रस्त्याने चालताना अचानक पाऊस आला आणि सोबत छत्री नसेल, तर लोक मिळेल त्या ठिकाणी छताचा आसरा घेताना दिसतात. एखाद्या दुकानापाशी किंवा एखाद्या घराच्या छताखाली लोक थांबतात आणि पाऊस जाण्याची वाट पाहतात. शहरात अनेकजण पटकन रिक्षा किंवा टॅक्सी पकडून आपल्या इच्छित स्थळाकडचा प्रवास सुरू करतात. काहीजण जाणीवपूर्वक पावसात भिजण्याचा निर्णय घेतात आणि पावसाचा आनंद घेत आपली वाट सुरू ठेवतात. मात्र रिक्षावाला किंवा वाहतूक करणारी मंडळी असे असतात की, जे या अशा घाईत आपला धंदा बघतात. शेवटी पोटपाणी सगळ्यांनाच असतंय. अशा पावसात रोमँटिक असणारी मंडळी मात्र भिजू शकतात किंवा जे नव्याने प्रेमात पडलेले आहे, ही मंडळी तर पाऊस आल्यावर आपल्या जोडीदाराला घेऊन भटकंती करायला निघतात. शेवटी विषय असाय की, पाऊस सगळे वेगवेगळ्या अंगाने अनुभवतात आणि आनंद घेतात. आता आमच्याकडे एक असा व्हिडीओ आला आहे, जो पाहून आम्हीही आश्चर्यचकित झालो आहोत.
भर पावसात एखादा शहाणा माणूस काय करतो, तर आडोसा धरून एका बाजूला उभा राहतो. फार फार तर चहा पितो, भजी खातो… पण एखादा असा माणूस बघितला आहे का? जो गाडी वगैरे सोडून खुशाल पाण्यात नाचत बसलाय. निवांत पाऊस एन्जॉय करतो आहे. विशेष म्हणजे पावसात थेट तो नाचतोय…आणि रिल्सही बनवतोय…
खरं तर लग्नाची वरात निघाल्याचं आणि पावसात भिजत भिजत डीजेच्या तालावर वऱ्हाडी मंडळी डान्स केल्याचं दृश्य आपण या आधी एका व्हायरल व्हिडीओमध्ये बघितलं असेल. अशातच आता एका अतरंगी रिक्षावाल्याचा सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत एकदम आनंदी नजारा पाहायला मिळतो आहे. व्हायरल होणारा व्हिडिओ हा एका रिक्षाचालकाचा आहे. हा व्हिडिओ गोध्रा रेल्वे स्थानक परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे.
व्हिडिओत दिसत आहे की, रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावर मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यात रिक्षाचालक आपली रिक्षा थांबतो आणि त्यानंतर भर पावसात डान्स सुरू करतो. त्याच्या आजूबाजूला मोठ्या गाड्या जा-ये करत आहेत. पण याची रिक्षा बंद पडल्याने याने भर पावसात साचलेल्या गढूळ पाण्यात आपला नाच सुरू केला आहे. एवढा मुसळधार पाऊस सुरू असताना हा रिक्षावाला का नाचतोय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल मात्र त्याला याची काहीच फिकीर नव्हती. रिक्षावाला आपल्याला धुंदीत मस्तपैकी नाचत होता.
आता काही लोकांनी या रिक्षावाल्याला नाव ठेवले तर काही लोकांनी कौतुक केले. रिक्षावाल्याला मात्र ना टीकेचा फरक पडला ना कौतुकाने तो हरखला… तो फक्त स्वतःच्या आनंदासाठी हे सगळं करत होता. असंच मनसोक्तपणे आयुष्य जगता यायला हवं… हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :