Breaking News
Home / मनोरंजन / पालघरमधील ह्या दोन मुलांचा डान्स व्हिडीओ होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

पालघरमधील ह्या दोन मुलांचा डान्स व्हिडीओ होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

आपण मराठी गप्पाचे नियमित वाचक आहात म्हंटल्यावर डान्सच्या वायरल व्हिडियोज वरील लेख आपल्याला आवडत असण्याची शक्यता अधिक आहे. कारण आपल्या टीमने वायरल व्हिडियोज विषयी लिहिलेल्या एकूण लेखांपैकी बहुतांश हे डान्स वर आधारित असतात. मग ते लहान मुला मुलींनी एकट्याने अथवा ग्रुप ने केलेले डान्स असोत वा मोठ्यांनी केलेले डान्स असोत. लग्नसमारंभात चालणाऱ्या डान्स व्हिडियोज चा स्वतंत्र असा एक चाहता वर्गही आहे. यावरून आपल्याला कल्पना यावी. आपली हीच आवड निवड लक्षात घेऊन आज आपली टीम एका अशा वायरल व्हिडियो बद्दल लिहिणार आहे जो नुकताच खूप वायरल झाला होता. कोणता व्हिडियो आहे तो ?

हा व्हिडियो किंबहुना व्हिडियोज आहेत ते पालघर जिल्ह्यातील दोन मुलांच्या डान्स चे. या दोन मुलांची नावे म्हणजे अंदेश मेरे आणि रिसब उंबरसाडा. पालघर जिल्ह्याचे रहिवासी असणारे हे दोन तरुण मध्यंतरी चर्चेचा विषय बनली होती. चर्चेचं कारण अर्थातच त्यांचा डान्स. पण असं काय खास आहे या दोघांच्या डान्स मध्ये?

खासच खास गोष्टी आहेत. पहिली म्हणजे गाण्याचे बिट्स अगदी बरोब्बर पकडणं. यामुळे होतं काय तर दोन्ही मुलं नाचतात तेव्हा म्युझिक आणि बिट्स नुसार त्यांच्या स्टेप्स होतात. तसेच दोघांच्याही स्टेप्स एकाच वेळी घडून येतात, त्यामुळे बघायला ही बऱ्या वाटतात. दुसरी खास गोष्ट म्हणजे डान्सचा मनमुराद आनंद घेणं. आपण जे काम करत असतो त्याचा आनंद घेतला तर त्याचं प्रतिबिंब आपल्याला आपल्या देहबोलीतून आणि चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येतं. ही मुलंही यास अपवाद नाहीत. धमाल आनंद घेत ही मुलं नाचतात आणि त्यामुळे आपणही आपसूक त्यांच्या या डान्सचा आनंद घेतो.

जेव्हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा एक धून सुरू असते. त्या धून च्या अनुसार छोटी छोटी पावलं टाकत हे दोघेही नाचत असतात. या स्टेप मध्ये सगळ्यांत जास्त वापर पायांचा होतो. हातांची म्हणावी तेवढी हालचाल होत नाही. पण जशी गाण्यातली धून किंवा गाणं बदलतं तसे हे दोघेही वेगळ्या स्टेप्ससोबत नाचायला लागतात. यात पदलालित्य दिसून येतंच आणि हातांचाही वापर होतो. पण या संपूर्ण व्हिडियोत लक्षात राहतं ते या दोघांचं पद लालित्य. सुरेखपणे पायांची हालचाल करत दोघेही डान्स करतात. अगदी पूर्ण व्हिडियो भर. एखाद्या प्रोफेशन डान्सर ला शोभेल असं हे पदलालित्य आपलं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतं.

त्यांचा डान्स आपल्याला आनंद देऊन जातो त्यामुळे आपण त्यांच्या विषयी अजून काही माहिती मिळते का ते पाहण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांची नावं कळण्यापालिकडे जास्त प्रगती होत नाही. असो. हरकत नाही. मराठी गप्पाच्या टिमकडून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आहेतच. आपल्यालाही हा लेख आवडला असेल, अशी अपेक्षा आहे. पण केवळ एका लेखावर संतुष्ट राहू नका. आपल्यासाठी खास असे नवनवीन विषय घेऊन मराठी गप्पा येत असते. रोज काही ना काही लेख प्रदर्शित करत असते. तेव्हा या लेखांचा आनंद घ्या आणि हे लेख शेअर करून तो आनंद वाटा. शेवटी आनंद वाटून द्विगुणित होतो म्हणतात. असो. आपला आणि मराठी गप्पाच्या स्नेह असाच वाढता राहू दे. लोभ असावा. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.