सध्याच्या सोशिअल मीडियाच्या जमान्यात प्रत्येकाला अधिकार आहे आपले मत व्यक्त करण्याचा. कलाकारांच्या फोटोजवर तर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत असतात. कलाकारांनी फोटो पोस्ट केला रे केला, कि लगेच चाहत्यांच्या कमेंट्स यायला सुरुवात होतात. बहुतेककरून चांगल्या कमेंट्स येत असतात. परंतु सर्वच कमेंट्स चांगल्या येतील असंही नसतं. अनेकदा कलाकारांना ट्रॉल केले जाते. काहीवेळेला निगेटिव्ह कमेंट्स सुद्धा येतात. मग त्या कमेंट्स सेलिब्रेटीच्या लूक बद्दल असतात, त्यांच्या ड्रेस बद्दल असतात, त्यांच्या चित्रपटांबद्दल किंवा मग काही व्यैयक्तिक गोष्टीवरून सुद्धा असतात. कलाकार मंडळी साधारणतः अश्या कमेंटकडे दुर्लक्ष करतात. परंतु कधी कधी इतक्या खालच्या पातळीवरच्या कमेंट्स असतात कि, मग कलाकारांना उत्तर देणे भाग पडते किंवा मग त्या कमेंट्स डिलीट सुद्धा कराव्या लागतात. आणि जर का असे केले नाही तर मग इतर नकारात्मक लोकं सुद्धा अश्या कमेंट वाचून दुसऱ्या नकारत्मक कमेंट देतात.
ह्याच गोष्टीवर अभिनेत्री पूजा सावंत हिला एका मुलाखतीत विचारण्यात आले कि, तुम्ही अनेकदा तुमचे छानछान फोटोशूट सोशिअल मीडियावर टाकत असतात. ह्यावर चाहत्यांच्या बऱ्याचशा कमेंट येतात. त्यातील काही नकारात्मक कमेंट सुद्धा असतात. त्यातील नकारात्मक कमेंट्स कधीकधी तुम्ही डिलीट करतात, असे का. ह्यावर तुमचे काय मत आहे.
त्यावर पूजा सावंत हिने खूप छान असे उत्तर देऊन तिच्या सोशिअल मीडियावरच्या ट्रॉलर्स आणि निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांची बोलतीच बंद केली. अभिनेत्री पूजा सावंत हिने आपले ह्याबाबतीत बिनधास्त मत प्रदर्शित केले. अभिनेत्री पूजा सावंत हिने ह्या मुलाखतीत म्हटले आहे कि ‘सोशिअल मीडियावर प्रत्येकालाच अधिकार आहे बोलायचा. परंतु ह्याचा अर्थ असा होत नाही कि कोणी काहीही वाटेल तसे बोलेल. आम्हांला ज्या निगेटिव्ह कमेंट्स येतात, त्यांना मला सांगायचे आहे कि आम्ही सुशिक्षित आहोत. आम्हांला आईवडिलांनी खूप चांगले संस्कार दिलेले आहेत. आम्ही एखादा फोटो सोशिअल मीडियावर टाकत असतो, त्याअगोदर आम्ही शंभरवेळा विचार केलेला असतो. त्यावर जर आमचं उत्तर हो असतं तेव्हाच आम्ही तो फोटो अपलोड करतो. त्यामुळे मग अश्या गोष्टी विचारूच नका कि असे कपडे का घातले, हा असा का दिसतो, मराठी संस्कृती जपा, वगैरे.
पुढे अभिनेत्री पूजा सावंत म्हणाली कि, आपली मराठी संस्कृती जपणं, हे आम्हाला आमच्या आईवडिलांनी खूप चांगल्याप्रकारे शिकवले आहे. आणि होय, मी निगेटिव्ह कमेंट्स डिलीट करते. कारण मला जर दहा कमेंट्स येत असतील तर त्यातील एकच नकारात्मक कमेंट्स येते. त्यामुळे मी त्यातील उरलेल्या ९ जणांना महत्व देते. जे खरंच खूप चांगल्या प्रतिक्रिया देतात आपल्याबद्दल. ते आपल्याला प्रोत्साहित करतात. आणि मी निगेटिव्ह कमेंट डिलीट करते, कारण एक निगेटिव्ह कमेंट वाचल्यानंतर मग काही नकारात्मक मंडळी सुद्धा ते वाचून तसंच काहीतरी लिहितात. अभिनेत्री पूजा सावंत म्हणते कि, मला सगळ्यांना हेच दाखवून द्यायचं असतं कि, जी लोकं माझ्यावर प्रेम करतात, त्यांनाच माझ्या आयुष्यात जागा आहे. जे लोकं माझ्यावर प्रेम करत नाहीत, त्यांना माझ्या आयुष्यात जागा नाही.
अभिनेत्री पूजा सावंत हिने दिलेले हे उत्तर ट्रॉलर्स आणि नकारत्मक कमेंट करणार्यांसाठी जणू जबरदस्त चपराकच आहे. आणि ते खरंच खूप योग्य असे उत्तर आहे. कारण आपणही एखाद्या व्यक्तीला ट्रॉल करताना किंवा त्या व्यक्तीबद्दल नकारत्मक लिहितेवेळी शंभरदा विचार करायला हवाच. समोरची व्यक्ती देखील माणूसच आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला देखील त्यांच्या व्यैयक्तिक पातळीवर केलेल्या कमेंट्स मनाला लागू शकतात. आम्ही अभिनेत्री पूजा सावंतचा हा व्हिडीओ खाली देत आहोत. तुम्ही नक्की पहा.
बघा व्हिडीओ :