Breaking News
Home / मनोरंजन / प्रयत्न कधी सोडायचे नसतात, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील ह्या कलाकाराचे कौतुक कराल

प्रयत्न कधी सोडायचे नसतात, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील ह्या कलाकाराचे कौतुक कराल

आपण प्रत्येक जण जे काही काम करत असतो त्यात आपल्याला यश हे अपेक्षित असतं. अर्थात आपल्या कामानुसार यशाची परिमाणं बदलत जातात. पण अस असलं तरी अपेक्षित यश मिळणं हेच अंतिम ध्येय असत. त्यामुळे कुठेही कामासाठी गेलो, काहीही करत असलो तरी यश हे काही आपल्या डोक्यातून जात नाही. बरं यश हे काही सहजासहजी मिळेलच याची खात्री देता येत नाही. अनेकवेळा त्यासाठी संघर्ष करावा लागतो. काही वेळा तर अगदी थोड्याश्या कारणासाठी आपल्याला यश हुलकावणी देत असत. अशावेळी दोन पर्याय आपल्या समोर असतात. प्रयत्न सुरूच ठेवणं किंवा प्रयत्न सोडणे.

अर्थात प्रयत्न सोडले की होणारा त्रास ही कमी होणार असतो, पण अपेक्षित यश तात्पुरतं का होईना हुलकावणी देणार असतं. पण त्याच जागी जर प्रयत्न सुरू ठेवले तर करावे लागणारे कष्ट वाढण्याची शक्यता जास्त असते. किंबहुना या कष्टांसोबत येणारा त्रास ही सहन करावा लागतो. पण एकदा का आपल्याला योग्य मार्ग सापडला की आपल्याला यश मिळण्याची शक्यता वाढते. बरं अस असलं तरी जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आपण अगदी ठामपणे सगळं यश मिळेलच याची खात्री देऊ शकत नाही.

काही वेळा तर पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागू शकतो. पण आपलं ध्येय निश्चित आणि दृढ असेल आणि स्वतःवर विश्वास असेल तर आपण सरतेशेवटी यश हे मिळवतोच. तो यशाचा क्षण अगदी मनात कोरून ठेवावा असाच असतो. किंबहुना तो तसा कोरलेला राहतो. याचंच एक उत्तम उदाहरण आम्हाला एका व्हिडियोच्या माध्यमातून पाहायला मिळालं. व्हिडियो थोडा जुना असावा, त्यामुळे त्यातील चलचित्र थोडी धुरकट वाटतात. पण अस असलं तरी त्यातील जे क्षण आपण अनुभवतो ते बरंच काही शिकवून जातात. हा असा जबरदस्त व्हिडियो आहे एका सर्कसचा !एकेकाळी मनोरंजनांच खूप लोकप्रिय असणारं हे साधन नाही म्हंटलं तरी थोडं लुप्त होत चाललंय अस वाटतं. त्यातही शहरांत तर याच्या बऱ्याचश्या पाऊलखुणा कमी कमी होत गेल्या आहेत हे जाणवतं. पण अस असलं तरी लाईव्ह मनोरंजन प्रकारातील हा सर्कसचा खेळ बघणं म्हणजे एक अद्भुत पर्वणी असते. माणसाचं शरीर किती लवचिक आणि त्याचवेळी किती ताकदवान असू शकतं याचा पुरावा यातून मिळतो. आजचा व्हिडियो ही याच एक प्रतीक आहे. या व्हिडियोत आपल्याला एक करामती करणारी कलाकार आणि तिची कला बघायला मिळते.

ही कला बघायला ही अवघड वाटते तर ती सादर करायला किती अवघड असावी याची आपण कल्पना केलेली बरी ! कारण यात ही कलाकार पाठीवर झोपून असते आणि तिने पायांवर एक सर्कसचं साहित्य सांभाळलेलं असतं. साहित्य म्हणजे एका भल्या मोठ्या धातूच्या पाईपला अनेक छोटे छोटे पाईप जोडलेले असतात. आणि अगदी वरच्या टोकाला एक जाळी असते. आता या कलाकाराचं काम काय असतं तर आपल्या हातातील बास्केटबॉल एकेक करत त्या पाईपांवर नाचावयचा. त्यांची मांडणी ही अशी असते की प्रत्येक वेळी तो बॉल एक पाईप वर जाऊ शकेल. अर्थात हा सगळा कौशल्याचा खेळ आहे हे मान्य करायला हवं. कारण हे सगळं करत असताना केवळ पाय हलवणे इतकंच काम खाली असलेला कलाकार करू शकतो किंवा शकते. इथेही काही वेगळी अवस्था नसते. पण तब्बल दोन वेळा अस होतं की बॉल त्या जाळीच्या आता जायचा बाकी राहतो. म्हणजे यशाने हुलकावणी देणं म्हणजे काय याचा प्रत्यय आपल्याला येत असतो. पण म्हणून ती मुलगी आपले प्रयत्न सोडते का? अजिबात नाही. किंबहुना तिचे प्रयत्न ही सुरू राहतात. तिचे सहकारी ही धीर सोडत नाहीत. तिच्या जवळच एक जोकर दादा दिसून येतात. ते उपस्थित प्रेक्षकांनी त्या कलाकार मुलीला प्रोत्साहन द्यावं म्हणून सांगत असतात. बरं प्रेक्षक ही त्यात एकदम गुंग झालेले असतात.

एखादा थरारक चित्रपट पाहताना आपण कसे त्यात गुंग होऊन जातो त्याची आठवण येते. बरं एवढं सगळं होऊन ती मुलगी यशस्वी होते का आणि ते सगळं कसं होतं? हे प्रश्न तुम्हाला पडले असतीलच. तर होय ती मुलगी यशस्वी होते. पण ती कशी यशस्वी होते हे आम्हाला ही लेखी दयायला आवडलं असतं. पण ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडियो बघायला हवा. कारण हा व्हिडियो बघण्यात जो अनुभव आहे ना तो त्याविषयी जास्त माहिती वाचण्यात नाही. त्यामुळे आम्ही तूर्तास इथेच थांबतो. पण आपण मात्र तो व्हिडियो नक्की बघा. कुठे बघाल? त्याची काळजी नको. हा व्हिडियो आपल्या या लेखाच्या खाली शेअर केलेला आहे. त्याचा जरूर आस्वाद घ्या. तसेच या व्हिडियोपासून यशासाठी प्रयत्नशील राहण्याची प्रेरणा घ्यायला ही विसरू नका. असो.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *