लहान मुलं देवाघरची फुलं, असा वाक्प्रचार आमच्या काळात शाळेत असताना वापरला जायचा. आजकाल मात्र हा वाक्प्रचार खूप कमी वापरला जातो. का महितीय का? कारण आजकालची लहान मुलं ही प्रचंड अतरंगी आहेत. त्यांना देवघरची फुले हा वाक्प्रचार सूटच होत नाही. अगदी 6 महिन्याची पोरंसुद्धा अशी धमाल करतात, त्यांना पाहून वाटतं या वयात तर आपल्याला चड्डी घालायचं कळत नव्हतं. अशी अतरंगी मुले कुठेच शांत बसत नाहीत. त्यांचे कारनामे ते कुठे न कुठे कायमच दाखवत असतात. अशात आताच हे जग सोशल मीडियाचं आहे, इथे तर त्यांचे व्हिडीओ खूपच चालतात.
सोशल मीडियाच्या गमतीशीर जगात रोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. शाळा-कॉलेजमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थी असतात. काही अभ्यासू असतात तर काही विद्यार्थ्यांचं शालेय जीवन मस्ती आणि खोड्या काढण्यातच निघून जातं. अशी खोड्या करणारी मुले सोशल मीडियावर सगळ्यात पुढे आहेत. फक्त खोडकर असणारी ही पोरं पुढे जाऊन पण तशाच स्वभावाची राहतात. पण लहानपणी या मुलांचा खट्याळपणा, त्यांचे लडिवाळपणे बोलणे सर्वांनाच आवडते. लहान मुलांनी खट्याळपणे केलेल्या खोड्या पाहून मूड फ्रेश होत असल्यामुळे या लहानग्या पोरांचे व्हिडीओ पण जोरदार व्हायरल होतात.
सध्या अशाच काही मस्तीखोर मुलांचा सुट्टीतला एक मस्ती करतानाचा भन्नाट भरू मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मस्तीच्या धुंदीत असताना या मुलासोबत अचानक पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला हसूही आवरणार नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लाखो लोकांनी पाहिला गेला आहे आणि शेकडो लोकांनी त्याला लाइक केलं आहे.
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की शाळेत मुलं खेळाखेळातच असं काही करून जातात ज्यामुळे त्यांना दुखापत होते. मात्र, मुलांना एखादी गोष्ट करण्यापासून कितीही अडवलं तरीही शेवटी ते स्वतःच्या मनाचंच करतात. सध्या अशाच एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात आपली मस्ती या मुलाला चांगलीच महागात पडल्याचं दिसतं. आपल्या शाळेच्या किंवा मैदानाच्या आवारात एखादे का होईना असे झाड असतेच की, ज्याच्या फांदीपर्यंत आपला हात पोहोचत असतो. आणि आपण फांदी सोडल्यावर ती फांदी पुन्हा मूळ ठिकाणी जाऊन थांबते म्हणजेच उंचीवर जाते. आता ही सगळी खोडकर पोरं एकत्र आली. त्यांनी एकीच बळ दाखवत एका लवचिक झाडाची फांदी खाली ओढली.
आता त्यांच्यात असलेल्या एका नवीन पोराला यांना वेड्यात काढायचं होतं. यांनी सगळ्यांनी लोम्बकळून ती फांदी खाली ओढली. फांदी खाली आल्यावर हे नवीन पोरग पण त्या फांदीला लोम्बकळलं. मग यांनी आयडिया केली आणि एकाच वेळी फांदी सोडून दिली. नवीन असलेल्या पोराला काही कळायच्या आत हा पोरगा फांदीला लटकून झाडाच्या उंचीला गेला… बर एवढंच नाही… त्यानंतर जे घडलं त्यातच खरी गंमत आहे. तो मुलगा आपटला का? त्याला लागलं का? फांदी सोडून पोरं पळून गेली का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढा सगळा कुटना झाल्यावर भांडणं झाली का? हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडीओ बघावाच लागणार ना…
हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :