सोशल मीडिया हे असं एक माध्यम आहे ज्यातून कलाकारांना आपल्या चाहत्यांसमोर सातत्याने विविध रुपांतून येता येतं. खासकरून कलाकार करत असलेले फोटोशूट्सच्या माध्यमांतून. विविध फोटोशूट्स दरम्यान आणि नंतर आपले लाडके सेलिब्रिटीज कसे दिसतात, हे पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्येही असतेच. आधीच्या काळात या फोटोशूट्स साठी केवळ मॅगझीन कव्हर किंवा तत्कालीन प्रिंट माध्यमं होती. पण सोशल मीडियामुळे याचा आवाका वाढला आहे. फोटोज सोबतच फोटोशूट्स चे व्हिडियोज ही प्रेक्षकांकडून आवडीने बघितले जातात. तर अशा या प्रेक्षकांना आवडणाऱ्या फोटोशूट्स प्रकारावर गेल्या काही काळात एका अभिनेत्रीने स्वतःची मोहोर उमटवली आहे. गेल्या काही काळापासून केवळ याच अभिनेत्रीच्या फोटोशूट्स ची चर्चा मनोरंजन क्षेत्रात आणि प्रेक्षकांमध्ये सगळ्यांत जास्त आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरू नये.
ही चर्चा होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे या अभिनेत्रीच्या पहिल्या चित्रपटात तिचा लूक अत्यंत साधा होता. पण त्या चित्रपटापासून ते आजतागायत या अभिनेत्रीचा लूक ग्लॅ’मरस म्हणावा असा झाला आहे. तिच्या नवनव्या फोटो शुट्स मधून हे दिसून येतंच. आपल्या पैकी अनेकांनी ओळखलं असेलंच. या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव आहे राजेश्वरी खरात. फँड्री चित्रपटातून घराघरात पोहोचलेली ही गुणी अभिनेत्री. तिच्या या पहिल्या वहिल्या चित्रपटात तिला एकही संवाद नव्हता. केवळ नेत्रपल्लवी, देहबोली यांतून आपला अभिनय सादर करण्याचं आव्हान या नवोदित अभिनेत्री समोर होतं. तसेच व्यक्तिरेखाही अगदी साधीच होती. राजेश्वरीने हे आव्हान पेललं आणि तिची शालू ही व्यक्तीरेखा म्हणता म्हणता लोकप्रिय झाली. आजही फँड्री म्हंटलं की जब्या सोबत शालू आठवतेच. यात कौतुकाचा भाग असा की याआधी राजेश्वरी हिने कधीही अभिनय केलेला नव्हता. घरीही अभिनयाची पार्श्वभूमी नव्हती. वडील एके ठिकाणी कामाला तर आई शिक्षिका.
पण या तल्लख मुलीने आपल्या हुशारीच्या जोरावर उत्तम अभिनय केला. पुढे तिने आयटमगिरी हा सिनेमाही केला. गेल्या व्हॅलेंटाईन डे ला हा सिनेमा आपण बघितला असेलच. सिनेमांसोबतच राजेश्वरी हिने जाहिराती, म्युझिक व्हिडियोज मधूनही अभिनय केलेला आहे. तिच्या ‘मन उनाड झालंया’ या म्युझिक व्हिडियोला आजपर्यंत दीड करोड पेक्षा जास्त लोकांनी पाहिलेलं आहे. यावरून तिच्या वाढत्या लोकप्रियतेची कल्पना यावी.
अशा या लोकप्रिय अभिनेत्रीचे नवनवीन लुक्स मधले फोटोशूट्स म्हणजे तिच्या चाहत्यांसाठी पर्वणीच. राजेश्वरी सुद्धा आपल्या चाहत्यांना कधी निराश करत नाही. मराठमोळ्या साडीतल्या लूकपासून ते पाश्चिमात्य लूक पर्यंत ती सगळयाच फोटोज मध्ये सुंदर दिसते. याचं कारण ती सुंदर आहेच आणि हे सगळेच लूक ती अगदी आत्मविश्वासाने कॅरीही करते असं दिसून येतं. त्यामुळे तिच्या फोटोशूट्स सोबतच साध्या पेहरावातील आणि साध्या लुक्स मधील फोटोज सुद्धा तिच्या चाहत्यांमध्ये तेवढेच लोकप्रिय असल्याचं दिसून येतं. तसेच तिने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमांतून शेअर केलेले डान्सचे व्हिडियोज ही अतिशय लोकप्रिय होताना दिसतात.
त्यामुळे सिनेमातील व्यक्तीरेखा असो वा फोटोशूट्स, राजेश्वरी ही सदैव प्रेक्षकपसंती मिळवतेच हे आपण ठामपणे म्हणू शकतो. तर अशा उदयोन्मुख लोकप्रिय अभिनेत्रीस तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !