Breaking News
Home / मनोरंजन / पाय नसूनही ह्या भाऊंनी केलेला अप्रतिम डान्स पाहून तुम्ही देखील कौतुक कराल, बघा थक्क करणारा हा व्हिडीओ

पाय नसूनही ह्या भाऊंनी केलेला अप्रतिम डान्स पाहून तुम्ही देखील कौतुक कराल, बघा थक्क करणारा हा व्हिडीओ

मित्र सोबत असतील तर आयुष्यातील क्षण कसे आनंदित होऊन जातात. कारण हे खरे मित्र वेळप्रसंगी जसे कठोर होऊन आपण चुकतो आहोत हे सांगू शकतात तसेच आपल्याला अनेक क्षणांचा आनंद ही मिळवून देतात. कारण अनेकवेळा आपण एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी पुढाकार घ्यायला घाबरत असतो. पण आपले मित्र सोबत असले की मात्र ते आपल्याला प्रोत्साहन देतात. वेळप्रसंगी आपल्या सोबत सामील होतात आणि आपला उत्साह वाढवतात. त्यामुळे खरे मित्र असले की आयुष्य कसं आनंदी असतं असं म्हणावं अस वाटत.

आज याचीच प्रचिती आणून देणारा व्हिडियो आपल्या टीमने बघितला. हा व्हिडियो काही काळापूर्वीचा असावा असा अंदाज बांधता येतो. एखाद्या गावातील किंवा छोट्या शहरात भरलेल्या एका कार्यक्रमाचा हा व्हिडियो आहे. सहसा कोणताही समारंभ असला की डीजे वगैरे असतात. मग काय डान्सही असतोच. काही वेळा डान्सर्स ना बोलावलं जातं तर कधी कधी उपस्थितांकडून डान्स करवून घेतला जातो. या व्हिडियोत कदाचित उपस्थितांना मंचावर बोलवून डान्स करून घेत असावेत अस वाटतं. जर तस असेल तर त्यांचं कौतुक करायला हवं. कारण या व्हिडियोत आपल्याला एक दिव्यांग मुलगा डान्स करताना दिसून येतो.

त्यांनी त्याला संधी दिल्यामुळे असेल कदाचित पण तो तिथे डान्स करत असतो. अर्थात कारण काहीही असो पण त्याचं त्या मंचावर डान्स करणं हे एकाचवेळी आनंद देऊन जाणारं आणि त्याचवेळी त्याचं कौतूक वाटायला लावणारं आहे. आनंद यासाठी कारण या मुलाच्या चेहऱ्यावर दिसणारा जो आनंद आहे तो आपल्याला क्वचितच बघायला मिळतो. एखादी गोष्ट मनापासून करावीशी वाटणं आणि ती करायला मिळणं यानंतर होणारा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतो. कदाचित त्याला पाय नसल्याने त्याला डान्स करण्याची संधी फारशी मिळत नसावी. पण या मंचावरून त्याला ती संधी मिळते. त्यामुळे एक स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर असतो. कारण शेवटी डान्स करून माणसाला आपल्या मनातील भावनांनाच तर वाट करून देता येते. या कार्यक्रमामुळे त्याच्या मनातील भावनांना वाट करून मिळाल्याचा आनंद दिसून येतो. आपल्याला ही तो होतो. बरं त्याचं कौतुक यासाठी वाटतं कारण एकदा नाचायला लागला की अगदी आत्मविश्वासाने नाचत असतो.

अर्थात मध्ये एकदा दोनदा मानेने नाही म्हणत डान्स थांबवतो की काय असं वाटतं. पण नेमक्या याचवेळी त्याचे मित्र त्याला मदत करायला येतात. एक मित्र तर मंचावर बसलेला असतो. सुरुवातीचं एक कडवं होतं आणि हा मुलगा थांबतो की काय असं वाटतं पण त्याचा मित्र आणि बाकीचे उपस्थित सगळे त्याला प्रोत्साहन देत असतात. त्या प्रोत्साहनामुळे तो ही अजून जवळपास मिनिटभर तरी नाचतो. प्रत्येकवेळी वर उल्लेख केलेला आनंद आपल्याला बघायला मिळतो. हा आनंद आपल्याला जसा होतो तसाच उपस्थितांना ही होत असतो. एक दादा तर या मुलाच्या डोक्यावरून पैसे ओवाळून जातात. यावरून त्यांना झालेला आनंद कळून येतो. बरं समोर असलेले प्रेक्षक ही खुश झालेले असतात. या प्रेक्षकांमध्ये हा व्हिडियो रेकॉर्ड करणारे दादा ही असतात. सेल्फी व्हिडियो घेताना त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद ही दिसत असतो. बरं गाणं ही सगळ्यांना आवडेल असच असतं. फुल और कांटे चित्रपटातलं ‘मेरे कॉलेज की एक लडकी हैं’ हे ते गाणं असतं. आज जवळपास तीस वर्षे झाली तरी या गाण्याची जादू अजूनही कायम असल्याचं यानिमित्ताने दिसून येतं.

अजय देवगण यांच्या कारकिर्दतील एक अविस्मरणीय असा हा चित्रपट या गाण्याप्रमाणेच आजही लोकप्रिय असणार यात शंका नाही. असो. जुनी गाणी आणि सिनेमे यांचा विषय निघाला की बघायला नको. लिहितच जावं अस वाटत. पण त्यामुळे आपला मूळ विषय बाजूला नको राहायला. तेव्हा मंडळी हा वर उल्लेख केलेला व्हिडियो बघा. अगदी आवर्जून बघा. दिव्यांग असूनही आयुष्याचा आनंद घेणारा हा मुलगा एका अर्थाने प्रेरणादायी सुद्धा ठरतो. त्यामुळे आनंद आणि प्रेरणा अशा दोहींसाठी तरी हा व्हिडियो नक्की बघा. आपल्या वाचकांसाठी आपली टीम हा व्हिडियो खाली देईल.

चला तर मंडळी, हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *