हे बॉलिवूड आहे मित्रांनो. इथे नशिबाचे, मेहनतीचे आणि प्रेक्षकांच्या प्रेमाचे नाणे चालते. वर्षानुवर्षे लागतात लोकांना मेहनत करून चित्रपटात एक सेकंडचा रोल मिळवायला. तर काहींचे नशीब रस्त्यावर बसल्याबसल्या सुद्धा चमकते आणि त्यांना चित्रपटात काम मिळते. खरं तर त्यांना माहिती सुद्धा नसते चित्रपट म्हणजे काय असतो ते आणि ते इथे करत काय आहेत, ते म्हणजे जगदीप साहेब. जिथे एक व्हीसीडी वाला बॉलिवूडमध्ये येऊन इथला खूप मोठा दिग्दर्शक बनू शकतो आणि पुढे जाऊन त्याच्या चित्रपटाच्या व्हीसीडीज विकायला लागतात तो म्हणजे मधुर भांडारकर. हीच ती जागा आहे जिथे इन्स्पेक्टर कुलभूषण पंडित येतो, हिरो बनतो, अभिनय करतो, सुपरस्टार बनतो आणि मग लोकप्रिय होतो राजूकमारच्या नावाने. अश्याच एका सुपरस्टारबद्दल आपण वाचणार आहोत ज्याचे नाव आहे अक्षय कुमार. अक्षय कुमारला एका मोठ्या अभिनेत्याने अगोदरच सांगितले होते कि तू पुढे गेल्यावर खूप मोठा अभिनेता बनेल. तर आजच्या लेखात आम्ही सांगणार आहोत कि केव्हा अक्षय कुमारला तो अभिनेता भेटला, का त्या अभिनेत्याने अक्षय कुमारला असं सांगितले, आणि अक्षयसाठी कशी त्या अभिनेत्याची गोष्ट खरी ठरली.
हि तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा अक्षय कुमार बॉलिवूड चित्रपटात आला नव्हता, बॉलिवूड चित्रपटात येण्यासाठी त्याला आपला पोर्टफोलिओ फोटोशूट करायचा होता, ज्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने ठरवले कि तो फोटोग्राफर आणि पोर्टफोलिओ बनवणासाठी खूप लोकप्रिय असणाऱ्या जयेश सेठ ह्यांच्याकडे काम करेल. त्यादरम्यान जयेश सेठ ह्यांचे सर्व काम अक्षय कुमारच सांभाळायचा. त्यापैकी एक काम होते कलाकारांजवळ त्यांची फाईल घेऊन जाणे आणि ते कोणते फोटोज निवडतात ते निवडून, ते फोटो पुन्हा जयेश ह्यांच्याकडे घेऊन येणे. एकेदिवशी जयेश सेठने अक्षय कुमारला बोलावले आणि सांगितले कि आज मी तुला ज्या जागेवर पाठवत आहे तिथे तुला सामान्य व्यक्तीसारखे जायचे आहे. तिथे तुला अतिउत्साह नाही दाखवायचा आहे आणि तिथे शांतपणे आपले काम करायचे आहे. अक्षय कुमार त्या गोष्टीला घेऊन थोडा चिंतीत आणि थोडा उत्साहित झाला होता.
कारण त्यादिवशी अक्षय कुमार पाठवलं होते गोविंदाकडे. जयेश शेठ ह्यांच्याकडून फोटोग्राफ्सची फाईल घेऊन अक्षय कुमार गोविंदाजवळ त्याच्या चित्रपटाच्या सेटवर गेला. गोविंदा त्याच्या चित्रपटाची शूटिंग करत होता त्यामुळे अक्षय कुमारला काही वेळ वाट पाहावी लागली. ह्यानंतर गोविंदाने अक्षय कुमारला बोलावले. तेजेव्हा गोविंदाने अक्षयला बोलावले तेव्हा त्याच्याकडून फाईल घेतली. त्यानंतर गोविंदाने फाईल पाहिली. त्यातील जे फोटोज त्याला आवडले त्याने त्यावर टिक करून निवडले. ती फाईल बंद करून पुन्हा अक्षय कुमारला दिली. जेव्हा गोविंदा अक्षय कुमारला फाईल देत होता त्यावेळी काही सेकंदासाठी त्याची नजर अक्षय कुमारच्या चेहऱ्यावर पडली. त्याचा चेहरा बघताच गोविंदाने अक्षय कुमारला सांगितले “ओये, तू हिरो का नाही बनत.” त्यावर अक्षय कुमारला वाटले कि गोविंदा मस्तीत असं म्हणत आहे. परंतु गोविंदाच्या म्हणण्यावर तो इतका खुश झाला कि त्याने विचारले, “खरंच का?” तेव्हा गोविंदाने सांगितले, ” का नाही बनु शकत तू हिरो, तू प्रयत्न कर हिरो बनण्यासाठी.” मग काय होतं, गोविंदाचे ते शब्द अक्षय कुमारच्या मनात कोरले गेले. त्याने ठरवले कि पुढे जाऊन तो बॉलिवूडचा अभिनेता बनूनच दाखवेल.
गोविंदाने भलेही ती गोष्ट अक्षय कुमारचा फक्त चेहरा पाहून म्हटली असेल. परंतु अक्षय कुमारसाठी गोविंदाचा तो कॉम्प्लिमेंट खूप मोठा होता. कारण अक्षय कुमार हेच तर बनायला फोटोग्राफरकडे काम करत होता. त्याला फोटोग्राफर काढून पोर्टफोलिओ बनवून घेतल्यावर त्याला पुढे जाऊन अभिनेता व्हायचे होते आणि गोविंदा त्याकाळी खूप मोठा अभिनेता होता आणि त्याच्याकडून ह्याप्रकारची कॉम्प्लिमेंट मिळणं खूप मोठी गोष्ट होती. खरंतर अक्षयने त्यावेळी गोविंदाला हि गोष्ट नाही सांगितली होती कि तो अभिनयातच प्रयत करत होता. फोटोग्राफर कडे काम तो असंच करत होता. परंतु तिथून गेल्यानंतर अक्षयने विचार केला कि जर गोविंदासारख्या सुपरस्टारने हि गोष्ट सांगितलीआहे तर माझ्यात काहीतरी गोष्ट नक्कीच आहे. त्यानंतर अक्षय कुमारला प्रेरणा मिळत गेली, तो पुढे जात राहिला, मेहनत करत राहिला आणि एक दिवस असा सुद्धा आला जेव्हा अक्षय कुमारने गोविंदा सोबत चित्रपट केला. त्याच्याच बरोबरीची भूमिका केली. तो चित्रपट होता ‘भागमभाग’. ह्या चित्रपटात अक्षय आणि गोविंदाची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली आणि हा चित्रपट हिट ठरला. अश्याप्रकारे अक्षय कुमारच्या लपलेल्या चेहर्यामागचा हिरोला गोविंदाच्या पारखी नजरेने ओळखले होते. अक्षय कुमारने स्वतः शेअर केलेला हा अनुभव आम्ही खाली देत आहोत, पहा नक्की.