आताचं युग हे सोशिअल मीडियाचं युग आहे. येथे अनोळखी लोकांसोबत मैत्री होण्यास जास्त वेळ लागत नाही. एक फ्रेंड रिक्वेस्ट वर येथे मैत्री होऊन जाते. त्यानंतर ह्या मैत्रीचे प्रेमात सुद्धा कधी रूपांतर होऊन जाते, कळत सुद्धा नाही. फेसबुकवरचं प्रेम नेहमीच यशस्वी होईल, असं नसतं. खासकरून जेव्हा आपण एका अनोळख्या व्यक्तीवर खूप विश्वास ठेवतो तेव्हा फसवणुकीचे चान्सेस सुद्धा जास्त असतात. अशीच एक फसवणूक यूपीच्या फतेहपूर मध्ये राहणाऱ्या मुलाने कोलकाता मध्ये राहणाऱ्या एका मुलीसोबत केली. तरुणीची फेसबुकवर त्या तरुणासोबत मैत्री झाली होती, दोघांनी कोर्टात लग्न देखील केले. परंतु लग्नानंतर नवऱ्याने असं काही कृत्य केलं कि नवरीला न्यायासाठी पोलीस चौकीत धाव घ्यावी लागली.
खरंतर, फेसबुकवर झालेल्या मैत्रीमधून दोघांमध्ये गप्पागोष्टी सुरु झाल्या. काही दिवसानंतर त्यांना समजलं कि त्यांच्या एकमेकांसोबत खूप लांबचं नातं देखील आहे. दोघांमधील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. हळूहळू अभिषेक त्या तरुणीवर लग्नासाठी दबाव आणू लागला. त्याने तरुणीला ध’मकी दिली कि जर तिने त्याच्याशी लग्न केले नाही, तर तो गळ्याला ब्ले’ड लावून आ’त्मह’त्या करणार. ह्यानंतर तरुणाने दिल्लीवरून फ्लाईट पकडली आणि तरुणीला भेटायला कोलकाता येथे आला. इथे त्याने आ’त्मह’त्याची ध’मकी आणि इमोशनल दबाव टाकत तरुणीला लग्नासाठी राजी केले. दोघांनी कोर्टात लग्न केले. परंतु लग्नानंतर तरुणाने आपले खरे रंग दाखवले. तो तरुणीच्या घरातील तीन लाखांचे दागिने आणि एक लाख रोकड घेऊन फरार झाला.जेव्हा तरुणीला ह्याबद्दल समजलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ह्यानंतर ती कोलकाता पोलिसांसोबत त्या तरुणाला शोधण्यासाठी फतेहपूरमध्ये आली. इथे अभिषेकच्या घराला टाळं होतं. आता दोन्ही राज्यातील पोलीस ह्या फसवणूक करणाऱ्या तरुणाचा शोध घेत आहे.
तरुणीच्या आईचं म्हणणं आहे कि, अशाप्रकारच्या मुलांना कठोरातली कठोर शिक्षा मिळायला हवी. तेव्हाच ते कोण्या दुसऱ्या मुलीसोबत फसवणुक करणार नाही. तर दुसरीकडे पी’डित तरुणीचे म्हणणं आहे कि अभिषेक लग्नासाठी नेहमी दबाव टाकत होता. तो मला सारखेसारखे ब्ले’डने गळा का’पून आ’त्म’ह’त्या करण्याची धमकी द्यायचा. मी त्याच्या बोलण्याला फसली आणि लग्नासाठी राजी झाली. परंतु मला काय माहिती होते कि तो माझ्या आयुष्याचे वाटोळे करेल ते. ह्यापेक्षा मी अविवाहित राहिली असती तर चांगलं झालं असतं.
मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा फेसबुकवर कोण्या अनोळख्या व्यक्तीसोबत मैत्री करत असाल तर सांभाळून राहा. डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नका. खासकरून गोष्ट जेव्हा लग्नाबद्दल असेल तेव्हा ओळखीच्या घरीच नातं जोडा. किंवा समोरच्याला पूर्णपणे पारखून घ्या. नाहीतर ह्या मुलीप्रमाणे तुम्ही सुद्धा फसवणुकीचे ब’ळी व्हाल.