Breaking News
Home / मनोरंजन / पुणेरी आजोबानंतर आता पुणेरी आईचा मेट्रोमधील व्हिडीओ होतोय वायरल, शेवट पाहून हसू आवरणार नाही

पुणेरी आजोबानंतर आता पुणेरी आईचा मेट्रोमधील व्हिडीओ होतोय वायरल, शेवट पाहून हसू आवरणार नाही

सहसा एखादी नवीन गोष्ट घरी आणली की तिच्या विषयी आपल्या मनात बरचसं कुतूहल असतं. मग आपलं वय किती का असेना आणि आपल्याला त्या गोष्टीविषयी किती का माहिती असेना ! बरं ही तर केवळ घरची बाब झाली. एखादी वास्तू आपल्या आजूबाजूच्या परिसरात नव्याने बांधली गेली वा एखादी वस्तू आणली गेली तरी हीच उत्सुकता आपल्या मनात असते. त्यामुळे एकदा का तिचं लोकार्पण झालं की मग तिचा अनुभव घ्यावा असे सगळ्यांनाच वाटतं.

याचं नजीकच्या काळातलं उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यात आलेली मेट्रो होय. तसं मेट्रो ही संकल्पना म्हणून देशाच्या इतर काही शहरांत आली होतीच. आता त्यात आपल्या पुण्य नगरीची भर पडली आहे. त्यामुळे पुणेकरांचा मेट्रो विषयीचा उत्साह अखंड वाहता असणार हे तर नक्कीच होतं. तसेच त्यातून विविध किस्से घडणार हे ही निश्चित होतं. याचा पहिला प्रत्यय एका आजोबांच्या मेट्रो वारीने आला. आपल्यापैकी अनेकांनी या आजोबांच्या वायरल झालेल्या व्हिडियोला पाहिलं असेल. तसेच त्याची मजा ही घेतली असेल त्यामुळे पुन्हा त्यावर लिहीत नाही. तसेच काही काळाने मग अजून एक व्हिडियो वायरल झाला. त्यात दोन काकू एकमेकींशी वाद घालताना दिसल्या. सुदैवाने ते भांडण आणि तो व्हिडियो फार चालला नाही हे उत्तम झालं !

तसेच काही आजींचा गृप एकत्र मिळून त्यात फुगडी खेळताना ही एका व्हिडियोत दिसला. तसेच एका पुस्तकांच प्रकाशन ही झालं. बरं हे सगळं मेट्रो दाखल झाल्यापासून अगदी काही दिवसांत झालंय. असे एक ना अनेक अजूनही किस्से असतील आणि येत्या काळात आपल्याला अनुभवायला मिळतील. असाच एक किस्सा आज आपल्या टीमच्या पाहण्यात आला. पत्रकार अद्वैत मेहता हे लोकप्रिय पत्रकार आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअप वर आलेला एक व्हिडियो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात आपल्याला हा किस्सा बघायला मिळतो. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला मेट्रोचं दार उघडं असलेलं दिसून येतं. म्हणजे अजूनही प्रवासी प्लॅटफॉर्मवर जाऊ शकतात आणि आत येऊ शकतात अशी अवस्था ! कोणत्याही गाडीच्या बाबतीत घडणारी सर्वसामान्य घटना ! त्यामुळे त्याबाबत नवल अस काही नसतं. तेवढ्यात एवढा वेळ न दिसलेला पण आत उभा असलेला एक मुलगा दरवाज्यातून बाहेर जात प्लॅटफॉर्मवर उभा राहतो. त्याच्या हातात मोबाईल असतो.

कदाचित प्लॅटफॉर्मचे फोटोज किंवा व्हिडियो घेण्याचा प्रयत्न करत असावा असं प्रथमदर्शनी वाटतं. कदाचित नेटवर्क ही गेलं असावं असं ही एकदा वाटून गेलं. पण सहसा कुठल्याही मेट्रो मध्ये नेटवर्क जात नाही त्यामुळे फोटोज काढत असावा असा अंदाज बांधता येतो. असो. पण त्याचं हे फोटो काढणं चालू असतानाच दरवाजे बंद होतात. तेव्हा लक्षात येतं की हा मुलगा एकटा नसतो. सोबत त्याची आई आलेली असते. दरवाजा अचानक बंद झालेला पाहून ती माऊली चिंतातुर झालेली दिसते. ती त्या मुलाला ‘आत ये आत ये’ म्हणून सांगत असते. पण आता दरवाजे उघडणार नाहीत असं वाटून तो मुलगा मात्र जाऊदे जाऊदे या अर्थाने हातवारे करत राहतो. पण माऊली एकदम काळजीत पडते. पण तेवढ्यात कसे काय ते दरवाजे उघडतात. मग काय तो मुलगा आत येतो आणि पहिल्यांदा आईच्या हातची चापटी खातो. या एका क्षणांत आपल्याला आईचं ममत्व, तिची काळजी हे सगळं दिसून येतं. खरंच काही वेळा आपल्याला आई ओरडते पण त्यातही तिचं प्रेमच असतं. आता तर आपल्यातले बहुतेक जण मोठे झालेलो आहोत त्यामुळे आपल्याला चापटी मिळण्याचे दिवस संपले आहेत. पण तरीही गतकाळात वेळोवेळी आपण सुधारावे म्हणून आईने धोपटलेलं असतंच. त्याच्या आठवणी या व्हिडियोच्या निमित्ताने ताज्या झाल्या. तसेच आईच ममत्व हे कायम आपल्या मनात साठवलेलं असतंच. ते आज यानिमित्ताने पुन्हा समोर आलं.

आपल्या टीमने हा व्हिडियो पाहिला आणि म्हंटलं याविषयी लिहिलं पाहिजे. कारण बाकीचे किस्से घडत असले तरी या किश्याला असलेली मायेची झालर आपल्या वाचकांच्या मनाला स्पर्शून जाईल हे जाणवलं. त्यातूनच आजचा हा लेख प्रत्यक्षात आला आहे. आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.