Breaking News
Home / मनोरंजन / ‘पुष्पा’ चित्रपटाच्या गाण्यावर ह्या मराठमोळी जोडीने लग्न झाल्या झाल्या केला जबरदस्त डान्स, बघा व्हिडीओ

‘पुष्पा’ चित्रपटाच्या गाण्यावर ह्या मराठमोळी जोडीने लग्न झाल्या झाल्या केला जबरदस्त डान्स, बघा व्हिडीओ

सध्या व्हॅलेंटाईन डे चा फिवर सगळीकडे होता. आपल्यापैकी काहींनी तर पूर्ण व्हॅलेंटाईन वीक आणि डे ही हे दोन्ही साजरे केले असतील. काहींच्या पदरी मात्र यानिमित्ताने निराशा ही आली असेल. पण हरकत नाही. आज नहीं कभी और सही. असो. पण या दिवसाचे निमित्त साधून आपल्या टीमला काही तरी छान लिहावं अस वाटत होतं. आता विषय काय असावा याविषयी चर्चा चालू होती आणि तेवढ्यात एक व्हिडियो बघण्यात आला. काहीच दिवसांपूर्वी एकदा बघण्यात आला होता पण तेव्हा काही लिहिलं नव्हतं.

पण आज मात्र हा व्हिडियो बघताच क्षणी ठरलं की याविषयी लिहायचं. हा व्हिडियो एका जोडीचा आहे. तसा छोटाच व्हिडियो आहे. पण या कमी कालावधीत ही त्यांच्यातील केमिस्ट्री दिसून आली. म्हंटलं व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी काही लिहायचं तर मग या शिवाय उत्तम विषय नाही. त्यातूनच मग आजचा हा लेख लिहिला जातो आहे. तर मंडळी, वर उल्लेख केल्याप्रमाणे हा व्हिडियो आहे एका जोडीचा. पण नुसता व्हिडियो नाहीये बरं का ! तर हा त्यांच्या लग्नाचा व्हिडियो आहे. त्यामुळे आधीच गोड जोडी आणि त्यात त्यांच्या लग्नाचा व्हिडियो म्हणजे आपल्यासाठी उत्तम मनोरंजन होय. बरं त्यात या व्हिडियो मध्ये पुष्पा सिनेममधील गाणं ऐकायला मिळतं. ‘ओ अंटावे मामा’ हे ते गाणं आहे. रश्मिका आणि अल्लू अर्जुन या जोडीने या गाण्यावर जो काही डान्स केलाय तो अफलातून आहे.

बरं पुष्पा ही लोकप्रिय ठरला आहेच. त्यामुळे या जोडीची केमिस्ट्री आणि हे सुप्रसिद्ध गाणं यांचा मस्त मेळ जमून येतो. बरं केवळ एवढ्या वरच गोष्टी थांबत नाहीत. या जोडीच्या केमिस्ट्रीला दाद दयायला नवरा नवरीचं मित्र मंडळ ही सामील असतं. त्यामुळे हे दोघेही मध्यभागी डान्स करत असताना आजूबाजूला त्यांचा मित्रपरिवार ही डान्स करत असतो. त्यामुळे एकंदरच उत्साह आणि आनंदाचे वातावरण आपल्याला अनुभवायला मिळते. अर्थात या सगळ्याची सुरुवात होते ती व्हिडियोच्या अगदी सुरुवातीपासून !त्यामुळे व्हिडियो छोटा असला तरी आपल्या लक्षात राहतो. अर्थात याची सुरुवात होते तेव्हा या जोडीतील आपली ताई डान्स करायला सुरुवात करते. समोर आपले भावोजी असतात. तिचा बिनधास्त अंदाज बघून ते पण थिरकायला लागतात. बरं हे सगळं बिट्स वर होत असत. एकदम कट टू कट म्हणा ना. त्यामुळे हा व्हिडियो बघताना महा येते. बरं अशा व्हिडियोजचा शेवट कसा होतो ते ही महत्वाचं असतं. कारण काही व्हिडियोज मध्ये अनेक वेळा जबरदस्त डान्स करून सगळे जण अचानक थांबतात आणि शेवटचे काही क्षण शांततेत जातात. मग मजा निघून जाते. पण… इथे तसं होत नाही. शेवटच्या क्षणी भावोजी धावून येतात. धावून येतात म्हणण्या पेक्षा धावून जातात. आपल्या ताईला घेऊन, तिचा डान्स आवरता घेत दुसरीकडे निघून जातात. का जातात ते माहीत नाही, पण त्या क्षणी आपण आणि तिथे असलेले सगळे जण हसायला लागतो.

त्यामुळे या व्हिडियोत सुरुवात, मध्य आणि शेवट हे सगळं गोडच ठरतं. त्यामुळेच सध्याच्या व्हॅलेंटाईन वातावरणात या व्यतिरिक्त इतर कोणता व्हिडियो चपखल वाटला असता असं वाटत नाही. कारण यात मस्त डान्स आहे, केमिस्ट्री आहे, नवरा बायको आहेत, मजा मस्ती आहे, मित्र मंडळी आहेत आणि मजेशीर असा शेवट आहे. आणि हे सगळं आपल्या आवडत्या गाण्यावर होत असत. यापेक्षा अजून आनंदासाठी एका व्हिडियोतुन काय पाहिजे असतं. हेच सगळं तर पाहिजे असतं. आता तुम्ही म्हणाल तुम्ही सगळं सांगितलं ते मस्त झालं. पण एकटेकटे व्हिडियो बघणार काय? अर्थातच नाही. शेवटी आनंद वाटल्याने वाढतो म्हणतात ना ! त्यामुळे हा व्हिडियो आम्ही खाली शेअर करतो आहोत. आम्ही या व्हिडियोचा जसा आनंद लुटला तसा आपण ही लुटा ! बरं आमच्या प्रमाणेच हा आनंद ही शेअर करा. त्यासाठी आपला हा लेख शेअर केला तर अधिक उत्तम !!

चला तर मंडळी आता हा लेख आटोपता घेतोय. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *