Breaking News
Home / मराठी तडका / प्राजक्ता माळी आणि अरुण कदम ह्यांनी दादा कोंडकेंच्या गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

प्राजक्ता माळी आणि अरुण कदम ह्यांनी दादा कोंडकेंच्या गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

भारतीय सिनेमात विनोदी चित्रपटांना स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग आहे. त्यातही मराठी विनोदी चित्रपट तर किती लोकप्रिय आहेत हे सांगण्याची गरज नाही. या सगळ्या चित्रपटांचा प्रवास बघितला असता, यातील काही कलाकारांची नाव ठळकपणे आपल्या डोळ्यांसमोर येतात. ही नाव आपल्या मनात भरण्याच कारण त्यांनी केलेलं काम. दादा कोंडके हे त्यातील अगदी आघाडीचं नाव. विनोदी चित्रपटांचा विषय निघाला की एक नाव हमखास पुढे येतं – दादा कोंडके. त्यांनी तब्बल नऊ चित्रपट तेही अगदी ओळीने सिल्वर ज्युबिली सुपरहिट केले हे आपण जाणतोच. त्यांनी साकार केलेल्या कलाकृती, त्यातील व्यक्तिरेखा या आजही लोकप्रिय ठरतात तसेच त्यांच्या चित्रपटांतील गाणी आजही चट्कन ओठांवर येतात यांच्यात त्यांच यश दडलेलं आहे. आज दादांची आठवण यावी असा एक व्हिडियो आपल्या टीमने पाहिला. हा व्हिडियो आहे एका सुप्रसिद्ध विनोदी कार्यक्रमातला. त्यातील सुत्रसंचालिका आणि लोकप्रिय अभिनेत्याने दादांच्या गाण्यावर जो मस्त डान्स केला त्याचा हा व्हिडियो. आजचा हा लेख त्याच विषयावर आधारित आहे. चला तर मग याविषयी जाणून घेऊयात.

हा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. गेली काही वर्षे सातत्याने एकाहून एक प्रहसन सादर करत प्रेक्षकपसंतीला उतरलेला हा कार्यक्रम. या कार्यक्रमातील प्राजक्ता माळी हिचं सदाबहार सूत्रसंचालन, सई आणि प्रसाद यांच्या मनापासून आलेल्या प्रतिक्रिया आणि आपल्या सकट या सगळ्यांना हसवणारे विनोदवीर म्हणजे या कार्यक्रमाचे वैशिष्ठय आणि बलस्थान. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन पासून तर ही मंडळी आपल्या एवढी जवळची झाली की त्यांच्याविना आता आठवड्याची कल्पना करवत नाही. असा हा कार्यक्रम जेव्हा सूरु होतो तेव्हा अनेक वेळेस प्राजक्ता आपल्याला उत्तम असा डान्स करून दाखवत असते. मुळातच ती नृत्यात पारंगत त्यामुळे प्रत्येक भागाची सुरुवात अगदी मस्त होते. अशाच एका भागात प्राजक्ता आणि आपल्या सगळ्यांचे लाडके दादूस कॉमेडी स्टार अरुण कदम हे आपल्याला दादा कोंडकेंच्या एका सुप्रसिद्ध गाण्यावर पाय थिरकवताना दिसले.

हे सुप्रसिद्ध गाणं म्हणजे ‘मी तर भोळी अडाणी ठकू. दादांच्या गाजलेल्या असंख्य चित्रपटातील सगळ्यात जास्त लोकप्रिय चित्रपट म्हणजे पांडू हवालदार. या चित्रपटातील हे गाणं. हे गाणं उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या सुरांनी अजरामर झालेलं आहे आणि शब्दबद्ध केलेलं आहे खुद्द दादा कोंडके यांनी. व्हिडियो सुरू होतो तेव्हा गाणं सुरू होत असतं. रंगमंचावर असलेले प्राजक्ता आणि अरुण दादा आपल्याला दिसतात. गाणं सुरू झाल्यापासून दोघेही मस्त नाचत असतात. त्यातही प्राजक्ताची ऊर्जा आणि त्यांच्या जोडीला अरुण दादांचे विनोदी हावभाव मजा आणतात. त्यात या दोघांना प्रोत्साहन देण्यासाठी बाकीची कलाकार मंडळी असतातच. तसेच या मंचावर हे गाणं सुरेल गायिका सुनेहा ठाकूर आणि सुप्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ कांबळी यांनी गायलेलं आहे असं दिसून येतं. त्यामुळे एकदम लाईव्ह परफॉर्मन्स बघितल्याचा आणि ऐकल्या सारखं वाटतं. हा परफॉर्मन्स असतो केवळ ४० सेकंदांचा पण या दोघांमुळे तो बघावा असाच होतो. आपणही त्यामुळे हा परफॉर्मन्स निदान अजून तीन ते चार वेळा बघतो.

त्यात जेवढी धमाल आपल्याला येते तेवढीच मजा हे दोन्ही कलाकार सुद्धा करतात. कारण जसा हा परफॉर्मन्स संपतो तसं आपण बघू शकतो की प्राजक्ताला आपलं हसू आवरत नसतं. तिचं ते खट्याळ हसू नकळत आपल्याही चेहऱ्यावर आलेलं असतं. ज्यांनी ज्यांनी हा व्हिडियो बघितला आहे त्यांना हा व्हिडियो आवडला असणार हे नक्की. आपल्या टीमला तर भारी आवडला.

याविषयी आपल्या वाचकांना वाचायला आवडेल म्हणून हा लेखन प्रपंच. आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे कमेंट्स मधून नक्की कळवा. तसेच नेहमीप्रमाणे आपल्या टीमचा हा लेखही मोठया प्रमाणावर शेअर करा. तसेच आपण सकारात्मक कमेंट्स आणि लेख शेअर करून आपला पाठिंबा आपल्या टीमला दाखवत असता तो यापुढेही कायम असू द्या. लोभ असावा ही विनंती. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *