काही दिवसांअगोदरच बॉलिवूडचा प्रतिभावंत अभिनेता सुशांत सिंग राजपूत ह्याने १४ जूनला दुपारी अचानक गळफा स घेऊन आत्मह त्या केली. त्याच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूड चाहत्यांमध्ये शोककळा पसरली. तर सुशांतच्या निध ना पूर्वी त्याची एक्स मॅनेजर २८ वर्षीय दिशा सालियन हिने १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्मह त्या केली होती. दिशा सालियान हिच्या अचानक मृ त्यु मुळे अनेक प्रश्न उपस्थित केले. तपासादरम्यान माहिती मिळाली कि दिशाने ज्या वेळी आत्मह त्या केली होती, त्या वेळी ती नशेमध्ये होती. मीडियाच्या रिपोर्ट्स नुसार, दिशा सालियन हिचा मृ त्यु उडी मारून नाहीतर नशेमध्ये असताना खिडकीतुन पडल्यामुळे झाला आहे. दिशाच्या मृ त्यू वर पोलीस आता फक्त आत्मह त्या नाही तर ह त्या आणि दुर्घटना ह्या अँगलने सुद्धा संपूर्ण घटनेचा तपास करत आहे. तुम्हांला जाणून आश्चर्य वाटेल कि दिशा च्या अगोदर सुद्धा अनेक बॉलिवूड कलाकारांचे मृ त्यु अश्याच रहस्यमय परिस्थितीत झाले आहे. आज आपण त्याच बॉलिवूड कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत.
दिव्या भारती
एकेकाळची सर्वात सुंदर आणि अप्रतिम अभिनेत्रींपैकी एक दिव्या भारती हिचा मृ त्यु सुद्धा एका रहस्यमय पद्धतीने झाला होता. दिव्याचा मृ त्यु केवळ १९ वर्षाची असताना झाला होता. पोलिसांना तपासामध्ये कळले कि ज्या रात्री दिव्याचा मृ त्यु झाला होता, त्याच रात्री ती नशेमध्ये होती आणि पाचव्या मजल्यावरून पडल्यामुळे तिचा दुर्दैवी मृ त्यू झाला होता. परंतु तिचे चाहते आज सुद्धा दिव्याचा पती साजिद नाडियाडवाला वर प्रश्न उपस्थित करत आहेत.
परवीन बाबी
एकेकाळची सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री परवीन बॉबीला स्किज़ोफ्रोनिया नावाचा एक गंभीर आजार होता. २२ जानेवारी २००५ ला परवीनचा मृ तदेह तिच्या मुंबईतील फ्लॅट मध्ये मिळाला. परवीन बॉबीच्या मृ त्यूवर अनेक प्रश्न उपस्थित झाले. पोस्टमोर्टम रिपोर्ट मध्ये सांगितले गेले कि परवीनचा मृ त्यू भूखेमुळे झाला, कारण तिला गँगरीन आणि मधुमेह ह्यासारख्या गंभीर आजार होते.
जिया खान
प्रतिभावंत आणि सुदंर अभिनेत्री जिया खानने केवळ २५ व्या वर्षी आपल्या फ्लॅट मध्ये गळफा स घेऊन आत्मह त्या केली. मृ त्यू नंतर जिया खानच्या आईने जियाच्या मृ त्यु साठी तिचा बॉयफ्रेंड सुरज पांचोली ह्याच्यावर आरोप लावले होते. जियाच्या चाहत्यांनी तर सुरज पांचोलीवर मर्ड र केल्यापर्यंत आरोप लावला होता. जिया खानचा मर्ड र झाला होता किंवा आत्मह त्या, हे आजदेखील एक रहस्य आहे.
श्रीदेवी
२४ फेब्रुवारी २०१८ ला लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवीच्या अचानक मृ त्यूची बातमी समोर आली, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. श्रीदेवी दुबई मध्ये एक लग्नसमारंभात भाग घेण्यास गेली होती. तिथे वॉशरूममध्ये बाथटब मध्ये बुडल्यामुळे तिचा मृ त्यु झाला. हि गोष्ट एकदम अविश्वसनीय वाटली कि खरंच बाथटब मध्ये बुडल्यामुळे मृ त्यु कसा काय होऊ शकतो. ह्या पूर्ण घटनेमध्ये श्रीदेवी हीच पती बोनी कपूर ह्याच्यावर सुद्धा शंका उपस्थित केली जात होती. परंतु पोलिसांनी तपस केल्यानंतर बोनी कपूर ह्यांना क्लीन चीट मिळाली आणि श्रीदेवी ह्यांचा मृ त्यु दुर्घटनापूर्ण बाथटबमध्ये बुडून झाल्यामुळे झाला होता असे स्पष्ट केले गेले.
प्रत्युषा बॅनर्जी
बालिका वधू मालिकेमधून आनंदीची भूमिका निभावणारी प्रत्युषा बॅनर्जी हीचा मृ त्यू १ एप्रिल २०१६ ला झाला होता. प्रत्युषाने आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफा स घेऊन आत्मह त्या केली. प्रत्युषाच्या आईवडील आणि मित्रांनी तिच्या मृ त्यूसाठी तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगला जबाबदार धरले. पोस्टमोर्टम रिपोर्ट मध्ये सुद्धा सांगितले गेले कि, प्रत्युषाचा मृ त्यू श्वास गुदमरल्यामुळे झाला.
मनमोहन देसाई
कुली, धरम-वीर, अमर अकबर ऍंथोनी सारख्या सुपरहिट चित्रपटांचे निर्देशक मनमोहन देसाई ह्यांचा मृ त्यूचे कारण आजपर्यंत कोणी जाणू शकले नाही. त्यांचा मृत्यु होता, आत्मह त्या होती कि दुर्घटना होती हि गोष्ट आजपर्यंत एक रहस्य बनून आहे. त्यांचा मृ त्यू फ्लॅटच्या बाल्कनी मधून पडल्यामुळे झाला होता.