Breaking News
Home / बॉलीवुड / प्रत्येकवर्षी २० कोटी रुपये कमावतो हा सुपरस्टार, बायको आहे खूपच सुंदर

प्रत्येकवर्षी २० कोटी रुपये कमावतो हा सुपरस्टार, बायको आहे खूपच सुंदर

माणसाच्या आयुष्यात खूप काही असतं, परंतु गोष्ट जेव्हा सुपरस्टारच्या आयुष्याबद्दल असेल तेव्हा गोष्ट काही वेगळीच असते. आम्ही बॉलिवूड नाही तर साऊथचा सुपरस्टार रामचरण बद्दल बोलत आहोत. साऊथचा खूप मोठा सुपरस्टार म्हणून बोललं जातं त्या रामचरणचे चित्रपट जेव्हा येतात तेव्हा फक्त देशातच नाही तर परदेशात सुद्धा रिलीज होतात आणि करोडोंची कमाई करतात. जर तुम्हांला रामचरण ह्याच्या बद्दल माहिती नसेल, तर रामचरण हा साऊथचा लोकप्रिय सुपरस्टार चिरंजीवी ह्यांचा मुलगा आहे. रामचरणचा सर्वात सुपरहिट चित्रपट ‘मगाधिरा’ आहे. ज्यात त्याच्यासोबत काजल अग्रवाल हि अभिनेत्री होती. ह्या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स तोडले होते. रामचरण फक्त साऊथ इंडस्ट्री पर्यंत मर्यादित राहिला नाही तर त्याने बॉलिवूडमध्ये सुद्धा काम केले आहे.

रामचरणने २०१३ मध्ये आलेल्या ‘जंजीर’ चित्रपटात प्रियांका चोप्रा सोबत काम केले आहे, तेव्हा त्याने उत्तर भारतीय लोकांमध्ये आपली एक वेगळीच ओळख बनवली. जर रामचरण ह्याच्या लग्नाबद्दल बोलाल तर त्याचे लग्न उपासना कामिनीनी हिच्यासोबत झाले आहे. उपासना ‘अपोलो’ च्या चेअरमन ची मुलगी असून तिच्याजवळ सुद्धा करोडोंची संपत्ती आहे. आणि रामचरणची गोष्ट कराल तर तो सुद्धा काही कमी नाही आहे. रामचरणकडे जुबली हिल्सजवळ एक खूप मोठा आणि सुंदर बंगला आहे, ज्याची किंमत ३८ कोटी रुपये आहे. हा बंगला अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे, ज्यामुळे ह्याचे महत्व अजून जास्त वाढते. त्याच्याजवळ अनेक महागड्या बीएमडब्ल्यू आणि ऑडीच्या गाड्या आहेत, ज्यामधून तो अनेकदा येताना दिसून येत असतो. रामचरणचे वार्षिक उप्तन्न जवळजवळ २० कोटी रुपये आहे आणि त्याच्याजवळ तब्बल १२५० कोटी रुपये इतकी संपत्ती आहे.

रामचरण टॉलिवूडचा सर्वात महागडा अभिनेता आहे. २००७ साली आलेल्या ‘चिरुथा’ चित्रपटापासून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. परंतु त्याला खरी ओळख ‘मघाधीरा’ ह्या चित्रपटापासून मिळाली. हा त्याच्या करिअरचा दुसरा चित्रपट होता. हा चित्रपट खूप ब्लॉकबस्टर झाला होता. ह्यानंतर त्याने पुन्हा कधीच मागेच वळून पाहिले नाही आणि त्यानंतर बॅक टू बॅक हिट चित्रपट दिले. ‘मगाधिरा’, ‘येवंडू’, ‘ऑरेंज’, ‘नायक’, ‘ब्रूस ली’ हे सुपरहिट चित्रपट दिले. ह्या दरम्यान त्याला अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले, ज्यामध्ये २ नंदी अवार्ड, आणि २ साऊथ फिल्मफेअर अवार्ड मिळाले. रामचरण एक डान्सर, प्रोड्युसर आणि बिझनेसमॅन सुद्धा आहे. ह्याशिवाय रामचरण एक क्रीडाप्रेमी सुद्धा आहे. रामचरणचे बॉलिवूड पर्दपण खूप चर्चेत राहिले होते, परंतु त्यानंतर तो कोणत्याच हिंदी चित्रपटात दिसला नाही. अमिताभ बच्चन स्टारर ७० च्या दशकातील ‘जंजीर’ चित्रपटाच्या रिमेकमधून त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्याच वेळी त्याचे वडील चिरंजीवीने सांगितले होते कि, तो ज्या अभिनेत्याचा फॅन आहे, त्यांच्याच चित्रपटाच्या रिमेकने रामचरण बॉलिवूड करिअरची सुरुवात होत असल्याने खुश आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *