बॉबी देओल हे नाव आज बॉलिवूडमध्ये ओळखीचे आहे. परंतु हे एक कटू सत्य आहे कि, बॉबी देओलचे चित्रपट करिअर हे त्याचे वडील धर्मेंद्र किंवा त्याचा मोठा भाऊ सनी देओल सारखे काही खास चालले नाही. परंतु असं असून सुद्धा एक काळ असा सुद्धा होता कि, बॉबी देओल चित्रपट इंडस्ट्रीमध्ये चमकत होता. त्यानंतर बॉबीच्या आयुष्यात घसरण येऊ लागली. एक वेळ अशी सुद्धा आली होती कि, तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याला दारूची चटक लागली होती. अश्या कठीण परिस्थितीत त्याची बायको तान्या देओल हिने त्याला सांभाळले होते. तान्याने बॉबी देओलला साथ दिली होती आणि त्याला पुन्हा चित्रपटांत काम करण्यासाठी प्रेरित केले होते. बॉबीने देखील हि गोष्ट अनेकवेळा मीडियामध्ये सांगितली आहे.
फार मोठ्या काळाच्या ब्रेकनंतर बॉबीने सलमान खान सोबत ‘रेस ३’ मध्ये काम केले आणि बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. रेस ३ चित्रपट तर फ्लॉप ठरला होता परंतु त्यामुळे बॉबीला ‘हाऊसफुल ४’ मध्ये काम मिळाले होते. बॉबीचा हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर लोकांना काही खास पसंद पडला नव्हता. अशामध्ये आपण म्हणू शकता कि, बॉबी देओल इच्छा असूनदेखील आपले फिल्मी करिअर रुळावर घेऊन येऊ शकला नाही आहे. कदाचित ह्याच कारणामुळे कमाईच्या तुलनेत त्याची पत्नी तान्या त्याच्यापेक्षा पुढे आहे. अनेक जण हे माहिती पडल्यावर हैराण होतील, परंतु हे सत्य आहे. तान्या सध्या बॉबी देओल पेक्षा जास्त पैसे कमावते आहे. खरंतर तान्या एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. ती फर्निचर आणि होम डेकोरेटर्सचा व्यवसाय करते. तान्याचे स्वतःचे एक शोरूम आहे, ज्याचे नाव ‘द गुड अर्थ’ असे आहे. तान्याच्या शो रूम मधून अनेक मोठ्या मोठ्या स्टार्सच्या घरी सामान जाते. इतकंच नाही तर, अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना जी एक लोकप्रिय इंटेरिअर डिझायनर आहे, तिच्या स्टोरमध्ये देखील तान्याने डिझाईन केलेले एक्सेसरीज ठेवलेल्या आहेत.
तसंतर तान्या जन्मापासूनच श्रीमंत आहे. तिचे वडील देवेंद्र अहुजा हे ‘ट्वेन्टीथ सेंचुरी फायनान्स लिमिटेड’ कंपनीमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर होते. अशामध्ये बिझनेसमधले गुण तान्यामध्ये अगदी लहानपणापासूनच होते. बॉबीच्या आलिशान लाइफस्टाइलचे खर्च अधिकवेळा तान्या देत असते. ह्यात काही वाईट नाही आहे. जर हीच गोष्ट बॉबी तान्यासाठी करत असता, तर कोणाला काही विरोध नसता. तसेही आता आपला जमाना ‘जेंडर समानता’ झाला आहे. बॉबी आणि तान्याची लव्हस्टोरी सुद्धा खूप मनोरंजक आहे. ह्या दोघांची पहिली भेट एका रेस्टोरंट मध्ये झाली होती. जिथे बॉबी तान्याला पहिल्यांदा पाहताच तिच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर बॉबी अनेकदा त्याच रेस्टारंट मध्ये यायचा आणि तान्याबद्दल सर्व माहिती काढायचा. ह्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम सुद्धा झाले. बॉबी आणि तान्या दोघांचे ३० मे १९९६ मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर दोघांना ‘आर्यमन’ आणि ‘धर्म’ हि मुले झाली. साध्ये बॉबी पुन्हा एकदा चित्रपटांत काम करू लागला आहे. त्याला भलेही कमी चित्रपट मिळत असतील, परंतु काम मिळणे चालू झाले आहे. सोशिअल मीडियावर आज सुद्धा लोकं बॉबी देओलला पाहणं अधिक पसंद करतात.