Breaking News
Home / मनोरंजन / फॉरेनर्सनी कोळी गाण्यावर केलेला डान्स होतोय वायरल, बघा व्हिडीओ

फॉरेनर्सनी कोळी गाण्यावर केलेला डान्स होतोय वायरल, बघा व्हिडीओ

कोळी गीतं म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता गीत प्रकार. हळद, लग्न, सांस्कृतिक समारंभ आणि इतर कोणताही समारंभ असू दे ज्यात डान्स सामील असतो, त्यात कोळी गीतांशिवाय मजाच येत नाही. अशी ही सदाबहार कोळी गीतं कोणालाही डुलायला भाग पाडतात. ही कोळीगीतं कानावर पडली की आपोआप एक हात वर जातो आपण सगळे नाचायला लागतो. पण परदेशी नागरिकांच काय ? त्यांना भारतीय पद्ध्तीने डान्स करणं काही वेळेस किती अवघड जाऊ शकतं, हे आपण पाहिलं असेलच. पण जर का एखाद्याने त्यांना सोप्प्या स्टेप्स शिकवल्या तर ? या सगळ्यांची उत्तरं देणारा व्हिडियो आपल्या टीमला नुकताच सापडला. मग काय त्यावर लिखाण करणं हे आलंच. चला तर मग या व्हिडियो विषयी जाणून घेऊयात.

या व्हिडियोत आपल्याला एक भारतीय मुलगा दिसतो. आपला कोळी बांधव असावा. त्याच्या आजूबाजूला चार परदेशी मुली उभ्या असतात. जवळच एक माईक असतो. तेवढ्यात एक सुप्रसिद्ध कोळी गीत सुरू होतं. ‘आई तुझं देऊळ सजतंय’ हे ते सुप्रसिद्ध गीत. हे या गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि गायक आहेत. तर असं हे गीत सुरू होतं आणि आपला भाऊ डुलायला लागतो. तेवढ्यात कॅमेऱ्यामागून माईकचे लाईट लावायला सांगितलं जातं. त्यामुळे वातावरण अजून प्रसन्न होतं. त्या परदेशी मुलींच्या चेहऱ्यावरून ते कळत असतं. एकदा माईक सेट झाला की मग पुन्हा आपला भाऊ नाचायला लागतो. त्याच्या सोबत सगळे नाचायला लागतात. तेवढ्यात या ग्रुपला एक आफ्रिकन अमेरिकन मुलगा येऊन सामील होतो. छोट्या छोट्या आणि सोप्प्या स्टेप्स केल्याने हे सगळे परदेशी पाहुणे डान्स करताना अवघडत नाहीत. उलट काहीशी सवय असल्यासारखे त्यांचे हावभाव आणि देहबोली असते. त्यामुळे आपल्यालाही त्यांचा डान्स बघताना मजा येते. डान्स करणारा अवघडलेला असेल तर हसायला येतं. पण डान्स करणारा हळू हळू का होईना पण डान्स स्टेप्स व्यवस्थित करत असेल तर मजा येते. तीच मजा इथे ही घेता येते. गाणं पुढे सरकत असतं आणि त्यात एका नवीन डान्सर ची भर पडते.

मिनी माऊस चा भला मोठा मुखवटा घातलेली एक व्यक्ती थेट गिटार हातात घेऊन यात सामील होते. त्यामुळे थोडा वेळ गंमतीशीर वातावरण ही तयार होतं. आफ्रिकन अमेरिकन मुलाला तर हसू आवरत नसतं. पण एक मात्र खरं, या संपूर्ण ग्रुप मध्ये त्याला या स्टेप्स पटकन कळतात. त्यामुळे या स्टेप्स जशाचा तशा पटकन करण्यात त्याला यश येतं. मुलीही मस्त नाचत असतात. आणि या सगळ्यांना मस्त नाचावणारा भाऊ तर एकदम जोमात असतो. या परदेशी मित्र मैत्रिणींच्या उत्तम डान्सचं बरचसं श्रेय त्याला जातं. हा व्हिडियो तसा थोडा मोठा आहे. पण त्यातला डान्स बघता केवळ एकदा बघून भागत नाही. आपण आवडीने आणि आनंदाने पुन्हा पुन्हा हा व्हिडियो पाहतो, त्याचा आनंद घेतो.

आपणही हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याला ही तो आवडणारच. सोबतच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. आपल्याला आमचे लेख आवडले की आपण ते शेअर करता. ते ही अगदी मोठ्या प्रमाणावर. आमच्या कामाची पोचपावती आम्हाला यातून मिळते. आपला लोभ आमच्या टीमप्रति असाच कायम असू द्या. आपल्या प्रोत्साहनासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.