Breaking News
Home / मनोरंजन / पाठीमागून ट्रेन येत असताना सुद्धा ह्या तरुणाने रेल्वे रुळावर उतरून जे कृत्य केले ते पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल

पाठीमागून ट्रेन येत असताना सुद्धा ह्या तरुणाने रेल्वे रुळावर उतरून जे कृत्य केले ते पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल

सोशल मीडियावर अतिशय मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ तर असे असतात जे पाहून हसू आवरणं कठीण होतं. आपल्या सर्वांना प्राण्यांचेही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. प्राण्यांचे व्हिडीओ आवर्जून बघणारे अनेक लोक आहेत. यातील काही व्हिडिओ अतिशय भीतीदायक तर काही मजेशीर असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. गेल्या काही दिवसांपासून भूतदया म्हणजे प्राणीमात्रांविषयी दया, माया, ममता दाखवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर जास्त व्हायरल झालेले दिसून येतात. या व्हिडीओत प्राणी आणि मानव प्राणी यांच्यात असणारे प्रेम दिसून येते. प्राणिप्रेमी मंडळी आवर्जून असे व्हिडीओ शेअर करतात तर काही प्राणिप्रेमी मंडळी स्वतः आपल्या कृतीतून प्रेम दाखवून देतात.

व्हिडीओत व्हायरल होणारे कधी जंगलातले प्राणी असतात तर कधी घरचे पाळीव. या सगळ्यातुन एकच निष्कर्ष निघतो, ते म्हणजे सोशल मीडियावर एकमेकांविषयी दाखवलेल्या प्रेमाचे व्हिडीओ व्हायरल होऊ शकतात. अशातच आता एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो लाखो लोकांनी पाहिला, सदर घटना घडत असताना अनेक लोक तिथे उपस्थित होते मात्र त्या प्राणिमात्राला वाचवण्यासाठी एकच व्यक्ती उतरला.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपल्याला दिसून येईल की, एका रेल्वे स्टेशन वर एक कुत्रा रेल्वे ट्रॅकवर पडला आहे आणि ट्रेन येत असताना एका मुलाने आपला जीव धोक्यात घातला आणि रेल्वे ट्रॅकवर ऊडी मारून कुत्र्याचा जीव वाचवला आहे. सुदैवाने ही घटना ट्रेन ऑपरेटर बघत असल्याने त्यानंही ट्रेनचा स्पीड वाढवला नाही. ही घटना मुंबईत घडली असल्याचे समोर आले आहे, मात्र नेमका हा स्वतःचे प्राण धोक्यात घालून कुत्र्याचे प्राण वाचवण्यासाठी झटणारा तरुण कोण आहे? याची अद्याप माहिती मिळालेली नाही.

तर झालं असं की, मुंबईत एका स्टेशनवर सकाळच्या सुमारास ऑफिसला निघणाऱ्या लोकांची भरपूर गर्दी जमलेली होती. मुंबईसारख्या घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या शहरात कुणाला कुणाकडे बघायला वेळ नसतो, अशा ठिकाणी एका माणुसकी व भूतदया जिवंत असलेल्या भावाने एक अशी कृती केली की जी पाहून अनेक लोकांनी त्याला सॅल्युट केला.

मुंबईच्या एका स्टेशनवरून ठरलेल्या वेळेवर एक ट्रेन निघाली होती पण तेवढ्यात ट्रेन ऑपरेटरचे लक्ष समोर खोल रूळ लाईनवर अडकलेल्या कुत्र्याकडे गेले. तिथे एक कुत्रे अडकले होते, ज्याला वरती प्लॅटफॉर्मवर जाता येत नव्हते. ट्रेन चालू होती आणि पुढच्या काही सेकंदात या कुत्र्याचा मृत्यू निश्चित होता. कारण ट्रेन थांबून तो ऑपरेटर तरी किती वेळ थांबणार, त्यालाही कामाच्या मर्यादा आहेत. एवढे लोक होते पण कुणी त्या कुत्र्याला वाचवायला पुढे झाले नाही. कुणीतरी येईल, अशी आशा असल्याने ट्रेन ऑपरेटरने अजूनही स्पीड वाढवलेला नव्हता. अशातच एका युवकाने एन्ट्री घेतली आणि पुढे काय झाले? हे आपल्याला व्हिडीओत दिसून येईलच.

या व्हिडिओला सध्या सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळत असून व्हिडिओतील कुत्र्याला जीव धोक्यात घालून प्लॅटफॉर्मवरून वर काढणाऱ्या मुलाचे कौतुक केले जात आहे. कुत्र्याला वर काढल्यावर ट्रेनचा स्पीड वाढल्याचा आपल्याला या व्हिडिओत दिसत आहे. कुत्र्याचे प्राण वाचवणाऱ्या या भावाला आमच्या टीमकडून कडक सॅल्युट…!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *