भीक मागणं सुद्धा आजच्या युगात एक धंदा बनला आहे. काही भिकारी लोकं आपल्या समोर निराधार बनण्याचे ढोंग करत आणि महिन्याला हजारोंपासून लाखों रुपयांपर्यंत कमावतात. सामान्यतः जेव्हा कुणी कोणाला भीक देतो तेव्हा ती व्यक्ती हे जरुर पाहतो कि समोरच व्यक्ती कमावण्याचा लायक आहे कि नाही. तुलनेत एका धडधाकट पुरुषाला तितकी भीक मिळत नाही जितकी मुलं, वयस्कर आणि अपंगांना मिळते. ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन काही लोकं अपंग बनण्याचे सोंग सुद्धा करतात. तुम्हांला बाजारात असे अनेक भिकारी मिळतील जे खरोखरमध्ये अपंग नाहीत, परंतु भीक मागण्यासाठी अपंग होण्याचे नाटक करतात. लोकं सुद्धा ह्यांच्यावर दया दाखवून पैसे देतात. अशामध्ये जो खरंच अपंग आहे अश्यांना मदत पोहोचत नाही.
अपंग असल्याचे नाटक करणाऱ्या एका भिकाऱ्याला काही दिवसांअगोदरच एका तरुणाने खूप चांगला धडा शिकवलं. हा तरुण अपंग बनलेल्या भिकाऱ्याच्या वाटीत दहा रूपये देण्याच्या बहाण्याने त्याच्या जवळ गेला. आणि त्यानंतर संधी पाहून त्याने भिकाऱ्याच्या जवळचे सर्व पैसे उचलून पळून गेला. आपले पैसे डोळ्यांसमोर कुणी व्यक्ती घेऊन जात आहे हे पाहून अपंग बनून राहिलेल्या त्या भिकाऱ्याला काय करावे सुचले नाही. आणि तो भर रस्त्यातच सर्वांसमोर दोन पायांवर उभा राहून त्या तरुणाच्या मागे सामान्य लोकांसारखा धावू लागला. हे संपूर्ण दृश्य विचित्र परंतु मनोरंजक दिसू लागते. हा भिकारी बाजारात पायाला पट्टी बांधून बसला होता. दुरून पाहिल्यावर सर्वाना असंच वाटत होते कि हा व्यक्ती पायाने अपंग आहे. त्यामुळे लोकं त्या येता जाता पैसे देत होते. परंतु जेव्हा एका मुलाला ह्या भिकार्यावर शंका आली तेव्हा त्याने त्याची खरी कहाणी सर्वांसमोर आणली.
ह्या मनोरंजक व्हिडीओला बिजनेसमॅन हर्ष गोयंकाने सुद्धा आपल्या ट्वि’टर अ’काउंटवर शेअर केले आहे. ह्या व्हिडीओला शेअर करत त्यांनी ह्याला मस्तीत चमत्कार असे संबोधले आहे. चला तर तुम्ही सुद्धा वेळ न दवडता हा व्हिडीओ पाहून घ्या. ह्या व्हिडीओला आतापयर्यंत ३८ हजारापेक्षासुद्धा जास्त लोकांनी पाहिले आहे. ज्यांनी सुद्धा हा व्हिडीओ पाहिला आहे त्यांना हसू आवरता आले नाही. ह्या व्हिडिओला पाहिल्यानंतर लोकांचे म्हणणं आहे कि आपल्याला विचार करून भीक द्यायला हवी. तर अनेकांनी तर कोणालाही भीक न देण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्ही कुणाची मदत करू इच्छिता तर त्यांना कपडे किंवा खाद्यपदार्थ ह्यासारख्या वस्तू द्या. मुलांना पुस्तके द्या.
बघा व्हिडीओ :
Miracles do happen….. pic.twitter.com/FvySTrmXh0
— Harsh Goenka (@hvgoenka) February 5, 2021