाटन करताना कैची खराब झाली तेव्हा ह्या मंत्र्याने काय करामत केली बघा

पाकिस्तानी मंत्र्याचा येड्याचा बाजार, उदघाटन करताना कैची खराब झाली तेव्हा ह्या मंत्र्याने काय करामत केली बघा

राजकारणी कुठेचेही असोत, त्यांना लोकप्रियता ही हवी असते. राजकारणासारख्या लोकाभिमुख क्षेत्रात काम करत असल्याने हे योग्यच म्हणायला हवे. त्याबाबत कुणाचेही दुमत नाही. पण यातील काही राजकारणी मात्र लोकप्रियता आणि सवंग लोकप्रियता यात गल्लत करतात आणि मग टीकेचे धनी ठरतात. यात आपल्या शेजारील देशातले राजकारणी ही आलेच. आज आपल्या टीमने पाहिलेल्या या व्हिडियोतून तर हे सरळ सरळ दिसूनच येतं.

हा व्हिडियो आहे पाकिस्तानातील एका शो रूममधला. बहुधा पाकव्याप्त पंजाब प्रांतातील असावा. कारण या व्हिडियोत दिसणारे राजकारणी हे त्या प्रांताशी निगडित आहेत, असं कळतं. कदाचित स्थळ वेगळं असू ही शकतं. असो. तर सध्या या महाशयांनी या शो रूमच्या वेळी केलेल्या वागणुकीमुळे मात्र ते चर्चेत येण्याची शक्यता आहे. झालं असं की या महाशयांना त्या शो रूमच्या उद्घाटनप्रसंगी बोलावलं होतं. ते सुद्धा गेले.

शो रुमच उद्घाटन होणार आणि समोरची फित कापली जाणार ही वेळ आली होती. तेव्हाच लक्षात आलं की त्यांच्या हातात असलेल्या कैचीला काहीच धार नाही. त्यांनी एकदा कापून पाहिली ती फित, तर काही होईना. मग पुन्हा एकदा प्रयत्न केला. तेव्हाही तेच. त्यांनी तक्रार ही केली. पण कैचीला धार नाही आणि तात्काळ दुसरी कैची उपलब्ध असावी, तर तेही चिन्ह दिसेनात. ज्यांनी हे सगळं व्यवस्थापन पाहिलं त्यांचं यानिमित्ताने तर हसं झालंच. पण पूढे या मंत्र्यांनी थोडा वेळ थांबावं ना? दुसरी कैची आणली जाईल याची वाट बघावी. कारण जास्तीत जास्त काय तर थोडा वेळ खोळंबा झाला असता. पण नाही ना. साहेबांनी घेतली ती फित आणि लावली थेट तोंडाला. तोंडाने ती फित तोडायला लागले. बरं समोर कॅमेरा चालूच. हल्लीच्या सोशल मीडियाच्या जमान्यात असं काही दिसलं की खाद्यच असतं ते. कॅमेरावाला पण रेकॉर्ड करतो आहे.

इथे या महाशयांनी एव्हाना दोनवेळा प्रयत्न करून झाले होते. तिसऱ्यांदा मात्र त्यांनी जो जोर लावला तो थेट त्या फितीचे दोन तुकडे करूनच ते ऐकले. मग दोन हातात फितीचे दोन तुकडे घेऊन अगदी पोज ही दिली. या प्रकरणी सगळेच जण हसत होते. त्यात हे महोदय सुद्धा होते. मग हा सगळा घोळका पुढे आला आणि व्हिडियो संपला.

याविषयी अजून काही बोलावं असं वाटत नाही. पण आपण वाचक म्हणून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला कसा वाटला हे सांगायला सुद्धा विसरु नका. कारण आपण दिलेल्या प्रतिक्रियांतून आम्हाला नवनव्या गोष्टी शिकता येतात. तसेच प्रोत्साहन ही मिळतं. यातूनच मग नवनवीन लेख लिहिले जातात आणि ते तुम्हाला आवडतात. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आमच्या पर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *