Breaking News
Home / मनोरंजन / प्राण्यांमध्येही एक कलाकार लपलेला असतो, बघा ह्या म्हशीने शिंगाच्या साहाय्याने काय करामत केली ते

प्राण्यांमध्येही एक कलाकार लपलेला असतो, बघा ह्या म्हशीने शिंगाच्या साहाय्याने काय करामत केली ते

आत्तापर्यंत आपण हत्ती. कावळा पोपट, चिमणी मांजर कुत्री असल्या सगळ्या भन्नाट लोकांचे व्हीडिओ पाहिले असतील. परंतू, आजही तुम्ही या सगळ्यात म्हशीचा व्हीडिओ कसा असेल, अशी कल्पनाही केली नसेल. त्यातल्या त्यात कलाकार म्हैस कशी असेल, याबद्दलही तुम्ही काहीच पाहिलं नसेल. तुम्हाला माहितीय की माणसं टाईमपास म्हणून काहीही करायला तयार असतात. टाईमपास म्हणून नखं खाणं, दात कोरणं, नाख कान खाजवणं, पाय हलवणं. कधी कधी गाडीची किल्लीच हातात टाकून गोल गोल फिरवणं, असले प्रकार घडत जात असतात. त्या सगळ्यांना एकाच प्रकारे आपण टाईम पास या कॅटेगरीत मोडूयात. हाताला काही करण्यासारखं नाही म्हणून अनेकजण हे करत असतात. त्यामुळं त्या असल्या सवयींकडे आपण दुर्लक्ष करत असतो. त्यांच्या या सगळ्या गोष्टींकडे आपण काही तरी रुटीनचा भाग आहे, म्हणून विषय सोडून देत असतो. पण उद्या सकाळी गोठ्यातील करीश्मा. करीश्मा म्हणजे आपली म्हैसच अशा गोष्टी करत असेल तर तुम्हाला काय सांगणार, त्या सगळ्या गोष्टीकडं तुम्ही कसं बघाल, आजचा व्हिडीओ पाहून तुम्हांला अंदाज येईल.

काय झालं आपला गण्या गेला मोबाईल घेऊन गोठ्याकडं तिथं गुरांना दुपारच्या वेळेला पाणी द्यायचं होतंं. दुपारचं उन चाळीस डीग्री सेल्सिअंश तापमान, गुरांना लागंतं पाणी, त्यातल्या त्यात सगळी गुरं बांधलेली. त्यामुळे स्वतः उठून त्याना पाण्यासाठी भटकता येत नाही. म्हणून मालकांचीच जबाबदारी असतेयं की प्रत्येक जनावराला पाणी चारा पोहोचलाच पाहिजे. गुरं आपल्या कुटूंबाचाच एक भाग असतात. परीवारातलाच आपण एक सदस्य मानतो. आपली शेतात वेळोवेळी त्या गुरांनी मदत केलेली असते. उन्हातान्हात राबत असतात, कुठलाही मोबदला न मागता धन्यासाठी काम करत असतात. त्यामुळे गण्याही अगदी नित्य नेमाने पाणी द्यायाला दुपारी जात असे. आज जरा त्याला जायला उशीर झाला. करीश्माच्या मस्तकात कळ गेली. आजून तहान भूक लागली असताना माणूस आला कसा नाही, म्हणून ती ही वैतागली.

तिच्या या सगळ्या गोष्टी आता असह्य झाल्या होत्या. एकतर मुकं जनावरं त्याला बोलता येत नाही. मालकानं उन्हात बांधून ठेवलंयं. त्याला सोडून बाजूला बांध म्हणूनही सांगू शकत नाही. या सगळ्यात सांगायचं कसं म्हणून त्या करीश्मानं काय करावं बरं. तिन्ं केला. काय तर, गण्याचा पोपट. पाणी पिण्यासाठी वापरला जाणार टब घेतला शिंगावर उचलून आणि फिरवू लागली गर गर. गण्यानं हे सगळं दूरवरूनच पाहिलं होतं. त्यालाही कळून चुकलं काहीतरी गडबड आहे. करीश्मा चिडलीयं त्या टपाच्या जागी दुसरंचं काहीतरी गण्याला दिसू लागलंय तो भीत भीत करीश्माकडं गेला. पण मोबाईल वर सगळं शूट करण्याची हिम्मत त्यानं केली. गर गर गर गर गर् गर असं करून करीश्मा हा टब फिरवतेय, तिलाही कळलं होतं कुणीतरी आपल्याला शुुट करतंयं, त्यामुळं जास्त फूटेज खायला नको, असं म्हणत तिनं जो टब भिरकावला तो थेट गण्याच्या पायाखाली येऊन पडला. दे लवकर पाणी, मे’ली मी इतक्या गर्मीची… एका गोष्टीची आठवण राहत नाही या माणसांना, असंच काहीसं बोलत असती जर तिला बोलता आलं असतं. त्यामुळं प्राण्यांची मस्करी करायला जाऊ नका. त्यांच्यातही असाच कीडा असतो तो कधी कधी तुम्हाला याच गोष्टीूतन भारी पडला असता, नशिब करीश्माला बांधून ठेवलं असतं. नाहीतर रागा रागात तिनं गण्याला शिंगाला बांधून गर गर फिरवलं असतं आणि दिलं असतं मोबाईल सकट फेकून.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *