जेव्हा कोणी माणूस प्रेमात पडतो त्यांनतर पुढची पायरी म्हणजे लग्न असते. परंतु या प्रेमाचे रूपांतर लग्नात होणे ही एक मोठी गोष्ट आहे. याची कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. प्रत्तेकाला खरं प्रेम मिळेल, असे काही सांगता येत नाही. काही लोकं या प्रेमाच्या परीक्षेत नापास होतात तर काही कंगालही होतात. असेच बॉलिवूड च्या काही कलाकारां च्या बाबतीत झाले. काही नामांकीत कलाकार प्रेम आणि साखरपुडा झाल्या नंतर पुढे जाऊ शकले नाहीत. कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याचे नाते संपुष्टात आले.
सलमान खान आणि संगीता बिजलानी
बॉलिवूडचा दबंग सलमान खान आत्ता 53 वर्षांचा आहे. पण अजूनही सलमान खान अविवाहित आहे. तेव्हा सलमान भाई जर मागे हतला नसता तर आज त्याला मुले देखील असती. एक वेळ अशी होती सलमान चे नाते संगीता बिजलानी सोबत खूप पुढे गेले होते. दोघांचे लग्नाच्या पत्रिकादेखील छापल्या होत्या. शेवटच्या क्षणी हा विवाह रद्द करावा लागला होता. सूत्रांच्या माहिती नुसार सलमान धोखा देत होता म्हणून तो मागे हटला.
अक्षय कुमार आणि रवीना टंडन
बॉलिवूडचा ऍक्शन खिलाडी अक्षय कुमार, ट्विंकल खन्नाचा पती आहे. ९० च्या दशकात तो राविनाचा बॉयफ्रेंड बनता बनता राहून गेला. त्यावेळी अक्षय आणि रवीनाची जोडी लोकांनी खूप पसंत केली होती. साल १९९४ मधे ‘मोहरा’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी दोघांमधे जवळीक वाढली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. रवीना ने स्वतः सांगितले कि, अक्षय आणि रवीना ने मंदिरात साखरपुडा केला. परंतु अक्षयचे आणखी काही अभिनेत्रीं बरोबर प्रेमप्रकरण चालू होते म्हणून रवीनाने स्वतः माघार घेतली आणि नाते तोडले.
अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी
रवीनाच्या ब्रेकअप नंतर अक्षय कुमारचे अफेयर शिल्पा शेट्टी सोबत होते. दोघांमधील प्रेमाला जणू काही पूर आला होता. पण त्याच वेळी अक्षयचे अफेयर शिल्पाची चांगली मैत्रीण ट्विंकल खन्ना बरोबर चालू झाले. म्हणून दोघे ( अक्षय-शिल्पा) वेगळे झाले.
अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर
आज ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाची सून आहे. पण एक वेळ अशी होती करिश्मा कपूर बच्चन कुटुंबाची सून होणार होती. अमिताभ बच्चनच्या जन्मदिनी म्हणजे ११ ऑक्टोबर २००२ मधे अभिषेकने आपल्या साखरपुड्याचे जाहीर केले. पण नंतर दोघांनी ह्या नात्याला फुल स्टॉप लावला. याचे खरे कारण अद्याप कळले नाही. पण ऐकीव बातमी नुसार लग्ना नंतर करिश्मा ने चित्रपटात काम करणे जया बच्चन ला मान्य नव्हते. तर करिश्माला लग्नानंतर चित्रपटांत काम करण्यावर बंदी येईल हे करिश्माची आई बबिता ला मान्य नव्हते, म्हणून तिने करिश्मा ला हे नाते थांबवायला सांगितले.
विवेक ओबेरॉय आणि गुरुप्रित गिल
विवेक ओबेरॉय चे अफेयर साल 2000 मधे गुरुप्रित सोबत होते. दोघांनी लग्नाची प्लानिंग केली होती. पण काही काळा नंतर दोघेही वेगळे झाले. विवेकला आपले लक्ष करियर वर केंद्रित करायचे होते. आणि इतक्या लवकर विवाह बंधनात अडकायचे नव्हते. नंतर त्याच्या आयुष्यात ऐश्वर्या आली, पण सलमान वाला ऍंगल मधे आला आणि ऐश्वर्या दूर गेली. पण सलमान सोबत दुश्मनी ओढवून घेतली आणि करियर बरबाद झाले.