प्राण्यांचे पक्षांचे आणि किटकांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. कधी हे व्हिडीओ जंगलातील असतात तर कधी प्राण्यांनी मानवी वस्तीत एंट्री केल्यावर उडणाऱ्या फजितीचे असतात. अनेक वेळा असे व्हिडीओ पाहिल्यानंतर आपण आश्चर्यचकित होते. विशेषत: प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडीओ बघायला नेटीझन्स आवडतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जुना बिबट्या मानवी वस्तीत घुसलेला दिसत आहे. आणि त्याने संपूर्ण मानवी वस्तीत धुमाकूळ घालून सगळ्यांना बेजार करून सोडले आहे. त्यानंतर त्याला पकडायला जी वन विभागाची टीम आली आहे, त्यानंतर बिबट्याने मोठा हल्लाबोल केला. या हल्ल्यात एक सामान्य माणुस ज्याला या हल्ल्याची काहीच कल्पना नव्हती आणि एक अधिकारी जखमी झाले आहेत. हा भयंकर व्हिडीओ पाहताना अंगावर काटा येतो.
खरं पाहिलं तर, बिबट्या हा अत्यंत घातक शिकारी म्हणून ओळखला जातो. तो गर्द झाडीमध्ये देखील शिकार करू शकतो. तो अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेकदा वाघ, सिंह देखील बिबट्याच्या वाटेला जात नाहीत. अशाच एका खतरनाक बिबट्याचा आणखी एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बिबट्याने थेट मानवी वस्तीत जाऊन धिंगाणा केला आहे. विशेष बाबा म्हणजे रोडवरून सहजतेने प्रवास करणाऱ्या एका युवकावर हल्ला केलाय. हा थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहतानाही एक भीती वाटून जाते.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक बिबट्या गावात शिरल्याचं दिसत आहे. तो अनेक नागरिकांवर हल्ला करत असून रस्त्याने जात असलेल्या दुचाकीस्वरावर हल्ला केला आहे. तर त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या वन विभागाच्या टीम मधील एका व्यक्तीवरही बिबट्याने हल्ला केला आहे. तर अशावेळी खबरदारी घेणे खूप महत्त्वाचं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दुचाकीस्वार आणि वन विभागाचे अधिकारी या दोघांचंही नशीब चांगलं होतं म्हणून वाचले, असंच म्हणावं लागेल. लक्षवेधी बाब म्हणजे या दरम्यान बिबट्याला वाचवायला आलेल्या लोकांवरच हल्ला केला. बिबट्याने इतक्या वेगाने उडी मारली की दुचाकीवर असणाऱ्या व्यक्तीला सावरण्याची संधी देखील मिळाली नाही. तसेच त्याला काय झाले हे समजायच्या आत तर बिबट्या परत दुसरीकडे गेला होता. सुदैवाने या हल्ल्यात कोणी जखमी झालं नाही. व बिबट्या देखील अगदी सुखरुप त्या वस्तीतून पळून गेला.
दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असले तरी त्यावर असे अनेक गांभीर्याने घेण्यासारखे व्हिडीओ येत असतात. तसे अनेक मजेशीर व्हिडिओही जास्तच व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.
बघा व्हिडीओ :