लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलंच. त्यांचं निरागसपणे बोलणं, वागणं आपल्याला आनंदी करतं, हसायला लावतं, कधी कधी रागही येतो तर काही वेळा, अलगद विचार करायलाही भाग पाडलं जातं. असं त्यांचं बोलणं. अशा या बोलण्यामुळे अनेक वेळेस गंमतीशीर आणि वायरल होणारे व्हिडियोज बनतात आणि आपल्या समोर येतात. आता अशाच एका व्हिडियो विषयी आमच्या टीमला कळलं आणि त्या गंमतीशीर व्हिडीओ विषयीचा लेख आपल्या भेटीस आम्ही आणला आहे. हा व्हिडीओ आहे एका लहान मुलाचा ज्याला त्याचा मामा आणि अन्य घरचे पोहणं शिकवायला घेऊन गेले आहेत तलावावर. त्यात या मुलाचे मामा पाण्यात उभे राहून भाच्याला पोहणं शिकवायला तयार आहेत.
पण भाचेराव मात्र अंमळ घाबरत घाबरत पुढे जाताना दिसतात. अर्थात लहान मुलांना पाण्यात जाण्याची भीती ही सर्वप्रथम वाटणारच. त्यात काही नवीन नाही. पण या मुलाने पाण्यात उतरण्यास नकार देताना जी काही शाब्दिक फ’टकेबाजी केली आहे की विचारता सोय नाही. एखाद्या फलंदाजसारखी त्याची शाब्दिक फलंदाजी पूर्ण व्हिडियोभर चालू राहते. या फलंदाजीने त्याचे मामा आणि आजूबाजूचे लोक हसूनहसून लोटपोट होतात. अजून मोठ्ठा झालेलो नाही, मोबाईल फोन नाही, हातात काम नाही, वडीलांसारखी मोठ्ठी गाडी नाही अशी एक ना अनेक कारणं हा मुलगा देतो. त्यात त्याची बोलण्याची पद्धत व्हिडियोत हास्यरस ओतते. अर्थात त्याने कितीही प्रयत्न केला, तरीही त्याचे मामा त्याला एकदा का होईना पाण्यात घेऊन जाण्यात यशस्वी होतात. तसेच तो बु’डू नये म्हणून सोबत त्याच्या पाठीशी एक प्लास्टिक कॅन पूर्णवेळ बांधलेला असतो. त्यामुळे त्याच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतलेली असते. सोबत किनाऱ्याला काही मंडळी असतातच. पण पोहायला सुरुवात केल्यावर मात्र सगळेच हसणं थांबवतात. जेणेकरून त्याचा धीर खचू नये.
पण शेवटी शेवटी त्याला पाठांगूळीला मा’रलेल्या मामांची हालत पाहून बाकीच्यांनाही हसायला येतं आणि व्हिडियो संपतो. आपल्याला आमच्या टीमने लिहिलेल्या वायरल व्हिडियो विषयक लेख आवडतात हे आपल्या वाचक संख्येवरून कळतं. आपल्याला ते लेख पुन्हा वाचायचे असल्यास किंवा नवीन लेख असतील तर ते पहायचे असल्यास वर उपलब्ध सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात ‘वायरल’ असं लिहून सर्च केल्यास आपल्याला वैविध्यपूर्ण असे वायरल व्हिडियोज आणि त्याविषयीचे लेख वाचायला मिळतील. यात गंमतीशीर व्हिडियोज सकट, अंतर्मुख करणारे लेख आणि तसे व्हिडियोज ही आहेत. आपण ते जरूर वाचावेत आणि पाहावेत. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !
बघा व्हिडीओ :