Breaking News
Home / मनोरंजन / प्रियकराच्या भरवश्यावर प्रेयसीने झाडावरून पाठमोरी उडी मारली, आणि बघा मग पुढे काय झाले ते

प्रियकराच्या भरवश्यावर प्रेयसीने झाडावरून पाठमोरी उडी मारली, आणि बघा मग पुढे काय झाले ते

वायरल व्हिडियोज म्हंटले की आमच्या टीमचे कान टवकारले जातात हे तर आपल्याला माहिती आहेच. कारण आपल्याला हे व्हिडियोज बघणं जेवढं आवडतं, तेवढंच आम्हाला सुद्धा आवडतं. या आवडीतून अनेक उत्तमोत्तम व्हिडियोज बघण्यात येतात. पण काही वेळेस असे ही व्हिडियोज बघितले जातात की त्यामुळे हे चट्कन मनात भीती उत्पन्न होते आणि अघटित गोष्टी मनात येऊन जातात.

आता याच व्हिडियोचं उदाहरण घ्या ना जो काही दिवसांपूर्वी वायरल झाला होता. हा व्हिडियो आहे एका जोडप्याचा. अगदीच तरुण जोडी आहे. ही जोडी आपल्याला एका मोठ्या झाडाच्या जवळ दिसून येते. एखाद्या उद्यानातलं हे झाड असावं. झाडाचा विस्तार अगदी मोठ्याप्रमाणात झालेला दिसून येतो. या जोडप्यातील मुलगा या झाडाच्या बुंध्याजवळ उभा असतो तर मुलगी झाडाच्या भल्या मोठ्या फांदीवर उभी असते. पण उलट्या बाजूने तोंड करून.

त्यामुळे तिची पाठ आपल्याकडे असते. ही मंडळी पुढे काय करणार आहेत याचा अंदाज आपल्याला येतो खरा, पण त्यांनी असं करू नये असं वाटत असतं. पण ही मंडळी तेच करतात ज्याची भीती वाटत असते. हा मुलगा तयार होत असतो त्या मुलीला झेलायला. तीही झोकून देते अगदी अलगदपणे. त्यात हा व्हिडियो स्लो मोशन मध्ये आपण बघत असल्याने आपली पाचावर धारण बसलेली असते. ह्या भाईचा नेम चुकला तर डोकं किती जोरात आपटेल हिचं हा विचार येत असतो. त्यावेळी तिच्याही मनात काय चाललं असेल देव जाणे. सुदैवाने ती जशी खाली येते तसा हा मुलगा तिला झेलण्यात यशस्वी ठरतो. पण त्यातही अगदी अलगद झेलतो असं नाही. झटका लागतोच. त्यामुळे त्यांची ही करामत संपल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हसू असलं तरी तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि वाचले बुवा असेच भाव असतात. जरा अंदाज चुकला असता तर कितीला पडलं असतं याचा विचार तर नक्कीच येऊन जातो. त्यांच्याही मनात हा विचार येऊन गेला असणार हे नक्की.

त्यामुळे आमच्या टीमकडून या जोडप्याला एक विनंती आहे. आयुष्य मस्त मजेत जगा. सोबत उत्तमोत्तम व्हिडियोज बनवा. लोकांचं मनोरंजन होऊ दे आणि तुम्हाला ही बरं वाटू दे. पण त्यात स्वतःचा आणि आपल्या आप्तस्वकीयांचा जीव धोक्यात घालू नका. जिंदगी चंद वक्त के लिये हैं जनाब, बिखरने मैं वक्त नहीं लगता एवढं फक्त लक्षात ठेवा. या जोडीच्या भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !! आणि त्यांनी पुढे असले काही उद्योग करू नये हीच अपेक्षा.

आपली टीम सातत्याने आपल्या वाचकांसाठी नवनव्या विषयांवर लेखन करत असते. हे सगळे विषय निवडताना आपली आवड निवड अर्थातच बघितली जाते. आपणही आम्हाला सतत प्रोत्साहन देत असता. आमचं कौतुक करत असता. त्यातून मिळणारी ऊर्जा आमचं काम उत्तमरीत्या करण्यास उद्युक्त करत राहते. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन आम्हाला नेहमी मिळत राहू दे. आपला स्नेह सदैव अबाधित राहू दे ही सदिच्छा. लोभ असावा ही विनंती. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *