Breaking News
Home / माहिती / प्लास्टिकच्या बॉटलवर छापलेल्या ह्या कोडचा अर्थ तुम्हांला माहिती आहे का, हि गोष्ट दुर्लक्ष करू नका

प्लास्टिकच्या बॉटलवर छापलेल्या ह्या कोडचा अर्थ तुम्हांला माहिती आहे का, हि गोष्ट दुर्लक्ष करू नका

प्लॅस्टिकच्या सर्वच बॉटल्स पुन्हा वापरात आणणे आहे हानिकारक, बघा कोणत्या तुम्ही बॉटल्स पुन्हा वापरू शकता

आपल्या सर्वांना हे माहितीच आहे कि प्लास्टिक पर्यावरणासाठी किती हानिकारक आहे ते. संपूर्ण जग प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे त्रासलेले आहे. म्हणून जिथे संभव असेल तिथे प्लास्टिकचा वापर करणे टाळले पाहिजे. आपण प्लास्टिकच्या बॉटलचा वापर पाणी, शीतपेय, यासाठी करतो. एवढेच नाही तर या बॉटल आपण पुन्हा वापरात आणतो. परंतु आपल्याला माहिती आहे का की, कोणती बॉटल पुन्हा वापरात आणू शकतो?

रेजिन आयडेन्टिफिकेशन कोड ( RIC )

खरं तर प्लास्टिकची कोणती बॉटल पुन्हा वापरात आणू शकतो , त्या बद्दलची माहिती त्या बॉटलवरच छापलेली असते. कदाचित या माहितीवर आपल्या पैकी कोणीतरी लक्ष दिले असेल. जर नसेल दिले तर आत्ता जाणून घेऊया. प्लास्टिक बॉटलच्या खाली म्हणजेच तळाला एक त्रिकोणाचे चिन्ह केलेले आहे, त्या त्रिकोणात काही अंक लिहिलेले असतात, तोच कोड ह्या सर्व गोष्टीची माहिती दाखवते. याला रेजीन आयडेंटिफिकेशन कोड म्हणजे आरआयसी म्हणतात.

तशी समजून घेण्याची गोष्ट म्हणजे प्लास्टिक पासून बनवलेल्या सर्व वस्तूंवर म्हणजे प्लास्टिक बॉटल, बादली डब्बे अशा सर्व प्रकारच्या वस्तूंवर खाली तळाला त्रिकोणाकृती निशाण जरूर असते. आरआयसी मध्ये रेजीनचा अर्थ राळ या पदार्था पासून प्लास्टिक बनवतात. प्लास्टिक खूप प्रकारच्या पदार्था पासून म्हणजे रेजीन पासून बनवतात. त्रिकोणातील कोड त्याची योग्यता आणि उपयोगाची माहिती देते. ‘सोसायटी ऑफ द प्लास्टिक्स इंडस्ट्री ‘ या कोडचे जनक आहेत, जो अमेरिकाचा तिसरा सर्वात मोठा विनिर्माण क्षेत्र आहे. आरआयसी एक आंतरराष्ट्रीय मानक संघटन ASTM च्या निगराणीत काम करते.

कामाची गोष्ट ही आहे

वेगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टिकच्या कोडची संख्या 1 ते 7 असते. याच्यात 1 ते 6 पर्यंतचे कोड कोणत्यातरी ठराविक ‘प्लास्टिक पॉलिमर ‘चे असते आणि कोड 7 एक साधारण कॅटॅगरी आहे. यात 1 ते 6 शिवाय सर्व प्रकारचे प्लास्टिक येतात . यदा कदाचित एखाद्या प्लास्टिकवर 2, 4 आणि 5 मधून कोणते कोड असेल तर तो प्लास्टिक इतर प्लास्टिक पेक्षा उत्तम आहे.

कोड 1 म्हणजे PET किंवा PETE

हा प्लास्टिक बॉटल मध्ये वापरला जाणारा सगळ्यात सामान्य गुणवत्ता असलेला. कोणतीही औषध बॉटल, ज्याच्यात कोणतेही पेय साठी वापरलेली बॉटल, कंटेनर, ओवन – ट्रे डिटर्जंट आणि क्लिनर सारख्या कंटेनर मध्ये या प्लास्टिकचा वापर होतो. या व्यतिरिक्त लिक्विड क्रिस्टल, डिस्प्ले, गिटार, पियानो यासारख्या वस्तूंच्या फिनिशिंग साठी या प्लास्टिक पोलिमारचा वापर होतो. PET चा अर्थ आहे polyethylene terephthalate.

