Breaking News
Home / मनोरंजन / पुराच्या पाण्यात नको ते धाडस केलं आणि जीवावर बेतलं, बघा मन सुन्न करून जाणारा हा व्हिडीओ

पुराच्या पाण्यात नको ते धाडस केलं आणि जीवावर बेतलं, बघा मन सुन्न करून जाणारा हा व्हिडीओ

पावसाळा सुरू झाल्याने आता अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असे सगळ्या राज्यात जवळजवळ पाऊस सुरू झालेला आहे. काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी अगदी वाहतूक विस्कळीत होईल, इतका पाऊस झाला आहे. सगळीकडेच पावसाची सततधार सुरु आहे. नदी, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. अशा स्थितीत रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग बंद होतात. मात्र अशा वेळी काहीजण नसतं धाडस करतात आणि वाहत्या पाण्यातून बाईक, कार, गाडी काढण्याचा प्रयत्न करतात. हे धाडस कधी कधी जीवावर बेतू शकतं. यावेळी फक्त आपल्याच नाही तर आपल्या सोबत असलेल्या लोकांच्या जीवालाही धोका असतो. मात्र हे धाडस अनेक लोक करतात, पुरात तर विविध प्रकारचे धाडसी प्रकार केले जातात, ज्यातून आजवर अनेकांचा जीवही गेला आहे. पुरात धाडस करताना अनेक जण वाहून गेले आणि पुन्हा त्यांचा तपासच लागला नाही, असे व्हिडीओ देखील माध्यमांमधून प्रसारित झाले आहेत.

मात्र तरीही लोक वाहत्या पाण्यात गाडी टाकतात आणि जीव गमावून बसतात. असाच एक व्हायरल झालेला व्हिडीओ आमच्या टीम कडे आला. काही दिवसांपूर्वी एक ट्रॅक्टर असाच पुराच्या पाण्यात वाहून गेला तर नागपुरमध्येही असे विनाकारण धाडस केल्यामुळे स्कॉर्पिओ वाहून गेली. आताही असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात जीप वाहून गेली आहे.

तर व्हिडीओत आपल्याला दिसून येते की, त्या भागात खूप पाऊस आला. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे, परिणामी रस्ता ओलांडण्यासाठीचा जो पूल आहे, तो संपूर्ण पाण्याखाली गेला आहे. एवढेच नाही तर पुलावरून जे पाणी वाहत आहे, त्याचा वेग आणि प्रेशर खूपच जास्त आहे. आपल्याला दिसून येते की, पुलावरून पाणी जात होतं. लोक पूर पाहण्यासाठी नदी किना-यावर आले होते. पुलाच्या दोन्ही बाजूला चारचाकी आणि दोनचाकी गाड्या पाण्याचा प्रभाव कमी व्हायची वाट बघत आहेत. त्याचवेळी इथं भलतंच काहीतरी पाहायला मिळालं. पुलावरून वेगाने पाणी जात असताना एक गाडी वेगानं आली आणि थेट पुलावरून पाणी जात असताना पुढे निघून गेली. आणि बघता बघता जर पुढे घडलं ते पाहून सगळ्यांचा थरकाप उडाला. आणि हे खूप कमी वेळात घडलं.

विशेष बाब म्हणजे पुलावरून पाणी वेगाने जातंय. पाण्यात गाडी फसली तर जीवाशी खेळ होऊ शकतो हे माहित असतानाही नसतं धाडस या ड्रायव्हरनं केलं आणि वेगानं गाडी घेऊन हा निघून गेला. पण, पाण्याच्या प्रवाहासमोर याच्या गाडीचा टिकाव काही लागला नाही. कारण जसजशी ही गाडी पुढे जात होती तसं तसं तिच्यावरचं संकट वाढत जात होतं. पाण्याचा वेग आणि प्रभाव गाडीला एका बाजूला खेचत होता. आता मात्र काहीही झालं तरी गाडीतल्या लोकांचा जीव धोक्यात जाणारच होता. कारण मागे जाण्याचाही मार्ग बंद झाला होता आणि एका जागेवर थांबवणं म्हणजे जीव धोक्यात घालणंच होतं. आणि जसेजसे ते पुलावरून पुढे जात होते, तसतसे ते पुलावरून घसरत एका बाजूला चालले होते. अखेर या गाडीचा पाण्यासमोर काही टिकाव लागला नाही आणि गाडी नदीत कोसळली. पाहणारे लोक आरडाओरड करत होते. पण, पाण्याच्या रौद्रारुपासमोर कुणाचीही त्यांना वाचवायची हिंमत झाली नाही. अखेर ही गाडी पाण्यात बुडालीच. त्यामुळे नसते धाडस करून आपला आणि आपल्या जवळच्या लोकांचा जीव धोक्यात घालू नका.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.