Breaking News
Home / मराठी तडका / ‘पाहिले न मी तुला’ मालिकेतील हि अभिनेत्री नक्की आहे तरी को’ण, बघा मानसीची जीवनकहाणी

‘पाहिले न मी तुला’ मालिकेतील हि अभिनेत्री नक्की आहे तरी को’ण, बघा मानसीची जीवनकहाणी

मराठी गप्पांच्या टीमने वेळोवेळी नवनवीन मालिका, नाटक, सिनेमे आणि त्यातील कलाकार यांच्याविषयी लेख लिहिले आहेत. काही काळापूर्वी काही मालिका विविध वाहिन्यांवर दाखल झाल्या होत्या. त्यावेळी आमच्या टीमच्या लेखांना आपण जो उत्तम प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद. नजीकच्या काळात नवनवीन मालिका आपल्या भेटीस येण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचं तर तिसरं पर्व आपल्या भेटीस येत आहे. या मालिकेच्या काही दिवस आधी अजून एक मालिका झी मराठी वरून आपल्या भेटीस आली. ‘पाहिले न मी तुला’ ही ती मालिका. या मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर आपल्याला पहिल्यांदा खल भूमिकेत दिसतील. तसेच आशय कुलकर्णी हा लोकप्रिय खलनायक आता नायकाच्या भूमिकेत दिसेल. त्यामुळे या आघाडीच्या अभिनेत्यांच्या वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखांची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि मिळत राहील.

या दोहोंसोबतच अजून एक चेहरा, मालिकेच्या जाहिरातींमधून आपलं लक्ष वेधून घेतो. हा चेहरा म्हणजे नायिकेचा. मालिकेतील या नायिकेचं खऱ्या आयुष्यातील नाव आहे तन्वी मुंडले. तन्वीची ही पहिली मालिका असली तरीही तिने इतरही अनेक कलाकृतींतून अभिनय केलेला आहे. चला त्याचीच थोडक्यात माहिती घेऊयात.

तन्वी मूळची कुडाळची. एखाद्या अस्सल कोकणी व्यक्तीप्रमाणे तिला अभिनय आणि कलेची आवड. तिने आपली अभिनयाची आवड ओळखली आणि या क्षेत्रात आपण कारकीर्द घडवावी असं तिने ठरवलं. त्याआधी तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं. बरं, कलाक्षेत्रात कारकीर्द घडवायची म्हणजे त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणं आवश्यक आहेच. तिने आपलं नाट्य प्रशिक्षण पुण्याच्या लोकप्रिय ललित कला केंद्रातून पूर्ण केलं. तिने अनेक नाट्यकृतींमधून स्वतःतील अभिनेत्रीला प्रगल्भ केलं. याकाळातील अनुभवांनी तिने स्वतःच्या अभिनयाला पैलू पाडले. मॅकबेथ, कुनाला कुनाचा मेळ नाही, नागमंडल, सदासर्वदा या तिच्या काही निवडक नाट्य कलाकृती.

‘कुनाला कुनाचा मेळ नाही’ साठी तिचं विशेष कौतुकही झालं. तसेच ना’गमंडल मधील राणी या व्यक्तिरेखेसाठी तिला एका स्पर्धेत सिल्वर मेडलही मिळालं होतं. रंगमंचावर सशक्तपणे वावरत असताना तिने लघुपटांतूनही अभिनय केलेला आहे. श्रा’प, चाळा हे तिने अभिनित केलेले काही लघुपट. तसेच तिने काही जाहिरातींतूनही अभिनय केलेला आहे. नाटक, लघुपट आणि आता मालिका यांच्या सोबत तिने एका व्यावसायिक चित्रपटातही अभिनय केलेला आहे. Colorफुल असं या चित्रपटाचं नाव. या चित्रपटात प्रेक्षकांची लाडकी सई ताम्हणकर आणि लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर हे दिसून येतील. येत्या काळात हा चित्रपट प्रदर्शित होईल.

तन्वीचा आजपर्यंतचा कलाप्रवास बघता कमी कालावधीत एवढ्या विविध माध्यमांतून झळकणाऱ्या काही मोजक्या गुणी कलाकारांत तिची गणना केली पाहिजे. तिने आपल्या नाट्यकृतींच्या माध्यमांतून तसेच लघुपटांतुनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहेच. हा आणि येत्या काळात तन्वी तितक्याच सशक्तपणे मालिका आणि सिनेमांतून प्रेक्षकांना आनंद देत राहील हे निश्चित. तिच्या या उमलत्या आणि बहरत्या कारकिर्दीला मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *