Breaking News
Home / मराठी तडका / फोटो पाहून ओळखा बरं कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगचा फोटो आहे ते

फोटो पाहून ओळखा बरं कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगचा फोटो आहे ते

मराठी सिनेमाचा प्रेक्षक हा नेहमीच चोखंदळ असतो. त्याला कोणत्याही सिनेकलाकृती मध्ये अस्सलपणा आणि दर्जा हा लागतोच. सिनेमाच्या गोष्टीपासून ते दिग्दर्शनापर्यंत सगळं दर्जेदार असावं, असं त्याला वाटत असतं. अर्थात, मराठी सिनेकलाकार, मग ते पडद्यामागचे असो वा पडद्यापुढचे सगळं काम अगदी कसं मन लाऊन करतात. आणि मग जन्माला येतात त्या अजरामर कलाकृती. अशीच एक अजरामर कलाकृती काही दिग्गज कलाकारांनी एकत्र येऊन केली. त्यांच्या शुटींगच्या वेळेचा एक फोटो खाली दिला आहे. बघा तर तुम्हाला ओळखता येतो का ते. खात्री आहे तुम्ही फोटो वरून सिनेमा ओळखालंच.

अगदी बरोबर ओळखलत ! “अशी हि बनवाबनवी” ! मला खात्री आहे फोटो बघून तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं असणारच. आणि का नाही होणार हो. त्यातले विनोद अगदी आजही हसवून जातात. आजकालच्या बोल्ड विनोदांवर हसता हसता अशा नर्मविनोदांवर हसता येतं हे हा चित्रपट दाखवून देतो. चित्रपटाला कथा किती महत्वाची असते ते सुद्धा या सिनेमामधून दिसून येतं. चार मित्र एकत्र काय येतात, घराबाहेर हाकलले काय जातात आणि त्यावर उपाय म्हणून वेषांतर करून राहण्याची नवीन जागा काय मिळवतात. आणि मग येणाऱ्या संकटाना झेलता झेलता ज्या करामती करतात त्यांनी अख्खा महाराष्ट्र खळखळून हसलाय. पण जाता जाता, घरमालकिणीला आम्ही बनवाबनवी केली पण तुम्हाला फसवलं मात्र नाही, असं सांगून गंभीरही करतात. खरं तर अशा कल्पनेबाहेच्या गोष्टीत ऐसपैस पणा येऊ शकतो. पण तसं होत नाही. हि गोष्ट प्रेक्षकांना कंटाळा देत नाही.

ती प्रेक्षकांना बांधून ठेवते. आणि याचं श्रेय जातं ते दिग्दर्शक सचिनजी पिळगावकर यांना. ते नेहमी म्हणतात, मी एक उत्तम प्रेक्षक असल्याने उत्तम कलाकृती बनवू शकतो. खरंच, हि कलाकृती बघून हेच सिद्ध होतं, कि सचिनजींनी प्रेक्षकांची नस अगदी बरोबर पकडली आहे. हो पकडली आहे. कारण आज तब्बल ३१ वर्षांनंतर सुद्धा या सिनेमाचा टवटवीतपणा जात नाही. आणि या सिनेमाच्या कलाकारांना कोण कसं विसरेल. सचिनजी स्वतः, अशोक सराफ, स्वर्गीय सिद्धार्थ रे, विजू खोटे आणि दस्तुरखुद्द स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे. स्त्री कलाकारही तेवढ्याच ताकदीच्या. सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, अश्विनि भावे, प्रिया बेर्डे, नयनतारा. एका पेक्षा एक असे हे सरस कलाकार एकत्र आले आणि चार चांद लागले या सिनेमाला. प्रत्येकाने आपली भूमिका अशी वठवली कि प्रसंगाच्या प्रसंग प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेत.

२३ सप्टेंबर १९८८ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला. येत्या काळात या सिनेमाला ३२ वर्ष पूर्ण होतील आणि त्याच निमित्ताने हा लेख. या सिनेमाविषयी कितीही बोलू, लिहू तेवढं कमीच. या सिनेमामधल्या प्रत्येक वाक्याने आपल्या हृदयावर राज्य केलंय. त्यातल्या नर्मविनोदाने आपण आजही हसतो. सत्तर रुपये वारले या वाक्यावर मिम्स बनले जातात. त्यातल्या गाण्यांवर आपण डोलतो. या कलाकृतीचा सच्चेपणा आजही भावतो आणि यामुळेच ३ दशकांनंतरही प्रेक्षकांना प्रसन्न करून जातो. तसाच तो येणाऱ्या पिढ्यांना पण असाच भावत राहील यात शंका नाही. येत्या ३२ वर्षपूर्ती निमित्त अशी हि बनवाबनवी च्या संपूर्ण टीमला मराठी गप्पा कडून पुनःश्च धन्यवाद.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *