Breaking News
Home / मनोरंजन / पेशंटला लवकर बरे करण्यासाठी ह्या सिस्टरने जे केले ते पाहून तुम्हीदेखील सलाम कराल, बघा व्हिडीओ

पेशंटला लवकर बरे करण्यासाठी ह्या सिस्टरने जे केले ते पाहून तुम्हीदेखील सलाम कराल, बघा व्हिडीओ

गाणी ही आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहेत. आपल्या प्रत्येक मूड नुसार आपण गाणी ऐकत असतो. पण काही गाणी अशी असतात की कधीही ऐका, फार बरं वाटतं. आपल्या मराठीत तर एकापेक्षा एक अशी गाण्यांची मांदियाळीच बघायला मिळते. हीच बाब इतर भाषांमध्ये ही असते. असंच एक तेलगू भाषेतील गाणं काही काळापासून अगदी धुमाकूळ घालतंय. एवढं की हे गाणं स्वतः तर वायरल झालंच आहे. सोबतच हे गाणं वापरून तयार केलेले एकसो एक व्हिडियोज ही वायरल होत आहेत. त्यातच एका नवीन व्हिडियोची भर पडली आहे. पण हा व्हिडियो केवळ मनोरंजन करतो असं नाही, तर सोबतच आपल्या मनाला समाधान ही देऊन जातो. चला तर मग जास्त वेळ न दवडता या व्हिडियो विषयी जाणून घेऊयात.

तत्पुर्वी वर उल्लेख केलेल्या गाण्याविषयी प्रथमतः जाणून घेऊयात. हे गाणं आहे बुलेटू बंदी. मोहना भोगराजू यांनी गायलेलं आणि लक्ष्मण यांचे शब्द असलेलं हे गीत. युट्युब वर या गाण्याला ११ करोडहुन अधिक लोकांनी पाहिलं आहे. तसेच १० लक्ष लाईक्स मिळालेलं हे गाणं आहे. आपल्या पैकी अनेकांनी या गाण्याचा आस्वाद घेतला असेलच. तर या गाण्यावर मध्यंतरी एका हॉस्पिटलमध्ये एका नर्सने डान्स केला होता.

अर्थात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात हा डान्स केल्याने नेटकरऱ्यांनी या डान्सला अगदी उचलून धरलं होतं. हा व्हिडियो वायरल झाला होताच. आता एका नवीन नर्सने याच गाण्यावर डान्स केला आहे. एवढंच नव्हे तर आपल्या पेशंटला सुद्धा यावर ताल धरायला लावला आहे. पण असं का असं तुम्हाला वाटलं असेलच. याचं कारण म्हणजे सदर पेशंट व्यक्तिला पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेल्याचं कळतं. त्यामुळे या व्यक्तीला डाव्या हाताने फारशी हालचाल करता येत नसल्याचं आपण व्हिडियोत ही पाहू शकतो. अशावेळी काहीसा शारीरिक व्यायाम होणं आवश्यक असतं. पण अगदी यांत्रिकपणे व्यायाम करायला गेल्यास आधीच एका धक्क्यात असलेली व्यक्ती किती जोशात सहभागी होऊ शकेल? ते ही अगदी मनापासून? पण यावर उपाय म्हणून हे गाणं वाजवत पेशंटकडून हलके हलके डान्स करत व्यायाम करवून घेण्याची शक्कल या नर्सने लढवल्याचं कळतं. हुशारी अगदी कलात्मकतेने वापरणं म्हणजे काय याचं हे उत्तम उदाहरण आहे. आपण हा दीड मिनिटांचा व्हिडियो पाहायला सुरुवात करतो तेव्हा या नर्स आपल्याला पेशंटच्या जवळच उभ्या असलेल्या दिसतात. त्या आपल्या हातांच्या हातावाऱ्यांनी पेशंटला व्यायाम शिकवत असतात. पेशंट सुदधा अगदी उत्साहाने यात सहभागी होताना आपण पाहतो. सुरुवातीला त्यांच्या उजव्या हाताचा व्यायाम होईल या उद्देशाने केवळ एका हाताचा व्यायाम करून घेतला जातो.

मग थोडा आत्मविश्वास वाढल्यावर याच नर्स, पेशंटला दोन्ही हातांची पकड घट्ट करायला सांगतात जेणेकरून दुसरा हात खाली पडणार नाही. कदाचित हा व्यायाम करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ असावी. कारण जेव्हा हे पेशंट दादा आपले दोन्ही हात एकमेकांत गुंतवून आणि उंचावत व्यायाम करू लागतात तेव्हा सगळ्यांत जास्त आनंद या नर्सला होतो. तो होणं साहजिकच आहे म्हणा. तसेच नकळतपणे आपणही या आनंदात सहभागी होतो. आपल्याला भले यामागची पूर्ण कथा माहिती नसेल पण एखाद्या पेशंटच्या बाबतीत जर काही सुधारणा होत असेल आणि त्यासाठी नर्स आणि हॉस्पिटल कर्मचारी इतकी मेहनत घेणार असतील तर आनंद होणारच ना. म्हणूनच वर जो उल्लेख झाला होता की आपल्याला हा व्हिडियो पाहून मनोरंजन होईल आणि समाधान वाटेल ते याचसाठी. पेशंटची होत असलेली प्रगती उत्तम असली तरी एकाच वेळी सगळा भार नको म्हणून मग या नर्स त्यांना दोन्ही हात खाली करायला सांगतात. मग पुन्हा एकाच हाताने व्यायाम करायला सुरुवात करतात. अर्थात पेशंट साठी हा व्यायाम असला तरी नर्स थोड्या डान्स स्टेप्स ही करून घेतात. त्यांना डान्सची आवड आणि सवय असावी असं वाटतं.

शेवटी मग पेशंटच्या प्रगतीवर खुश होत गाणं संपल्यावर पेशंटला टाळी देत त्या निघून जातात. एरवी हॉस्पिटल म्हंटलं की धीर गंभीर आणि काही वेळेस अंगावर येणारं वातावरण वाटून जातं. पेशंटची हालत तर विचारूच नका. पण काही क्षण का होईना पण जर असं वातावरण असेल तर हॉस्पिटलमधील काळ हा सुसह्य होऊन जाऊ शकतो. असो.

आपल्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. म्हंटलं आपल्या वाचकांनी याविषयी वाचलंच पाहिजे. त्यातूनच हा लेखप्रपंच घडून आला. आपल्याला आमच्या टीमचा हा प्रयत्न आवडला असावा अशी सार्थ अपेक्षा आहे. आपण नेहमीच आपल्या टीमला प्रोत्साहन देत असता. आपलं हे प्रोत्साहन आम्हाला यापुढेही मिळत राहू द्या. आम्हीही नेहमीप्रमाणे उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस आणत राहूच याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे तुम्ही न वाचलेले लेख जरूर वाचा. प्रत्येक लेख आठवणीने शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *