वन्यप्राण्यांचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओंमध्ये प्राण्यांमधील चित्तथरारक मारामारी पाहायला मिळते, तर काही व्हिडिओंमध्ये छोटे प्राणीही हिंस्र प्राण्यांना धूळ चारताना दिसतात. वन्य प्राण्यांमधील जबरदस्त झुंज पाहण्यासाठी प्रत्येकाला उत्सुकता असते. त्यात काही वन्यप्राणी फॉटॉग्राफर नेहमीच असे काही क्षण टिपण्यासाठी तत्पर असतात जे आपल्या सगळ्यांना आश्चर्यचकित करतात. सोशल मीडिया हे असं एक माध्यम आहे जेथे सगळे लोकं आपले आगळे वेगळे व्हिडीओ तेथे अपलोड करत असतात. ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी ही मिळते आणि त्यांचे फॉलोअर्स देखील वाढतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही शॉक व्हाल आणि आई सारखे दैवत दुसरे कोणतेही नाही, हेही तुमच्या लक्षात येईल. जंगली प्राण्यांच्या झुंजीचे व्हिडीओ कायम समोर येतात. यात विशेषतः सापाचे व्हिडीओ जास्त पाहिले जातात. एवढंच नाही तर त्यात सापाच्या समागमाचे, सापाच्या अंतर्गत द्वंद्व आणि सापाचे व इतर प्राण्यांची झुंज, असे सगळे व्हिडीओ अनेक लोक आवडीने बघतात.
असाच एक व्हिडिओ आमच्या हाती आला आहे. यात झुंज तर दिसून येईलच त्यासोबत आईचे प्रेम काय असते? हेही कळून जाईल. साप आणि उंदीर. एकमेकांचे जानी दुश्मन… पण हे जानी दुश्मन आपल्याला थेट एकमेकांना भिडलेले दिसून आले आहेत. आणि या झुंजीत एक उंदराचे लेकरू वाचले. मात्र ही फाईट एकदम जोरदार झाली… शेवटी प्रश्न आईच्या मायेचा होता… आता तुम्हाला हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. कारण प्राण्यांची झुंज आणि तिथे आईच्या मायेचा काय संबंध?… पण संबंध आहे भावांनो… त्यासाठी हा लेख वाचून व्हिडीओ तर बघावाच लागेल ना भाऊ.. गवत्या जातीचा हिरवा साप आणि उंदीर. एकमेकांचे कट्टर दुश्मन. उंदीर हे तर सापाचं आवडतं भक्ष्य. उंदराची शिकार करून त्याला खाणारा साप सर्वांनीच पाहिला असेल. पण आज एक पिल्लू उंदीर तोंडात असताना दुसऱ्या मोठया उंदराने असा काही हल्ला केला की साप तिथे भक्ष सोडून पळून गेला आणि जोपर्यंत साप पिलापासून दूर जात माही तोपर्यंत मोठा उंदीर हल्ला करत होता.
खऱ्या अर्थाने एका आईने आपल्या लेकराचे हा प्राण वाचवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. अनेकदा माणसांना प्राण्यांच्या भावना कळत नाहीत. प्राण्यांना नेमका काय त्रास होतोय किंवा ते आपल्याला काय सांगू पाहत आहेत, हे अनेकदा समजत नाही. मात्र एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची भाषा आणि वेदना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो, हे नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओतून दिसून आलं आहे.
खरं पाहिलं तर कुठलाही मुलगा मोठा होइपर्यंत सर्व संकटांपासून बचाव करण्यासाठी त्याच्याकडे आई वडील नावाची कडक ढाल असते. मात्र जर जर ही ढाल नसेल तर त्याच्या जिवाला धोका निर्माण होतो. गाडी हीच परिस्थिती प्राण्यांची असते. आपल्या पिलाला वाचवण्यासाठी आई-बाप काहीही करू शकतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणी मित्रांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. संकट काळात माणसे आपल्याच जवळच्या माणसांना साथ देत नाही. मात्र प्राणी आपल्या माणसांना संकटात सोडून कधीत जात नाहीत, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.
बघा व्हिडीओ :