जास्त वेळेसाठी हानिकारक आहे

या प्लास्टिकचा वापर जास्त वेळ करणे हानिकारक असते. खरं तर जास्त वेळ यात लिक्विड ठेवल्यामुळे त्यात एंटीमनी नावाचा पदार्थ तयार होऊ लागतो. तसे जर या कंटेनरला गरम ठिकाणी किंवा बंद जागी ठेवले तर जास्त प्रमाणात तयार होतो. PET ला एकदाच वापरून फेकून द्यावे.

कोड 2 म्हणजे HDPE

एचडीपीइ चा अर्थ आहे, high density polyethylene, हा पॉलिथिन सगळ्यात जास्त वापरण्यात येणारा ‘ प्लास्टिक पॉलिमर ‘ आहे, कारण याला बनवणे सोपे आहे.प्लास्टिक बॅग, दुधाचे पॅकेट या सारखे यात बनवले जातात, बऱ्याच वेळेला त्याला रिसायकल केले जाते, काही संशोधक जरूर सांगतात सूर्याच्या प्रकाशात या प्लास्टिक मधून नोनिलफेनॉल तयार होतो, ज्यामुळे हार्मोनल विषयी तक्रारी तयार होतात.

कोड 3 म्हणजे PVC

पॉलिविनाइल क्लोराइड. हा पाईप, जो प्लंबिंग आणि इतर गोष्टीसाठी उपयोगी येतो. याच्यात खाण्याचे समान ठेवणे सुरक्षित नाही. या व्यतिरिक्त याचा वापर खेळणी, शाम्पूची बॉटल, माऊथवॉशची बॉटल, डिटर्जंट आणि क्लिनरची बॉटल बनवण्यासाठी याचा वापर केला जातो.

कोड 4 म्हणजे LDPE

याला low density polyethylene म्हणतात , जो छोट्या गोष्टीसाठी वापरला जातो. या प्रकारचा प्लास्टिक मुख्यत्त्वे करून पॅकेट, खाण्याचे आणि औषधांची पॅकिंग साठी याच वापर करतात. LDPE फ्लेक्सिबल आणि पातळ असतो. या प्रकारच्या प्लास्टिकमध्ये खाण्याची किंवा इतर वस्तूला बंद करून ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो. यात वस्तू सुरक्षित राहते. परंतु या प्लास्टिकला रिसायकल करता येत नाही. याला खाण्याचे पदार्थ आणि लिक्विड कंटेनर साठी हा सुरक्षित मानले गेले आहे.

कोड 5 म्हणजे PP

हा प्रो – पोलिप्रोपाइलीन ने बनवतात. शक्यतो हा प्लॅस्टिक कंटेनर उत्पादनासाठी वापरला जातो. जसे दह्याचा कप, पाण्याची बॉटल, केचअपची बॉटल, औषधांचे कंटेनर इत्यादी. याला मायक्रोवेव ओवन मध्ये जेवण गरम करण्यासाठी जे कंटेनर असतात ते बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. पॉलिप्रोपाईलीन स्टोरेजसाठी खूप उपयुक्त आहे आणि याला रिसायकल केला जातो.

कोड 6 म्हणजे PS

डिस्पोजेबल प्लास्टिक कप, प्लास्टिकचे ताट, अंड्याचे ट्रे, मोटरसायकलचे हेल्मेट, वापरा आणि टाका अशा डिश (use and throw dishes) बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. कोड 6 प्लास्टिक म्हणजे polystyrene किंवा styrofoam कारण हा गरम झाल्यानंतर विषारी पदार्थ सोडतो.

कोड 7

या वर्गात सर्व प्रकारचा प्लास्टिक येतो, जो 1 ते 6 च्या वर्गात येत नाही. यावर केव्हा केव्हा PC लिहिलेले असते, ज्याचा अर्थ आहे पॉलिकोर्बोनेट.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.