असं म्हणतात कि प्राणिमात्रांवर दया करा. परंतु काही प्रकार पाहून असं वाटतं कि, प्राणिमात्रांनीही मानवावर दया दाखवली पाहिजे. कधी कधी त्यांचादेखील तोल जातो आणि मग जे घडायचं नसतं ते घडून जातं. आता सोशल मीडियाच्या जमान्यात रोजच नवनवीन व्हिडीओज वायरल होत असतात. काही मजेशीर असतात, काही भावनिक असतात तर काही विचार करायला लावणारे असतात. त्यात जर प्राण्यांचे व्हिडीओज म्हटले कि एकदम फेव्हरेट हो. प्राण्यांच्या अतरंगी करामती, त्यांचे मजेशीर किस्से तर वायरल झाल्याशिवाय राहतच नाही. मध्यंतरी एक माकड एका आजारी आजीला भेटायला येत असे, तर दुसरीकडे एक कोंबडी आपल्या पिल्लाला सापापासून वाचवते, सिंहाच्या पिंजऱ्यात खोड काढणाऱ्याला सिंहाने कश्याप्रकारे धडा शिकवला वैगेरे वैगेरे अशाप्रकारचे एक ना अनेक व्हिडीओ वायरल होत असतात. लोकांच्याही ते पसंतीस पडतात. आणि हो ह्या करामती, गंमती-जंमती घडतात ते प्राण्यांच्या मूडवरून.
ज्याप्रकारे आपण आपल्या मूड नुसार वागत असतो, कधी आपल्याला हवेत उडावेसे वाटत असतं, तर कधी शांत एका कोपऱ्यात पडून राहावंसं वाटतं. कधी वाटतं आपणच लयच पराक्रमी आहेत, आपल्यासमोर सर्वांची बोलती बंद होते असं वाटतं. किंबहुना अशाप्रकारच्या गोष्टी प्राण्यांना सुद्धा वाटत असतील. फरक इतकाच कि आपण जे काही करतो त्याचा मागचा पुढचा विचार करतो. आपल्यासाठी कायदे नियम आहेत, त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करून एखादी कृती करतो. परंतु प्राण्यांसाठी कसले आलेत हो नियम, ते काय पुढचा मागचा विचार करत बसत नाहीत. त्यांच्या मूड नुसार सर्व गोष्टी करतात. एखादं शांत कुत्रं जरी असलं तरी त्याचा मूड खराब असेल तर तो एखाद्याच्या भुंकत भुंकत पाठलाग करून त्याला घाबरवून सोडेल, तर एखादा डेंजर कुत्रा जरी असला आणि मूडमध्ये असेल तर अनोळखी व्यक्तीजरी बाजूने गेला असेल तरी कुत्रा गप शांत राहील. सर्व काही मूड वर डिपेंड करता है बॉस.
आता हा व्हिडीओच बघा ना, शेळी काही केल्या तरुणाला ऐकेना. शेळी म्हटली कि एकदम शांत प्राणी. गप्प मे-मे करत राहण्यापलीकडे बहुतेकदा त्रास देत नाही. परंतु म्हणतात ना मुड आणि स्वभाव ठीक असेल तर सर्व ठीक. नाहीतर ह्या दोघांपैकी एक जरी बिघडलं कि मग काही खैर नाही. आता व्हिडीओत दिसणाऱ्या ह्या शेळीचा स्वभाव ठीक नाही कि मूड ठीक नाही ह्याचा अंदाज नाही. परंतु तिने मात्र समोरून जाणाऱ्या तरुणाला सळो कि पळो करून सोडलं आहे. तरुण बिचारा हेल्मेट घालून तिला चुकवत चालला होता. परंतु आपली शेळी पण मात्र डोकेबाज. ती बरोबर लक्ष ठेवून होती. तिच्या मूड नुसार वाटत होतं कि त्या रस्त्यावर तिचंच राज्य आहे. कोणी तिच्या ‘एरिया’त आलाच तर मग त्याची खैर नाही. इतक्यात समोरून एक तरुण आला. त्याला चाहूल होती कि ह्या शेळीपासून आपलं काही खरं नाही. म्हणून तो लांबूनच तिला चुकवत जाणार होता. तरुण दोन चार पावलं पुढे गेला. त्याला वाटलं कि आपण आता वाचलो. त्याने सुटकेचा निश्वास घेतला. पण खरी मजा तर पुढे आहे, ज्या क्षणी तरुण काही पावलं पुढे जाऊन गाफील राहिला रे राहिला, लगोलग ह्या शेळीने जोराची धडकच दिली. धडक इतकी जोरात बसली कि बिचारा तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडला.
एक धडक दिली तरी बकरी काही शांत बसेना, तिच्या अंगात कोणता किडा आला होता माहिती नाही, परंतु ती पुन्हा दुसरी धडक द्यायला तरुणाच्या दिशेने निघाली. तितक्यात तो तरुण कसाबसा उठला आणि त्याने जीव मुठीत घेतल्यासारखी धूम ठोकली. जवळच उभ्या असलेल्या एकाने ह्या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. तुम्ही खाली दिलेला व्हिडीओ पहा आणि तुमचा मूड फ्रेश ठेवा.
बघा व्हिडीओ :