Breaking News
Home / बॉलीवुड / फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही सलमान खानचा गॅलॅक्सी अपार्टमेंट, बघा आतमधून कसा दिसतो

फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही सलमान खानचा गॅलॅक्सी अपार्टमेंट, बघा आतमधून कसा दिसतो

सलमान खान बॉलिवूडचा भाईजान आहे आणि आपल्या चित्रपटासारखेच त्याचे व्यक्तीमत्वसुद्धा दबंग आहे. सलमानने बॉलिवूड मधे प्रसिद्धी आणि पैसा सुद्धा खूप कमावला. त्याच बरोबर तो आपल्या कुटूंबावरील प्रेम आणि मैत्रीसाठी सुद्धा ओळखला जातो. सलमान आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतो आणि प्रत्तेक वेळी त्याचे कुटुंब एकत्र असते. इतकंच नाही तर सलमान आणि त्याचे संपूर्ण कुटुंब सोबत एकाच जागी राहतात. सलमान सध्या गॅलॅक्सी अपार्टमेंट मधील एका फ्लॅट मधे राहतो. जर हा फ्लॅट सलमान खानचा आहे तर त्यात खूप साऱ्या खास गोष्टी तर नक्कीच असतील. चला तर मग पाहूया सलमानचा गैलॅक्सी अपार्टमेंट कसा आहे ते.

सलमानच्या या फ्लॅटचा इंटिरियर खूप नयनरम्य आहे. त्यांच्या अपार्टमेंट मधे त्याचे खूप सारे फोटो पाहायला मिळतील. सलमानचा हा फ्लॅट पाहून तुम्ही समजून जाल कि, सलमानला लाईटिंगची खूप जास्त आवड आहे. कारण त्याच्या सर्व खोल्या लाईटिंगने झगमगताना दिसतात. या खोलीत शिरल्या नंतर आपल्याला वाटेल कि आपण मोठया हॉटेलमध्ये आलोय. दबंग खानचे या अपार्टमेंट मधे दोन फ्लॅट आहेत. एक तळ मजल्यावर आणि दुसरा पहिल्या मजल्यावर. सूत्रांच्या माहीती नुसार त्यांची आई सलमा आणि वडील सलीम पहिल्या मजल्यावर राहतात. तर सलमान स्वतः तळ मजल्यावर राहतो. सलमान L शेपच्या फ्लॅट मध्ये राहतो. ज्यात किचन, बेडरूम आणि हॉल आहे. इथे ४ फुटाची काचेची वॉल आहे, ज्यामुळे डायनींग रुम अजून सुंदर दिसते. सलमानचा बेडरूम १७० ते १९० स्क्वेअर फूटचा आहे आणि यात बाथरूम आहे.

ही गॅलेक्सी आपटमेंट ८ मजली इमारत आहे. आणि खान कुटुंब इथे राहतात त्यामुळे खूप प्रसिध्द आहे. सलमानच्या जन्मदिनी लाखो चाहते या इमारती खाली उभे राहून त्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. आणि त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करतात. दबंग खानच्या घराची चर्चा सतत होत असते. एक वेळ बिगबॉसची कंटेंटन्स आर्शी खान सलमान खानच्या अपार्टमेंटच्या बाहेर दिसली होती. सांगतात की ती तिथे सलमानच्या भेटीला गेली होती, पण भेट झाली नाही. खरं तर आर्शी अपॉइंटमेंट न घेता तिथे गेली होती, म्हणून सलमानच्या सुरक्षा राक्षकांने तिला अडवले आणि भेटून दिले नाही. आर्शीला तसेच परत यावे लागले. आर्शीने घरा घरात आपले नाव बनवले.

एकदा सलमानची एक दिवानी त्याच्या फ्लॅटवर हंगामा करायला गेली होती. तिचे म्हणणे होते की तिचे सलमान सोबत लग्न झाले आहे आणि सलमान तिचा पती आहे. सध्या तरी सलमान आपल्या फ्लॅट मधे आपल्या कुटुंबा सोबत राहतो. आणि त्याच्या परवानगी शिवाय त्याच्या घरात कोणी येऊ शकत नाही. सलमानच्या करियर विषयी बोलायचे तर काही महिन्याअगोदरच त्याचा दबंग ३ हा चित्रपट रिलीज झाला. तसेच टेलिव्हिजन वरील बिगबॉसचा होस्ट सलमान असल्या मुळे प्रासिद्धीत आहे. भाईजानचे फॅन सलमान मुळे बिगबॉस शो आवर्जून पाहतात. सलमान दबंग नंतर ही खूप प्रोजेक्ट मधे दिसणार आहेत. आम्ही काही वर्षांपूर्वीचा सलमान खानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटचा व्हिडीओ सुद्धा देत आहोत. हा व्हिडीओ जवळजवळ १५ वर्षे जुना आहे. नक्की पहा.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *