मराठी गप्पा म्हणजे मनोरंजन विश्व तसेच आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनांबद्दलचे लेख वाचण्याचं एकमेव ठिकाण. इथे तुम्हाला मनोरंजन क्षेत्रापासून ते वायरल व्हिडियोज पर्यंत, सामान्य ज्ञानापासून ते पो’लिसांनी दाखवलेल्या शौर्या बद्दलच्या गाथा वाचायला आणि अनुभवायला मिळतात. यात अनेक वेळेस आमची टीम विविध व्हिडियोज बद्दलचे लेख आपल्या भेटीस आणत असते. या व्हिडियोज मधून काही ना काही गंमत निर्माण होत असते. पण त्यात सद्य परिस्थितीवर भाष्य केलेलं असतंच असं नाही. आज मात्र आमच्या टीमने लिहिलेल्या लेखात अशा व्हिडियोचा आढावा घेण्यात आलाय जो थोडा वेगळा आहे. तो व्हिडियो सध्या सामान्य माणसाच्या चर्चेचा विषय असणाऱ्या एका बाबीवर अनाहूतपणे का होईना भाष्य करतो.
हा व्हिडियो आहे एका पेट्रोल पंपावरचा. या व्हिडियोच्या सुरुवातीस आपल्याला दोन व्यक्ती दिसतात. एक व्यक्ती असते पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि दुसरी व्यक्ती म्हणजे आपल्या गाडीत इंधन भरून घेण्यासाठी आलेलं गिर्हाईक. सुरुवातीस पेट्रोल पंपावरील कर्मचारी आपल्या हातात इंधनाचा पाईप घेऊन उभा असतो. त्याच्या सोबत असणारी दुसरी व्यक्ती काही क्षणातच आपल्या हातात हा पाईप घेते आणि त्यातून जास्तीत जास्त इंधन गाडीत पडेल हे पाहते. त्यासाठी हे पाईपचा पुढचा भाग आपटते. पेट्रोल पंपावरील कर्मचारी त्या गिऱ्हाईकास हातातील पाईप थोडा वर उचलण्यास सांगतो, जेणेकरून आत इंधनाचे काही थेंब असतील तर तेही गाडीत पडावेत. त्याच्या सांगण्यानुसार सदर व्यक्ती वागते सुद्धा. जणू काही त्या पाईपात असलेला इंधनाचा प्रत्येक थेंबन थेंब त्या व्यक्तीस गाडीत भरायचा असतो. पेट्रोल डिझेल च्या उचंबळून आलेल्या किंमतींनंतर हा व्हिडीओ केला गेला असावा असं वाटतं पण त्याबाबत ठोस असा काही पुरावा दिसत नाही.
३० सेकंदांच्या या व्हिडियोच्या शेवटी शेवटी तर ही व्यक्ती हातातल्या त्या नळकांड्याच्या इंधन भरण्याच्या टोकाला आपल्या बोटांनी पुसून घेते आणि हाताला लागलेलं इंधन गाडीच्या इंधन टाकीच्या जागी पुसते आणि व्हिडियो संपतो.
या व्हिडियोची खासियत अशी की यात सहभागी व्यक्ती एकही शब्द उच्चारत नाहीत. होतात त्या फक्त कृती. सध्या इंधनाच्या किमंतीत झालेली भाववाढ या व्हिडियो मागे असावं असं वाटतं. एका अर्थाने सामान्य माणसाच्या मनात उठलेल्या प्रतिक्रियेचं दर्शन या व्हिडियोतुन होतं. आपल्याला हा लेख आणि हा व्हिडीओ आवडल्यास आम्हाला क’मेंट्स से’क्शन मध्ये कळवा. तसेच शेअरही करा. आमच्या टीमने वेळोवेळी वायरल व्हिडियोज वर लेख लिहिले आहेत. ते छोटे आणि माहितीपूर्ण आहेत. त्या लेखांचाही आस्वाद घायला विसरू नका. आपल्या सदैव असलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
बघा व्हिडीओ :