Breaking News
Home / मनोरंजन / पालकांनी लहान मुलांना चिल्लर पैसे दिल्यावर नक्की लक्ष द्या, बघा काय घडलं ह्या मुलीसोबत ते

पालकांनी लहान मुलांना चिल्लर पैसे दिल्यावर नक्की लक्ष द्या, बघा काय घडलं ह्या मुलीसोबत ते

लहान मुलं घरात असली की घर म्हणजे नंदनवन होऊन जातं. त्यांचं निरागस वागणं, बोलणं, बागडणं, वेळप्रसंगी रुसणं, खळखळून हसणं, इथून तिथे नुसती धावाधाव करणं आणि त्यांच्या इतर बाललीला यांच्यामुळे वेळ कसा जातो कळत नाही. अर्थात हे सगळं असलं तरी काही वेळा रागही येतो. सतत प्रश्न विचारून भंडावून सोडणं, हट्ट करणं, काही वेळा उलटं बोलणं यांमुळे दोन चापट्या ठेऊन द्याव्यात असही वाटून जातं. पण शेवटी लहान पोरंचं ती ! त्यांच्या एकदा माफी मागण्याने किंवा गळ्यात पडून रडण्याने आपला राग कुठच्या कुठं निघून जातो.

पण हे अस सगळं असलं तरी काही वेळा त्यांचं वागणं आपल्या चिंतेत ही भर घालतं. अशावेळी त्यांचा कमी आणि आपला जास्त राग येत असतो. कारण लहान मुलं शेवटी काहीशा अजाणतेपणाने वागणारच. तसेच जेवढं वय लहान तेव्हढा वेंधळा स्वभाव ही असतोच हे आपण सगळेच जाणतो. पण नेमक्या अशा वेळी जर आपलं लक्ष नसेल तर काही वेळा जीवाला घोर लागणाऱ्या गोष्टीही घडू शकतात. यातील सगळ्यांत जास्त माहिती असलेली आणि होऊ शकणारी अशी गोष्ट म्हणजे लहान मुलांनी पैसे किंवा नाणी गिळणं होय. कारण पैसे हे आपल्या अगदी हाताला लागतील असेच ठेवलेले असतात.

खासकरून चिल्लर वगैरे असतील तर ते ही जवळपासच ठेवलेले असतात. जेणेकरून बाहेर जाताना पटकन हाताला लागले, ते घेतले की झाले. पण काही वेळा हीच बाब अंगाशी येऊ शकते. कारण लहान मुलांना हाताला लागतील त्या गोष्टींशी खेळायची सवय असते. मग काही वेळा खेळता खेळता मग याच गोष्टी तोंडात ही घातल्या जातात. मग ते एखादं खेळणं असो, जवळच ठेवलेला फोन असो वा इतर वस्तू किंवा अगदी वर उल्लेख केलेली नाणी असोत. त्यातही पाच रुपयांची नाणी (पाच चा डॉलर) हा आकाराने छोटा असतो. त्यापेक्षा ही छोट्या आकाराची नाणी असतात. पण आमच्या टीमने आतापर्यंत दोन व्हिडियोज असे बघितले ज्यात लहान मुलांनी पाचची नाणी गिळली होती. त्यातील एका मुलाने पाचचे दोन डॉलर गिळले होते. ही घटना गुजरात राज्यात घडली होती. पण त्याच्या वडिलांच्या सदर प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी तडक हॉस्पिटल गाठलं होतं आणि डॉक्टरांनी ती नाणी बाहेर काढली होती. असाच एक दुसरा व्हिडियो ही आपल्या टीमने बघितला, ज्यात एक लहान मुलगी हॉस्पिटलमध्ये भरती असलेली दिसून येते.

व्हिडियो सूरु होतो तेव्हा ती भूल (अनेस्थेशीया) दिलेल्या अवस्थेत असावी हे कळून येतं. तसेच डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी आजूबाजूला उभे असलेले दिसून येतात. त्यांचे चेहेरे दिसून येत नाही, पण त्यांच्यातील संभाषण थोडंस ऐकू येतं. या अशा परिस्थितीत सहसा भूल दिल्यावर आणि अन्य वैद्यकीय प्रक्रिया केल्यावर एका साधनाचा वापर केला गेलेला दिसतो. यात एका लांब नळीच्या साहाय्याने ते नाणं जिथे अडकलं आहे त्याच्या आसपास ही नळी नेली जाते. अर्थात ते नाणं कुठे आहे हे आधी क्ष-किरणांच्या (एक्स रे) साहाय्याने बघितलं जातं हे सुज्ञ वाचकांनी ताडलं असेलच. असो. तर या नळीच्या साहाय्याने मग एका चिमट्याच्या साहायाने अडकलेलं नाणं काढण्याचा प्रयत्न केला जातो. आता या छोट्या मुलीच्या बाबतीत हा पहिलाच प्रयत्न यशस्वी झालेला दिसतो. कारण एकाच वेळेच्या प्रयत्नानंतर पाच रुपयाचं नाणं बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलेले दिसतं. याआधीच्या उल्लेख केलेल्या केस मध्ये मात्र असं होत नाही. एका प्रयत्नानंतर त्या मुलाच्या गळ्यातील नाणी जवळपास येतात. त्यामुळे मग अन्य वैद्यकीय साधन वापरून दोन्ही नाणी काढण्यात डॉक्टरांना यश येतं. अर्थात नमूद करावी अशी बाब म्हणजे हे दोन्ही एकाच प्रकारचे प्रातिनिधिक व्हिडियो आहेत, त्यामुळे दोन्ही व्हिडियोतील उपचार जवळपास सारखे असल्याचं जाणवतं. पण वेळप्रसंगी डॉक्टरांना इतर काही उपचार करावे लागू शकतात याची आपल्या वाचकांनी नोंद घ्यावी. बाकी आपण सुज्ञ आहात.

असो. या दोन्ही व्हिडियोत आपल्याला यश अनुभवायला मिळालं असलं तरी मुलांनी नाणी गिळणं हा बघायला गेलं तर एक धोकादायक प्रकार होऊ शकतो. त्यामुळे आपल्या घरी अस काही घडलं तर त्वरेने जवळच्या इस्पितळात जाणं केव्हाही योग्य. अर्थात चिंता वाटावी अशी बाब असली तरी काळजी करू नये. डॉक्टरांनी वेळेत उपचार केले असता पुढील धोका टाळता येऊ शकतो. तसेच यावरील सर्वोत्तम उपाय म्हणजे लहान मुलांपासून नाणी हा प्रकार लांब ठेवणे. जेणेकरून पुढील गोष्टी घडणार नाहीत. तसेच मुलांनी कधी घसा वा छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यास त्याकडे ही दुर्लक्ष करू नये. तसेच घरगुती उपाय ही टाळावेत जेणेकरून डॉक्टरांना त्यांचे उपचार करताना अडचणी येणार नाहीत. असो.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने वर उल्लेख केलेले दोन व्हिडियो बघितले आणि त्यावर लिहून जनजागृती व्हावी अस वाटलं. त्यातूनच हा लेख आकाराला आला आहे. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *