Breaking News
Home / बॉलीवुड / फिल्मफेअरमध्ये घडलेल्या ‘ह्या’ गोष्टीमुळेच आमिर खान मोठमोठ्या अवॉर्ड फंक्शनला जात नाही

फिल्मफेअरमध्ये घडलेल्या ‘ह्या’ गोष्टीमुळेच आमिर खान मोठमोठ्या अवॉर्ड फंक्शनला जात नाही

आमिर खान आपल्या काळातला राज कपूर आहे. म्हणजे जेव्हा पण त्याचा चित्रपट रिलीज होतो तेव्हा काय क्रिटिक्स काय प्रेक्षक, सर्वच रांगेत उभे राहून तिकीट घेतात. ह्या गोष्टीचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ‘दंगल’ चित्रपट आहे. दंगलने तर बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्डच तोडून टाकले. दंगलने जगभरातून २००० कोटींपेक्षा जास्त कमाई करून सर्वात जास्त कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटात अग्रस्थान प्राप्त केले. आज आपण आमिर खानच्या जीवनातील एका महत्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत. ती गोष्ट म्हणजे बॉलिवूडच्या मोठमोठ्या अवॉर्ड फंक्शनना आमिरची असलेली गैरहजेरी. गेल्या दोन दशकात तुम्ही आमिर खानला कोणत्याही मोठ्या अवॉर्ड फंक्शनमध्ये पाहिले नसेल. त्याचे कारणही तसेच आहे. असं काय घडलं होतं कि आमिर खान पुन्हा कधीच मोठ्या अवॉर्ड फंक्शनला गेला नाही. चला तर मग आजच्या लेखात आपण ह्याबद्दल जाणून घेऊया.

१९९५ साली ‘रंगीला’ चित्रपट आला होता. राम गोपाल वर्मा ह्यांनी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. चित्रपटात दोन मुख्य अभिनेते होते. एक जॅकी श्रॉफ आणि दुसरा आमिर खान. मजेशीर गोष्ट हि होती कि ह्या चित्रपटाशी तिन्ही खान जोडलेले होते. कसे ते आपण पाहूया. १९९५ मध्येच राकेश रोशन ह्यांचा ‘करण अर्जुन’ हा चित्रपट आला होता. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. त्याच वर्षी रंगीला चित्रपट येणार होता. रंगीला चित्रपटात सुद्धा तेच कलाकार असणार होते. रंगीला मध्ये जी भूमिका आमिरने केली आहे, त्या भूमिकेसाठी अगोदर शाहरुखला निवडले होते. परंतु तोपर्यंत शाहरुख खान ‘बाजीगर’, ‘डर’, ‘कभी हा कभी ना’, ‘करण अर्जुन’ ह्यासारखे चित्रपट देऊन स्टार बनला होता. म्हणून रंगीलासाठी त्याने नकार दिला. शाहरुख खानच्या एका नकाराने ह्या चित्रपटाची संपूर्ण समीकरणेच बदलून टाकली. नंतर हा चित्रपट आमिर खान, जॅकी श्रॉफ आणि उर्मिला मातोंडकर ह्यांच्यासोबत बनला. आमिर खानची ह्या चित्रपटात भूमिका एका टपोरी स्टाईलच्या मुलाची होती. ह्या कॅरॅक्टरसाठी आमिरने खूप मेहनत केली. टपोरी भाषा शिकली, टपोरी प्रकारचे कपड्यांची स्टाईल जसे कि जाळीदार बनियान, टी शर्टला खालून गाठ मारणे, तिरकी टोपी घालणे ह्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा त्याने मेहनत घेतली. ह्यासाठी त्याने स्वतःचे जुने कपडे शोधून काढले आणि त्यांना तो टपोरी स्टाईल मध्ये घालू लागला, मित्रांकडून सुद्धा उधारी कपडे घेतले. ऐकण्यात आले आहे कि त्याने चित्रपट ‘पी. के.’ साठी सुद्धा अश्या प्रकारचा सराव केला होता.

आमिरला वाटलं रंगीला चित्रपटासाठी इतकी सर्व मेहनत घेतली आणि चित्रपट सुद्धा हिट झाला आहे. तर ह्यावर्षीचा ‘फिल्मफेअर’चा ‘बेस्ट ऍक्टर’चा अवार्ड सुद्दा त्यालाच मिळणार. परंतु त्याच्या मनाप्रमाणे तसे काही घडले नाही. त्यावर्षी ‘फिल्मफेअर’ १९९५ चा ‘बेस्ट ऍक्टर’अवार्ड शाहरुख खानला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ ह्या चित्रपटासाठी मिळाला. त्यावेळी अशी चर्चा होती कि आमिर खानला ह्याच गोष्टीचे खूप वाईट वाटले. आमिर खानने एका मुलाखतीत अवार्ड फंक्शनमध्ये न जाण्याचे कारण सांगितले होते कि जेव्हा तो बॉलिवूडमध्ये नवीन नवीन आला होता तेव्हा अवार्ड फंक्शनमध्ये जाण्यासाठी खूपच उत्साहित असायचा. परंतु जेव्हा त्याला ह्या अवॉर्डचे सेटअप माहिती झाले तेव्हापासून त्याने अवॉर्ड्स फंक्शनला जाणेच सोडून दिले. कोणत्याच मोठ्या आणि लोकप्रिय अवॉर्डला जायचे नाही असं त्याने ठरवूनच टाकले. असं नाही आहे कि त्याने अजून कोणतेच अवॉर्ड फंक्शनला हजेरी लावली नाही. जे टीव्हीवर टेलिकास्ट होत नाहीत अश्या अवॉर्ड फंक्शनल तो जात असतो.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.