Breaking News
Home / जरा हटके / शांत बसलेल्या पिंजऱ्यातल्या सिंहाची खोड काढणं अतिउत्साही तरुणाला चांगलंच भोवलं, बघा सिंहाने काय केलं ते

शांत बसलेल्या पिंजऱ्यातल्या सिंहाची खोड काढणं अतिउत्साही तरुणाला चांगलंच भोवलं, बघा सिंहाने काय केलं ते

आपल्या प्रत्येकात एक खट्याळ छोटं मूल दडलेलं असतं. खरं तर हे मूल लहानपणी खूप खेळतं, बागडतं, धडपडतं, पण आयुष्याची मजा घेतं. किंबहुना त्या लहान वयात बहुतेक लहान मुलांच्या आयुष्याचं इतिकर्तव्य हे मस्त मजा करण्याचं असतं. त्यात वाईटही काही नाही. पण वय वाढत जातं आणि जबाबदाऱ्यांची पुटं मनावर चढत जातात आणि आपसूक आपण मोठे होतो. आयुष्यातला असा भाग जो कोणालाच नको हवा असतो.

फक्त लहानपणी वाटत असतं, आपण मोठं व्हायला हवं. पण मोठं झाल्यावर कळतं, उगीच मोठे झालो. थोडा अल्लडपणा जपायला पाहिजे होता. पण कसचं काय. अर्थात हे सगळं आपल्या सारख्या सामान्य माणसांसाठी असतं. काही जण ही स्वभावाने तर काही जण प्रयत्नपूर्वक आपल्यातलं लहान मूल जपतात. यातले जे प्रयत्नपूर्वक लहान मूल जपणारे असतात त्यांचं एकवेळ ठीक आहे. त्यांना आपण मोठे आहोत याची जाणीव असते. पण ज्यांचा स्वभावच लहान मुलांसारखा असतो त्यांचं काही खरं सांगता येत नाही. आपण मोठे झालोय म्हणजे अजून अवखळपणा करण्याचं जणू लायसन्स मिळण्याचा आत्मविश्वास यांच्यात असतो. कधी काय अतरंगी वागतील सांगता येत नाही. बरं, एका सीमेपर्यंत ठीक आहे. आपण ही त्यांच्या अतरंगी वागण्याची मजा घेतो. पण त्यांचा अतरंगीपणा हाताबाहेर जायला लागला की मग रागही येतो आणि काही वेळा काळजी ही वाटते.

पण त्यांना काही फरक पडतो का? बहुतांशी नाही. पण… कधी कधी अशी माणसं अशा काही प्रसंगांना सामोरे जातात की जन्माची अद्दल घडते. तेव्हा कळतं, हुशारी करायची नाही. याचाच उत्तम प्रत्यय करून देणारा एक व्हिडियो काही काळापूर्वी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला होता. हा व्हिडियो बहुधा परदेशात घडलेली एक घटना आहे. ही घटना एका प्राणी संग्रहालयात घडते. आता कोणत्याही प्राणी संग्रहालयात, आकर्षणाचा केंद्रबिंदू हे बहुधा तिथले हिं’स्त्र वन्य प्राणी असतात. साहजिकच आहे म्हणा. एरवी ज्यांच्या जवळ जायला हातभर फाटते ते हे प्राणी हाता दोन हातांच्या अंतरावर बघून कोणीही उत्साहित होईलच. पण अस असलं तरी शेवटी हिं’स्त्र प्राणीच ते ! त्यामुळे माणसांना ते इजा पोहोचवणार नाहीत अशा पद्ध्तीने त्यांना ठेवलं जातं. वर मोठ्ठाले बोर्ड लावून या प्राण्यांच्या जवळ जाऊ नये हे लिहिलेलं असतं. पण वर उल्लेख केलेली अतरंगी मंडळी ऐकतात होय ? नाही. त्यातले काही अतिउत्साही जातात या पिंजाऱ्यांजवळ. असाच एक अतिउत्साही तरुण आपल्याला या व्हिडियोत, एका सिंहाच्या पिंजऱ्याजवळ उभा असलेला दिसतो. बरं त्याला एवढं जवळ उभा बघून सिंह ही भडकेलेला असतो. त्याची गुरगुर चालू असते.

पहिल्यांदा तर खुद्द कॅमेरामन दचकतो. पण या अतरंगी तरुणाला सिंह म्हणजे जास्त वाढ झालेली मांजर वाटत असल्यागत तो जवळ उभा असतो. बरं इथपर्यंत पण ठीक आहे म्हणू ! सगळ्यांना कळलं, तुझ्यात सिंहाजवळ उभं राहायचा दम आहे. आता निघावं ना माणसाने, नाही ! हे येड थेट पिंजऱ्यात हात घालतं. त्याला वाटतं, सिंह बघेपर्यंत आपण हात काढून घेऊ ! पण इथेच त्याचा अंदाज चुकतो. सिंह एवढ्या चपळाईने फक्त डोकं फिरवतो की त्या तरुणाचा पंजा त्या सिंहाच्या जबड्यात असतो. पुढची काही सेकंद थरारक असतात. व्हिडियोचा पुढचा वेळ फक्त काही सेकंदांचा आहे. पण तरीही बराच वेळ गेल्यागत वाटतं. आता पुढे काय होतं असं तुम्हाला वाटत असेल तर एवढंच सांगू शकतो आणि ते म्हणजे काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तसेच त्या तरुणाचं नशीब ही बलवत्तर असतं त्यामुळे थोडक्यात निभावत आणि फारशी दुखापत होत नाही असं म्हणायला ही हरकत नाही. बाकी आपण सुज्ञ आहातच, त्यामुळे जास्त सांगणे न लगे. असो. आपल्या टीमने सदर व्हिडियो आपल्या वाचकांसाठी या लेखाच्या शेवटी शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे. आपणाला जर अशा व्हिडियोजची भीती वाटत असेल वा नंतर काहीबाही विचार येत असतील असं काही असेल तर सदर व्हिडियो आपण बघू नये एवढीच एक सूचना मात्र करावीशी वाटते. बाकी आपण सुज्ञ आहात.

असो. तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.