Breaking News
Home / बॉलीवुड / प्रेस कॉन्फरन्स इंटरव्हूमध्ये राणू मंडलचे धडाधड इंग्रजी पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल

प्रेस कॉन्फरन्स इंटरव्हूमध्ये राणू मंडलचे धडाधड इंग्रजी पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल

राणू मंडल ह्यांना आता कोण नाही ओळखत. रेल्वे स्टेशन वर गाणं गाताना व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे ती रातोरात स्टार झाली. हिमेश रेशमियाने तिचे टॅलेंट ओळखून तिला आपल्या चित्रपटात गाण्याची संधी दिली. बस्स इतकं कारण पुरूसे होते मीडियासाठी. मग काय, मीडिया तिच्या मागे हाथ धुवून लागली. आता हा किस्साच घ्या. ‘तेरी मेरी कहानी’ च्या रिलीजच्या प्रेस कॉन्फरन्सचा. त्या इंटरव्ह्यू मध्ये राणू मंडल इंग्रजी बोलते हे जाणून अनेकांना विश्वास होणार नाही. पण तुम्ही देखील थक्क व्हाल तिची इंग्रजी ऐकून, राणू मंडल आता धडाधड इंग्रजी बोलू लागली आहे. आम्ही सुद्धा हे ऐकून आश्चर्य झालो कि राणू मंडल इतकं चांगलं आणि सुंदर इंग्रजी बोलू शकते.

‘तेरी मेरी कहानी’ च्या रिलीजच्या प्रेस कॉन्फरन्स वेळी मीडियाने राणू मंडलला विचारले कि, “तुम्ही तुमच्या बद्दल सांगा, कलकत्ता स्टेशन वर गाणं गाणे ते इथपर्यंत प्रवास. तर आता तुमच्या मनात काय चालू आहे ह्याबद्दल. तुम्हाला काय वाटते.” प्रश्न ऐकताच राणू मंडल ह्यांच्या भावना भरून आल्या. त्यांनी इंग्रजीत सुरुवात केली.” आपल्या प्रवासाबद्दल राणू मंडल म्हणाली, “गॉड इज ऑल्वेज विद मी. दॅट्स वाय. थँक्स गॉड. बिकॉज गॉड आल्वेज टाइम्स लव्स मी. बिकॉज ही इज ग्रेट. यू नो.” असं म्हणत अगोदर इंग्रजीत बोलायला सुरुवात केली. नंतर हिंदी मध्ये. आणि पुन्हा दोन्ही भाषेमध्ये बोलू लागली. जवळजवळ ५ मिनिटांच्या इंटरव्ह्यू मध्ये ती अनेकवेळा देवाचे आणि हिमेश रेशमियाचे आभार मानत होती.त्यांनी मध्ये मध्ये इंग्लिश शब्दांचा वापर केला आणि त्यांना एक्सप्लेन सुद्धा केले. ह्यावरून स्पष्ट होत होते कि त्यांची ग्रूमिंग चांगल्याप्रकारे करण्यात आली होती. त्यांनी आतापर्यंतच्या आपल्या ह्या प्रवासाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. ह्यादरम्यान त्यांनी ‘अनकंपेटिबल’ शब्दाचा वापर केला आणि त्याला सुद्धा एक्सप्लेन केले.

हि तीच प्रेस कॉन्फरन्स आहे, ज्यात हिमेश रेशमियाच्या डोळ्यांतून अश्रू आले होते. दुसरीकडे, ही प्रेस कॉन्फरन्स सुरु होण्याअगोदर प्रथम तिच्या मुलीसंबंधित एक प्रश्न विचारले गेले. दोन ओळी बोलल्या नंतर ती म्हणाली, ” इट्स इनफ. थँक्यू.” हे शब्द ऐकताच मीडिया सुद्धा थक्क झाली. सर्वच्या सर्व आश्चर्यचकित झाले कि जी राणू मंडल कोणे एकेकाळी रेल्वे स्टेशन वर गाणं गाऊन पोट भरायची ती अचानक ह्याप्रकारे इंग्रजी बोलत आहे. ह्याचा अर्थ हिमेश रेशमिया आणि तिचे मॅनेजर दोघांनी तिची ग्रूमिंग खूप चांगल्याप्रकारे केली आहे. रेल्वे स्टेशन वर गाणं गाऊन वायरल झालेल्या राणू मंडल ला हिमेश रेशमियाने आपल्या चित्रपटात संधी दिली. राणू मंडलने चित्रपटासाठी तीन गाणी गायली. त्यापैकी एक गाणं लाँच झाले आहे. आणि ह्या सर्व गोष्टी त्याच लाँच केलेल्या प्रेस कॉन्फरन्सच्या आहेत. बघा तिचा प्रेस कॉन्फरन्सचा व्हिडीओ.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.