Breaking News
Home / मनोरंजन / प्रेक्षकांमध्ये बसलेल्या ह्या भाऊंनी केला अतरंगी डान्स, चप्पल निघाली तरी भाऊ काय नाचायचा थांबला नाही

प्रेक्षकांमध्ये बसलेल्या ह्या भाऊंनी केला अतरंगी डान्स, चप्पल निघाली तरी भाऊ काय नाचायचा थांबला नाही

सध्या आपल्या आजूबाजूचं वातावरण नाही म्हंटलं तरी निवळतंय अशी चिन्ह आहेत. त्यात आपलं जीवन अगदी पूर्वीसारखं होऊ शकत नसलं तरी निदान व्यवस्थित चालू होण्याकडे आपली वाटचाल सुरु झाली आहे असं म्हणण्यास वाव आहे. याच काळात आता नवनवीन चित्रपट येऊ घातले आहेत. बदलत्या काळाची एकप्रकारे ही नांदीच म्हणूया. कारण मनोरंजन क्षेत्रातील बाकी सगळं काही प्रमाणात चालू असलं तरी सिनेमा क्षेत्रात त्यामानाने थंड वातावरण दिसून येत होतं. नवनवीन टीव्ही शोज आले पण अनेक सिनेमांचं प्रदर्शन मात्र रखडलं होतं. पण नुकत्याच आलेल्या काही चित्रपटांनी या वातावरणात उत्साह भरण्यास सुरवात केली आहे. मग तो हिंदी मधील ‘८३’, ‘अंतिम’ असो, मराठीतील ‘पांघरूण’, ‘झोंबिवली’,’वरण भात लोणच्या’ असो वा ‘RRR’ सारखे दाक्षिणात्य सिनेमे असोत. या सिनेमांमुळे वातावरणात उत्साह भरून राहिला होता.

येत्या काळात प्रदर्शित होणार सिनेमे ही, प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेतीलच. पण सध्या मात्र हे सगळं विश्व एकाच सिनेमाने व्यापून टाकलं आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. ‘पुष्पा – द राईज’ हा तो सिनेमा ! लोकप्रिय अभिनेते अल्लू अर्जुन यांचा अभिनय आणि त्यांची स्टाईल यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्याची झलक पुन्हा एकदा बघायला मिळाली आहे. त्यात या सिनेमातील स्टाईल सोबत डायलॉग्ज ही लोकप्रिय होताहेत. पण आपल्याकडे गाणी आणि डान्स हे घटक सुद्धा सिनेमे हिट होण्यास कारणीभूत ठरतात. ‘पुष्पा’ सिनेमा सुद्धा यास अपवाद ठरत नाही. किंबहुना या सिनेमातील गाण्यांनी अशी काही धमाल उडवून दिली आहे की विचारू नका. त्यात रश्मिका यांच्या ‘ओ सोलरीया मामा’ ने तर सोशल मीडियावर जी जादू केली आहे त्यास तोड नाही. रश्मिका आणि अल्लू अर्जुन यांच्या डान्स स्टेप्स सोबतच त्यातील बिट्स ने आपल्या मनात जागा करून ठेवली आहे. त्यामुळे हे गाणं आपल्या मनात घर करून राहतं आणि वाजायला लागलं की आपल्याला नाचावस वाटू लागतं. बरं आपल्याला केवळ वाटतं. काही जण खरंच अगदी मनापासून नाचतात. याच अगदी प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे आपल्या टीमने बघितलेला एक व्हिडियो होय. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक छोटा मंच दिसून येतो आणि त्यावर एक अधिकारी व्यक्ती आणि त्यांच्या सोबत अजून दोन जणं असतात. ही दोघे ही गायक असतात.

अर्थात आपल्या लक्षात आलं असेलच की ही मंडळी वर उल्लेख केलेलं गाणं गात असतात. सुरुवातीची पंधरा सेकंद आपण केवळ यांना आणि आजूबाजुच्यांना पाहत असतो. पण अस असलं तरी या गाण्याच्या बिट्सनी आपल्या डोक्यात जागा मिळवलेली असते. पण यावर कळस चढायचा बाकी असतो. हे काम सोळाव्या सेकंदाला सुरू होतं. कोण करतं ? तर एक दादा करतात. कॅमेरा फिरत फिरत त्यांच्यावर येतो आणि एव्हाना ते नाचायला लागलेले असतात. त्यांच्यातील उत्साह एवढा असतो की त्यांच्या बाजूचे काका ही त्यांना साथ द्यायला लागतात. पण दादा कसले ऐकतात. एव्हाना या गाण्याने आपल्याप्रमाणे त्यांच्या मनावर ही जणू ताबा मिळवलेला असतो. बरं त्यात पाठीमागे गाणारे गायक ही मजा घेऊन गात असतात, नाचत असतात. त्यामुळे एक मस्त अनुभव आपल्याला येत असतो. त्यात या दादांचा डान्स अजून मजा आणतो. आपण फक्त हे गाणं ऐकलं असतं तर आपण डुलायला लागलो असतो. पण या दादांमुळे आपण हसायला ही लागतो. गाण्यावर डुलता डुलता हसू आणणारा हा व्हिडियो आपल्याला खूप काही आनंद देऊन जातो.

आपण कदाचित हा व्हिडियो पाहिला नसेल. पण आपली टीम आपल्या वाचकांसाठी हा व्हिडियो खाली शेअर करेल. आपण याचा आनंद जरूर घ्या. कारण या गाण्यावर मुद्दामहून डान्स करून व्ह्यूज मिळवणारे अनेक व्हिडियोज आपण एव्हाना बघितले असतील. पण मनापासून वाटलं म्हणून भीडभाड न बाळगता डान्स केलेले फार कमी व्हिडियोज असतात. हा सुद्धा त्यातीलच एक आहे. म्हणून हा व्हिडियो बघण्याची संधी चुकवू नका.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.