चार बायका एकत्र आल्यावर त्यांच्याकडं काय करू आणि काय नको, असा विषय येतो. मग असं काही तरी सुचतो आणि उभा राहतो एक असा भन्नाट व्हीडिओ. त्यांच्या या सगळ्या प्रकारात मे्ट्रो वाल्यांची काय चूक होती हेच कळंना. मोदींनी पुण्यात मेट्रो सुरू कशाला केली की लोकांना उन्हानं कासाविस व्हायलंयं पण त्यांनी गप्प त्यात बसावं की नाही. फुगडी घालाया मेट्रो देऊन राहले का मोदीजी? काही तरी आपलं उगीच करुन ठेवायचं म्हणजे आहेत कोण हे लोकं, हे आहेत आपल्यातलंचं लोकं आहेत. आनंद काय असतोयं ना तो त्याच्या डोळ्यात तुम्हाला दिसलं. पूर्वी बायकांना मनोरंजनासाठी एकच साधन असायचं. ते म्हणजे फुगडी. चार बायका एकत्र आल्या तर त्या करणार काय मग फुगडी घालणार, कधी कधी फुगडी घाला हा शब्द टोमणे म्हणूनही प्रचलित आहे. पोरं जास्त फिरकायला नाचायला लागली की त्यांना तुमची फुगडी बंद करा, असं सांगून आई गप्प करत असते. आता आनंदाचा क्षण आहे म्हटल्यावर बायका आणखी काय करणार म्हणून त्यांनी फुगडी घालत मेट्रोचं स्वागत केलं. होणार होणार म्हणत त्यांनी पुणे करांच्या सेवेत अखेर मेट्रो आलीच.
त्यात मीडयावाले हो सुरू झालेत काय मेट्रो सुरू झालीयं. कसं वाटतंयं, त्यावर आजोबांनी भारी उत्तर दिलंयं. आत्ताच बसलोय. थोड्यावेळानं या. काकांनी इंटरनेट वाल्यांचं अख्ख मार्केट हादरवलं होतं. तेवढ्यात ह्या काकूंची फुगडी सुरू झाली. काकांच्या या व्हीडिओला साईडींगला ठेवत इंटरनेट युझर्सनं ताई-माई आक्कांची ही सगळी फुगडी गॅंग आम्हाला दाखविली. आणि अरेच्चा आपल्याला हे काय सुचलं नाही कसं, असं म्हणत रिल्स करणाऱ्या पोरी आधी उडाल्या. काकी म्हणाल्या ही ओरीजनल हाय तुला जमायचं नाय. टॅलेंट असं कुटून कूटून भरलंयं. त्यामुळं ओरीजनल आहे ते ओरीजनलच राहणार, असं उत्तर देत काकूंनी रिल्सस्टारला बाजला करत जोरदार फुगडी सुरू केलीयं. लोकांनाही आपल्याकडं आनंद व्यक्त करायला जास्त मोठं काही नको असतं. आता या काकूंचंच बघा ना गणपती घरी आल्यावर शेवटची फुगडी घातली असेल पण त्यांच्याही लक्षात नसलं. पण मेट्रोनं जोर पकडला की त्यांच्या या सगळ्यांनी पाय थिरकवत ताल धरला. काकूंनी सरळ कमरेला पदर खोचला आणि सुरू केली फुगडी. लोकांनाही आवडली. मेट्रोमध्ये फुगडी हा विचार आजपर्यंत कुणी केला नव्हता.
फार फार तर मुंबईकरांनी लोकलमध्ये फुगडी बघितली असेल पण पुणेकरांना ही कल्पना नवी असेल त्यामुळे आधी सगळ्यानी व्हीडिओ काढून घेतले. हा प्रकार इंटरनेटच्या दुनियेत व्हायरल झालांयं. मेट्रो कशीही फिरू दे पण काकूंनी आपल्या फिरक्या थांबवल्या नाहीत. या वयात फुगडी घालून सर्वांना आश्चर्यचकीत करुन सोडलंयं. माणसं मोठी होतात पण त्यांच्यातलं अल्लड लहान मुल असतं ते कधीच मोठं होऊ नये. कारण ते लहान मुल मोठं झालं तर जग कसं बोरींग होईल. तुम्हाला मेट्रोमध्ये असली फुगडी घालायला काकी शोधून आणावी लागेल. काकींच्या या फुगडीला तुम्ही 10 पैकी किती मार्क द्याल ते सांगा पण त्यांच्या या वरच्या वर फिरणाऱ्या मेट्रोतल्या फुगडीनं जो काही कॉन्फिडन्स आलायं त्याला तोड नाही. काकींनी पक्का मनात करुन ठेवलंच होतं आज काहीही झालं तरीही उद्याच्या पेपरला आपला फोटो आलाच पाहिजे. इंटरनेटवर आपण व्हायरल झालंतं पाहिजे. काकींच्या सगळ्या हट्टापाई अगदी मनातलं बांध सोडून नाचणं तिथल्या इतर बायकांना शक्य झालं.
बघा व्हिडीओ :